Monday, 18 July 2022

हर घर तिरंगा

 मागील पानावरून....अभियानाची पूर्तता होणार आहे.  अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्याने प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करावी. 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रभात फेरीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची लढाई कशी होती याची माहिती लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करण्यात यावा. गावांमध्येतालुक्यांमध्ये 1 तास प्रभातफेरी काढण्यात यावी. केंद्र शासनामार्फत सुध्दा वेगवेगळ्या माध्यमातून राज्यांसाठी झेंडे उपलब्ध करण्यात येणार असून पोस्ट ऑफीसमध्ये सुध्दा तिरंगा मिळणार आहे. केंद्र शासनाने सुरू केलेल्या संकेतस्थळावर आपले फोटो आणि सेल्फी पाठवून आपण या अभियानात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपल्या शहिदांनी दिलेले बलिदानाची आठवण ठेवत त्यांनी केलेले काम आजच्या पिढीलातरुण वर्गाला समजावेमाहिती व्हावे आणि आपल्यामध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठीच हा उपक्रम देशभरात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. भारताने गेल्या 75 वर्षात केलेली प्रगती याबरोबरच पुढील 25 वर्षांत भारत जगात वेगळा कसा ठरेल याचा संकल्प करण्याचा सुध्दा प्रयत्न यामध्ये होणार आहे. ‘संकल्प से सिध्दी’ या कार्यक्रमाद्वारे भारताची पुढची 25 वर्षातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती यावर लक्ष देण्यात येणार आहे. कृषीउत्पादनसेवासहकार शिक्षणपायाभूत सुविधा यामध्ये येणाऱ्या काळात भारताची प्रगती जगभरासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री श्री. शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

            आजादी का अमृतमहोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने देशाचे स्वातंत्र्य मिळविताना अनेक संकटांचा सामना केला, मात्र आज जगभरात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. येणाऱ्या काळात ही ओळख टिकवून ठेवत अनेक क्षेत्रातील भारताचे सर्वोच्च स्थान टिकवून ठेवणे यालाच प्राधान्य असणार आहे. येत्या 22 जुलैपासून या अभियानाची सुरुवात होणार असून प्रत्येक राज्याने सुध्दा त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावरफेसबुकट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावर याबाबत प्रचार आणि प्रसिध्दी सुरू करावी. ‘हर घर तिरंगा’ याबाबतची माहिती देत असताना वर्तमानपत्रेइलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमांचासुध्दा यामध्ये वापर करण्यात यावा, असेही श्री. शहा यावेळी म्हणाले.

***


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi