Friday, 15 July 2022

वयो स्तुते

 🍁

वय वाढत चाललंय, हे स्विकारलं

तरच, आपण तणावमुक्त

जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो..

प्रत्येक वयोमान वेगवेगळ्या वाटेवर सप्तरंगी जीवन घेऊन येतं. त्याचा आपण आनंद घ्यायचा असतो..


केस काळे करायचेत? 🙁


तर केस काळे करा


वजन कमी करायचंय?😩

 

ते पण करा..


मनपसंत कपडे घालायचेत? 😄


खुश्शाल  घाला.. 😁


लहान मुलांसारख्या 

उड्या मारावाशा वाटतात?😁


मारा उड्या..😁


आरशात पाहून आपल्या आहे 

त्या अस्तित्वाचा

स्वीकार करायला शिका..


कोणतंही क्रीम किंवा फेसपँक तुम्हाला 

गोरं करणार नाही..😁


कोणताही शाम्पू

केस गळती रोखू शकणार नाही..😩


कोणतेही तेल टकलावर

केस उगवू शकणार नाही..😄


कोणताही साबण बच्चों जैसी

कोमल स्कीन देणार नाही..😩


मग तो प्रॉक्टर & गँबल असो

किंवा पतंजली..


सगळेच जण आपापली

दुकानं थाटून बसलेयत..


सगळं नैसर्गिक असतं...

वयोमानाप्रमाणे शरीरात

बदल होत जातात..

जुन्या मशीनला मेन्टेनन्स् करून अपटुडेट करू शकतो..

पण नवीन नाही करू शकत..


कोणत्याही टुथ-पेस्टमध्ये

नमक नसतं व कोणत्याही

टूथ-पेस्ट मध्ये नीम नसतो..


पोट सुटलंय सुटू दे, 

त्यासाठी लाज वाटू नये,

आपलं शरीर वयोमानानुसार

बदलंत राहतं..

वजन पण त्याप्रमाणे 

कमी-जास्त होत राहतं..


ईन्टरनेट , सोशल मिडीयावर

वेगवेगळ्या उपदेशांनी

उच्छाद मांडलाय..

                                                                              अमुक खा,

तमुक खा, 

गरम खा. थंड प्या, 

हे पिऊ नका, हे खाऊ नका,

कपालभाती करा,

सकाळी लिंबूपाणी प्या, 

गाईचंच दूध प्या, जोरात श्वास घ्या,

दिर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा,

उजव्या कुशीवरून उठा,

हिरव्या पालेभाज्या खा,

डाळीत प्रोटीन असतात,

नाचणी खा, 

वगैरे वगैरे.....


वरील सारे उपदेश वाचले की 

असं वाटतं, आयुष्य बेकार आहे.

धड काही खाऊ शकणार नाही..

धड जगू शकणार नाही. 

आणि मानसिक् तणावाखाली

डिप्रेशनची भर पडेल ती वेगळी...


ऑर्गेनिक, एलोवेरा, कारलं , मेथी, पतंजली, प्रॉक्टर & गँबल..

आशीर्वाद, नेस्ले, आई.टी.सी.

इत्यादी ...

कंपन्या डोक्याचा भुगा करतात. 

यांचं महागडं खाणं खाण्यापेक्षा 

मानसिक तणावंच जास्त होतो.. 


अरे आपण एकदा कधीतरी

मरणारच आहोत ना? ☘😁


नशिब अजून बाजारात अमृत

विकायला नाही आलं..🤣


मजेत रहा, पाहिजे ते, जमेल तसं 

खात रहा, व्यायाम करा

आनंदात रहा,

शरीराला त्याचं कार्य करू द्या,

मन मारून जगू नका,

कामात व्यस्त रहा,

समवयस्क, जुन्या बालमित्र-मैत्रिणींबरोबर

संपर्कात रहा...


Live life Naturally..

निसर्गाच्या☘🌿🌴🌳🌿 सान्निध्यात रहा!....


Your body is Gift of God

आयुष्य हे देवाने

दिलेली सुंदर भेट आहे.!💓🌳💧👏🙏🙏🙏🙏

चवीचे बोला

 🚶🏻 *कोकणातील सावंत नावाच्या एका मुलाने* पुण्यात दवाखाना उघडला 💊💉 बाहेर फळ्यावर वर लिहिले, *तीनशे रुपयात ईलाज,फरक पडला नाही तर एक हजार रु. परत,* 


🧓🏻एका पुणेकरला वाटलं एक हजार कमवण्याची चांगली संधी आहे, 😉😉

तो दवाखान्यात गेला आणि म्हणाला ; मला कुठल्याच वस्तूची चव कळत नाही... ☹️🙁😖😞                  

*कोकणातील मुलगा* ;- नर्स 22 नंबरच्या खोक्यातील औषध काढा आणि तीन थेंब पाजा यांना, 

नर्स ने तीन थेंब पाजलें,

*पुणेकर*: अरे हे तर पेट्रोल आहे, 😏😏

*कोकणातील मुलगा*: अभिनंदन ! 😋 तुम्हाला चव कळायला लागली, द्या तीनशे रुपये, 😀😀    

                     

पुणेकरला राग 😠आला, काही दिवसांनी पुन्हा आला, मागच्या वेळचे पैसे वसूल करायला ......

*पुणेकर*: माझी स्मरण शक्ती कमी झाली आहे काही आठवण राहत नाही 😖😒 कोकणातील मुलगा👉नर्स 22 नंबरच्या खोक्यातील औषध काढा आणि तीन थेंब पाजा यांना,

*पुणेकर*: अहो ते औषध तर चव कळण्या साठीचे आहे ना ??🤨🤨

*कोकणातील मुलगा*: बघा नुसत्या औषधा च्या नावाने तुमची स्मरण शक्ती सुधारली, द्या तीनशे रुपये,😄😄


पैसे देऊन झाल्यावर पुणेकर खूप भडकला 😡😡 आणि म्हणाला, माझी नजर खूप कमजोर झाली आहे ईलाज करा 


*कोकणातील मुलगा* : याचं औषध माझ्या कडे नाही हे घ्या एक हजार रुपये,

*पुणेकर*: अरे ही तर शंभर रु.ची नोट आहे, 🧐🧐 

*कोकणातील मुलगा*: अरे वा तुमची नजर पण सुधारली चला काढा तीनशे रु.

😜😄😅🤪........ 

*East or West.... कोकणवाले is the best....*😇😆😜


अगर *कोकण* के हो 

तो इसे आगे भेजते रहो 🤓🤓

नीमका पेड़ चन्दन से कम नहीं ।


हमारा 👉 *कोकण* 👈 

लंडन से कम नहीं।।।

JOKE OF THE CENTURY* 😊😉😘😅😂🤣

 *JOKE OF THE CENTURY* 

😊😉😘😅😂🤣

*A grandson, noticed his grandpa who looked rather tensed so to break the ice, he asked his grandpa one question while on the way back from school....*

What is the difference between 'Wife' and 'Girlfriend?'

Grandpa thought for a minute and Simplified the explanation like this ;

Listen Son ,

*Wife* is like a *TV* and *Girlfriend* is like a *MOBILE.*

At home  you *watch* TV,

but when you go out you *take* your MOBILE.

Sometimes you *enjoy* TV, but most of the time, you *play* with your MOBILE.

TV is (as good as) *free* for life, but for the MOBILE, if you don't *pay,* the services will be *terminated.*

TV is *big, bulky* and most of the time *old,*

But the MOBILE is *cute, slim, curvy, replaceable* and *portable.*

Operational costs for TV is often *acceptable*

but for the MOBILE, it is often *high* and *demanding.*


TV has a *remote*

but MOBILE *doesn't.*


Most importantly, MOBILE is a *two-way communication* (you talk and listen), but with the TV, you *MUST only listen* (whether you want to or not)!😝


Last but not least!

Yet TVs are superior because TVs don't have *viruses,* but MOBILES often *do*😂


And mobiles can be easily *hacked* or *stolen.*


*Take Care*

*Stick to TV only*

Issued in Public interest!

😃😂😄


*Don't laugh alone without calling your spouse **🤭😁🤭

पशु संवर्धन

 महाराष्ट्राला पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार.

योजनेंतर्गंत राज्यात ७९३ कोटींचे कर्ज वाटप; ५३ कोटींची व्याज सवलत प्रदान.

            नवी दिल्ली दि. 14 : केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या लाभासाठी जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करणे व या योजनेबाबत जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकाविला.या उपलब्धीसाठी केंद्रीय मत्स्य,पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते आज राज्याला सन्मानित करण्यात आले.

          केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी संमेलनात’ हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध राज्यमंत्री डॉ.संजीव कुमार बालियान आणि विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्ये, उद्योजक आणि बँकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

       पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी व योजनेच्या जागरूकतेकरिता केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी यावेळी देशातील तीन राज्यांना गौरविण्यात आले. यात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला. कर्नाटक राज्याला दुसरा तर उत्तरप्रदेशला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला.      

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत ७९३ कोटींचे कर्ज वाटप

- आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

       केंद्र शासनाने पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी वर्ष २०२० मध्ये पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरु केली. राज्यातील उद्योजकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला.राज्य शासनाकडे एकूण ९१६ अर्ज प्राप्त झाले होते यापैकी पात्र ७३ अर्जांमधून आतापर्यंत २६ अर्जांना मंजुरी देण्यात आली. या उद्योजकांना ७९३ कोटींचे कर्ज वाटप आणि ५३ कोटींची व्याज सवलत देण्यात आल्याचे आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले. या योजनेंतर्गत राज्य शासनाला एकूण १५ हजार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.          

महाराष्ट्रातील 20 उद्योजकांचा सन्मान

                  पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील ७५ व्यक्ती व संस्थांना या संमेलनात गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातील २० व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे.

         या कार्यक्रमात ७५ पैकी प्रातिनिधिक १० उद्योजकांना केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्‍ते गौरविण्यात आले. यात महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योर्तिलिंग मिल्क फुड आणि अहमदनगर जिल्ह्यातील जप्फा कॉम्फीड इंडिया लि. चा सन्मान करण्यात आला.

                  या मुख्य कार्यक्रमानंतर राज्यातील अन्य व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गोविंद फिड मिल, रोहिणी सुचित्रा पोवार, अनुप श्रीनिवास पडमल या संस्था व व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. पुणे जिल्ह्यातील विशाल अशोक मोकाशी, हुवेफार्मसी पुणे प्रा. लि, नेचर डिलाइट कॅटल फीड्स प्रा. लि., ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. यांना गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील कृष्णा डेअरी आणि मुंबई येथील ग्रॅव्हिस फूड्स प्रा. लि. चा सन्मान करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील गौगंगा फूड प्रा. लि.,जलाराम व्हेटकेअर इंडस्ट्रीज प्रा. लि. तसेच सोलापूर जिल्ह्यातील गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि. चा सन्मान करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील स्वामी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस् आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मयुर प्रताप पाटील, दमयंती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. चा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील डेलेक्टो फूड्स प्रा. लि., बीड जिल्ह्यातील विमल ॲग्रो आणि सांगली जिल्ह्यातील एम. एस. बी जी चितळे यांनाही गौरविण्यात आले.


 



Thursday, 14 July 2022

 जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक.

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 14 : ज्ञान, माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण यामुळे शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावत असतात. येणाऱ्या काळात संपूर्ण जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक आहे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

            आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील विद्यापीठासमवेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य करार अशा कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पहिले आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन, युनिर्व्हसिटी ऑफ नॉट्रे डेम ऑस्ट्रेलियाच्या कुलगुरु सेलमा अलिक्स, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही भारतीय युवा शक्तीने प्रेरित असून भारतातील आणि महाराष्ट्रातील विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करण्यास ते उत्सुक आहेत, ही बाब आनंदाची आहे. येणाऱ्या काळात एकसमान शिक्षण पद्धत संपूर्ण जगात असणे ही काळाची गरज ठरणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत वेगवेगळ्या पॅथींचा समावेश आहे. पण आजच्या विद्यार्थ्यांना या पॅथी शिकताना रुग्णांबरोबर सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे, तरच हे विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या पॅथी चांगल्या समजू शकतील.

            भारतासह अन्य देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आरोग्य, दळवणवळण, पायाभूत सुविधा याबरोबरच शिक्षण क्षेत्रातही प्रगती केली आहे. भारतासह सगळेच देश प्रगतीबरोबरच शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गौतम बुद्ध यांचे विचार आणि भगवान महावीर यांची शांततेची शिकवण भारतासह इतर देशांनाही प्रेरित करत आहे. आपल्या आताच्या शिक्षणात सुद्धा शांतता आणि एकात्मता यावर भर असणे आवश्यक आहे. भारताने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्याचे निश्चित केल्यानंतर हा दिवस 108 देशांमध्ये साजरा केला जातो हीच आपली एकात्मता आहे, असेही श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले.

            वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन म्हणाले की, कुशल मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या भारतासारख्या देशाबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काळात आपल्यात अनेक शैक्षणिक करार करताना याचा फायदा कसा होईल याकडे अधिक लक्ष देण्यात येईल. शिक्षणक्षेत्रासाठी सगळ्यात सुरक्षित अशी ओळख असणाऱ्या या राज्यात रोजगार आणि शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

            उत्कृष्ट सागरकिनारे, स्वच्छ आणि सुरक्षित शहर, चांगला सुर्यप्रकाश आणि प्रदूषणविरहीत हवा याबरोबरच चांगली शैक्षणिक व्यवस्था यासाठी सुद्धा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ओळखले जाते. भारतातील एक लाखांहून अधिक विद्यार्थी या देशात शिकत आहेत. येणाऱ्या काळात पर्यटन, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रातील बारकावे शिकण्यासाठी आमच्या राज्यातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात येतील असा विश्वास वाटतो. भारतासारख्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री म्हणून आल्यानंतर आपल्याच घरी आल्याचा भास होतो. आमच्या राज्यातून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही हीच भावना असेल, असा विश्वास श्री. टेम्पलमन यांनी व्यक्त केला.

            आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन आज मान्यवरांच्या हस्ते झाले. या आरोग्य कोशात सुमारे 550 पेक्षा अधिक चरित्रनायकांचा समावेश करण्यात आला असून विद्या शाखानिहाय ते वर्गीकृत करण्यात आले आहेत. प्रकाशित करण्यात येणारा आरोग्य कोश शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांकरिता उपयुक्त असणार

प्रोत्साहन अनुदान

 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत

            राज्यात २०१८-१९ च्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांना देखील हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भात आपणास निवेदन देऊन योजनेतील जाचक अटी दूर करण्याची मागणी केली होती, असेही मुख्यमंत्री म्हणाले.



बुस्टर डोस

 कोविडची मोफत बूस्टर मात्रा महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना दिली ग्वाही

            शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल दिली.

            या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी आज चर्चा झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी दिली.

            मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जन जागृती करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.


---०--

Featured post

Lakshvedhi