Friday, 15 July 2022

वयो स्तुते

 🍁

वय वाढत चाललंय, हे स्विकारलं

तरच, आपण तणावमुक्त

जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो..

प्रत्येक वयोमान वेगवेगळ्या वाटेवर सप्तरंगी जीवन घेऊन येतं. त्याचा आपण आनंद घ्यायचा असतो..


केस काळे करायचेत? 🙁


तर केस काळे करा


वजन कमी करायचंय?😩

 

ते पण करा..


मनपसंत कपडे घालायचेत? 😄


खुश्शाल  घाला.. 😁


लहान मुलांसारख्या 

उड्या मारावाशा वाटतात?😁


मारा उड्या..😁


आरशात पाहून आपल्या आहे 

त्या अस्तित्वाचा

स्वीकार करायला शिका..


कोणतंही क्रीम किंवा फेसपँक तुम्हाला 

गोरं करणार नाही..😁


कोणताही शाम्पू

केस गळती रोखू शकणार नाही..😩


कोणतेही तेल टकलावर

केस उगवू शकणार नाही..😄


कोणताही साबण बच्चों जैसी

कोमल स्कीन देणार नाही..😩


मग तो प्रॉक्टर & गँबल असो

किंवा पतंजली..


सगळेच जण आपापली

दुकानं थाटून बसलेयत..


सगळं नैसर्गिक असतं...

वयोमानाप्रमाणे शरीरात

बदल होत जातात..

जुन्या मशीनला मेन्टेनन्स् करून अपटुडेट करू शकतो..

पण नवीन नाही करू शकत..


कोणत्याही टुथ-पेस्टमध्ये

नमक नसतं व कोणत्याही

टूथ-पेस्ट मध्ये नीम नसतो..


पोट सुटलंय सुटू दे, 

त्यासाठी लाज वाटू नये,

आपलं शरीर वयोमानानुसार

बदलंत राहतं..

वजन पण त्याप्रमाणे 

कमी-जास्त होत राहतं..


ईन्टरनेट , सोशल मिडीयावर

वेगवेगळ्या उपदेशांनी

उच्छाद मांडलाय..

                                                                              अमुक खा,

तमुक खा, 

गरम खा. थंड प्या, 

हे पिऊ नका, हे खाऊ नका,

कपालभाती करा,

सकाळी लिंबूपाणी प्या, 

गाईचंच दूध प्या, जोरात श्वास घ्या,

दिर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा,

उजव्या कुशीवरून उठा,

हिरव्या पालेभाज्या खा,

डाळीत प्रोटीन असतात,

नाचणी खा, 

वगैरे वगैरे.....


वरील सारे उपदेश वाचले की 

असं वाटतं, आयुष्य बेकार आहे.

धड काही खाऊ शकणार नाही..

धड जगू शकणार नाही. 

आणि मानसिक् तणावाखाली

डिप्रेशनची भर पडेल ती वेगळी...


ऑर्गेनिक, एलोवेरा, कारलं , मेथी, पतंजली, प्रॉक्टर & गँबल..

आशीर्वाद, नेस्ले, आई.टी.सी.

इत्यादी ...

कंपन्या डोक्याचा भुगा करतात. 

यांचं महागडं खाणं खाण्यापेक्षा 

मानसिक तणावंच जास्त होतो.. 


अरे आपण एकदा कधीतरी

मरणारच आहोत ना? ☘😁


नशिब अजून बाजारात अमृत

विकायला नाही आलं..🤣


मजेत रहा, पाहिजे ते, जमेल तसं 

खात रहा, व्यायाम करा

आनंदात रहा,

शरीराला त्याचं कार्य करू द्या,

मन मारून जगू नका,

कामात व्यस्त रहा,

समवयस्क, जुन्या बालमित्र-मैत्रिणींबरोबर

संपर्कात रहा...


Live life Naturally..

निसर्गाच्या☘🌿🌴🌳🌿 सान्निध्यात रहा!....


Your body is Gift of God

आयुष्य हे देवाने

दिलेली सुंदर भेट आहे.!💓🌳💧👏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi