Friday, 17 June 2022

 महिला स्वयंपूर्ण झाल्यास राज्याची जलद गतीने उन्नती

- ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

             मुंबई, दि. 17 : महिला स्वयंपूर्ण झाल्या तर राज्याची जलद गतीने उन्नती होण्यास मदत होणार आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

            मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्‍ाती अभियान अर्थात एमएसआरएलएमच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी एमएसआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, अवर सचिव माळी आदी उपस्थित होते.

योजनांविषयी जागृती करा

             महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत असणाऱ्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचवा. त्याविषयी महिलांना माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांचे कार्यक्रम घेऊन त्यांना योजनेविषयी जागृत करण्याच्या सूचना राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यक्रम घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

00000

 महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज 2022 ची8.85 टक्के दराने परतफेड

 

              मुंबईदि 17 : महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज2022 ची परतफेड दि. 18 जुलै 2022 रोजी 8.85 टक्के व्याज दराने करण्यात येणार आहेअसे वित्तीय सुधारणा सचिव शैला ए. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

             महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसूचना क्र. एलएनएफ-10,11/प्र.क्र.42/अर्थोपाय दि.13 जुलै 2012 अनुसार 8.85 टक्के महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 17 जुलै 2022 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 18 जुलै 2022 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 18 जुलै 2022 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे, यासाठी8.85 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2022 च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असे वित्तीय सुधारणा विभागाचे सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

----- ००० -----


 




निवडणुका महानगरपालिका

 महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची

23 जूनला प्रसिद्ध

            मुंबई, दि. 16 (रानिआ) : बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

            राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 जून 2022 रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 17 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

            भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

 बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास;

नव्या वास्तुचे ‘मराठी नाट्य विश्व संग्रहालय’ नामकरण करण्यास मान्यता

नगरविकास विभागाचा निर्णय

 

            मुंबईदि. 16 :- मुंबई महानगरातील बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करुन मराठी रंगमंच कलादालनाकरिता उभारण्यात येणाऱ्या वास्तूचे ‘मराठी नाट्य विश्व संग्रहालय’ करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच नगरविकास विभागाने जारी केला आहे.

            शहरातील बिर्ला क्रीडा केंद्राच्या वास्तुचा पुनर्विकास करुन मराठी रंगमंच कलादालनाच्या एकमेवाद्वितीय अशा वास्तुच्या निर्मितीकरिता १५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर महिन्यात बैठक झालीया बैठकीत बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करुन मराठी रंगमंच कलादालनाकरिता उभारण्यात येणाऱ्या वास्तूचे 'मराठी नाट्य विश्व संग्रहालयकरण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले होतेत्यानुसार नगरविकास विभागाने या केंद्राचे 'मराठी नाट्य विश्व संग्रहालयनामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

००००००


 एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्यांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य

               मुंबई, दि. 16 : शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्यात आली आहे.

            सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांत एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहील. याशिवाय 5 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार शासन अनुदानितखाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती तसेच शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेत असतील अशा विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवा करणे आवश्यक आहे.

            सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शासन अनुदानितखाजगी विनाअनुदानित महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवेची बजावणी अनिवार्य असून दंडाचा भरणा करुन सदर सेवेतून त्यांना सूट प्राप्त करता येणार नाही. सन 2021-22 आणि त्यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशित उमेदवारांना त्या-त्या वेळचे प्रचलित नियम लागू राहतील.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

आदिवासी

 Continue                                                            तसेच शिक्षकही पोहचू शकले नाहीत, तेथील विद्यार्थ्यांचा विचार करून हा एक वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला. अशा भागातील/गावातील शिक्षक अथवा गावातीलच शिक्षित तरुणांना शालेय विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तयार केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यास मदत झाली .

              प्रशासकीय सेवांमध्ये अनुसूचित जमातीच्या तरुणांची टक्केवारी वाढावी यासाठी आदिवासी विकास विभागाने स्वतंत्र योजना आणली आहे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या तरुणांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळावेत्यांचा प्रशासनात सहभाग वाढावायासाठी सन 2020-21 या वर्षापासून प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात  येत आहे.

            आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावेप्रशासनात नोकरीची संधी मिळावी विभाग योजना व उपक्रम राबविते. आदर्श आश्रमशाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आमूलाग्र बदल होणार असून आदिवासी विद्यार्थ्यांना भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण शिक्षण मिळणार आहे.

-------

 

शैलजा पाटील ,

सहायक संचालक,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 

Featured post

Lakshvedhi