Thursday, 16 June 2022

आरोग्य

 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


खूप काही *शिकण्यासारखे* पण सध्या *विस्मरण* झालेले.


१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी *धेनु ऋण मंत्र* म्हणत असे.  

धेनु (गाय) मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.


२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर *घेवडा वेल* लावावा सांगत असे. 

असे का ह्याचे उत्तरही तयार, 

म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते, *दत्तगुरु जेवण्यास येतात*, घरची घेवडा भाजी *गुरुवारी* करावी. 

घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.' 


३. अन्नाचे एक शीत तरी *सैनिकासाठी* पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग *तुळशीत अर्पण करावे*. 

देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते. 


४. *वाळवण* घालताना आज्जी *सूर्यमंत्र* म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची. 


५. रोज एकदा घरच्या झाडांना *कुरवाळून* यायची, 

*कोरफडीचे* पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, 

तर म्हणायची, 'स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. 

एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.'


६. *मुंग्यांना साखर* ठेवायची, 

म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, 

सुखात राहा, माझ्या लेकरांना डसू नका. 


७. *तुळशीला दिवा* लावायची, चिलटे, किडे नष्ट होऊन घरात येत नाहीत.

ती माझ्या घशाला अाराम देते मी तुळशीच्या पानांना उब देते.


६. लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण *कंदील आणि चिमणी च्या उजेडात* असावे आग्रह असे. 

*भाकरी* पण *चंद्रासारखी* वाटते , 

सावल्यांची भीती जाते, 

खेळ करताना मौज असते, 

अंधाराची सवय असावी, 

*'भू'मातेला* पण शांतता मिळते म्हणायची. 


७. दारातल्या *रांगोळीने* सरपटणारे प्राणी लांब राहतात. 

त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची. 


८. झोपताना तांब्याच्या तांब्यात पाणी भरून डोक्याशी ठेवायची, 

चांगले असतेच पण तापलेल्या *'भू'* चा तप्त असा भार किंवा स्पंदने तांबे घेते आणि आपल्याला *शांती देते*. 


*अजब* अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, 

अनुभव 

आणि ज्ञान 

कधी लक्षातच घेतले नाही.


ही post कोणाची आहे माहित नाही, पण छान माहिती आहे.


•••

देता आले तर पुढच्या पिढीला देण्यासारखे,

घेता आले तर पुढच्या पिढीने घेण्यासारखे.!🙏

 


 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी

             मुंबई, दि. १५ : मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षेची पात्रता आणि अभ्यासक्रमाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

परीक्षेला बसण्यासाठी पात्रता :-

 (अ) परीक्षेला बसण्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने

(i) लिपिक-टंकलेखक पदावरील नियमित सेवेची पाच वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे.

(ii) लिपिक-टंकलेखक पदाकरीता विहित केलेली सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा त्यातून सूट मिळणे आवश्यक आहे.

 (iii) स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

तसेच परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकाला विभागीय चौकशी प्रलंबित असलेले लिपिक - टंकलेखक सदर परीक्षेस बसण्यास अपात्र असतील.

 (ब) लिपिक - टंकलेखक पदावरील नियमित सेवेचा कालावधी लिपिक - टंकलेखक पदाच्या ज्येष्ठतासूचीमध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून गणण्यात येईल;

            सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरुन निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास लिपिक - टंकलेखक पदावर नियमित सेवेची ५ वर्षे सेवा पूर्ण असणारे लिपिक - टंकलेखक परीक्षेला बसण्यास पात्र असतील.

        सेवाज्येष्ठता : सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे सहायक कक्ष अधिकारी पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची सेवाज्येष्ठता ही, जे उमेदवार विहित कालावधीत ३० दिवसाच्या आत रुजू होतील, त्यांच्या बाबतीत नियतवाटपाच्या आदेशाच्या दिनांकापासून आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारसक्रमानुसार निश्चित केली जाईल.

            प्रश्नपत्रिका पेपर 1 मध्ये तीन भाग असून भाग १ इंग्रजी, भाग 2 मराठी, भाग 3 सामान्य ज्ञान, शासकीय योजना व शासनाशी संबंधित बाबी. यासर्व विषयांसाठी एकूण गुण 100 असतील. कालावधी एक तास असेल. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. पेपर 2, विषय कार्यालयीन कामकाजाचे ज्ञान व पद्धती यासाठी एकूण गुण १०० असणार आहेत. प्रश्नपत्रिका कालावधी एक तास आहे. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल.

000

 महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण जुलैमध्ये

- मंत्री विजय वडेट्टीवार

पुढील वर्षापासून या पुरस्कारांसाठी प्रत्येक महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्थांची निवड 

 

            मुंबईदि. १५ : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिकशैक्षणिकआर्थिक व संघटनात्मक विकासासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक, समाज सेवक व्यक्ती तसेच संस्थांना 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गत सहा वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढील वर्षांपासून सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एका संस्थेची निवड केली जाणार असल्याची माहिती, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            दि. ८ जून २०१६ रोजी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला होता. त्यानुसार २०१६ - १७, २०१७ - १८२०१८ - १९२०१९ - २०२०२० -२१२०२१- २२ या सहाही वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते.

            २०१६-१७ प्रा. मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद, २०१७-१८ श्री. अभय मनोहर कल्लावार, नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान ता. अहमदपूर, जिल्हा लातूर२०१८-१९ श्री. विठ्ठल ताकबिडे, नांदेड, २०१९ - २० श्री. उमाकांत गुरूनाथ शेटे पुणेसंस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, फुलकळस ता. पुर्णाजिल्हा परभणी२०२० -२१ श्री. रामलिंग बापूराव तत्तापूरे लातूरसंस्था म्हणून तीर्थक्षेत्र आदी मठ संस्थान धारेश्वर, पोस्ट दिवशी खुर्द, ता. पाटण, जिल्हा सातारा२०२१-२२ डॉ. यशवंतराव बाबाराव सोनटक्के, नवी मुंबई, संस्था म्हणून सारथी प्रतिष्ठान, शिवकृपा बिल्डींग, बसवेश्वर नगर, नांदेड या पुरस्कार विजेत्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

            संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला ५१/- हजार रोख व व्यक्तीला २५/- हजार रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ पुरस्कार म्हणून दिले जातील.

             पुरस्कार वितरणास या क्षेत्रात कार्य करणारे कलावंतसाहित्यिकसमाज प्रबोधनकारसमाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.

******

संध्या गरवारे/विसंअ/

शिक्षण


 

राष्ट्रपती निवडणूक

 राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

            मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने आज राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या १५ जून २०२२ रोजीच्या राजपत्रात पुनर्प्रसिद्ध करण्यात आली आहे.

            राष्ट्रपती निवडणूक-२०२२ च्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची बुधवार, दि. २९ जून २०२२ अंतिम तारीख असणार आहे. नामनिर्देशन पत्राची गुरुवार दि. ३० जून २०२२ रोजी छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख शनिवार दि. २ जुलै २०२२ राहणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास सोमवार दि. १८ जुलै २०२२ रोजी निवडणूक होईल, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर यांनी कळविले आहे.





 

Featured post

Lakshvedhi