Tuesday, 14 June 2022

वटपौर्णिमा

: *वटपौर्णिमेला वडाचीच पूजा का करायची?*


आपल्याकडे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची प्रथा आहे. 

   ज्येष्ठ महिन्यात वडाच्या पारंब्याना कोंब फुटायला सुरवात होते. पावसाळ्यात हे कोंब चांगले मोठे होतात.  पावसाळ्यात हवेतील बदलामुळे पचन शक्ती मंदावते,अशक्तपणा असतो. त्यामुळे ह्या दिवसात काही वेळा जुलाब होतात. वडाच्या पारंब्या ह्या जुलाबाचे उत्तम औषध आहे. वडाच्या पारंब्या हाताशी असल्याने मुले,मोठेसुध्दा लोंबकाळून झोका घेतात. त्यावेळी हे कोंब नष्ट होण्याची शक्यता असते.  पूजा करताना झाडाला दोरा बांधण्याची प्रथा आहे. खरे पाहता दोरा पारंब्याना बांधायला पाहीजे. म्हणजे पारंब्याच्या कोंबाचे रक्षण होईल.आणि पावसाळ्यात होणारे जुलाब थांबवायला वैद्य लोकांना मिळतील. हे त्या पूजेच्या मागचे शास्त्र आहे

  हल्लीतर शहरात वटपौर्णिमेला वडाच्या छोट्या फांद्यांचे तुकडे विकले जातात.आणि बायका घरीच वडाची पूजा करतात. ही सोय झाली.

 *माझी सर्व भगिनीना विनंती आहे की, तुम्ही वडाच्या फांदीची जरूर पूजा करा. पण दुसरे दिवशी ती फांदी टाकून देऊ नका. फांदीचे स्वच्छ धुऊन पाना सकट शक्य होईल तितके बारीक तुकडे करा व ते वाळवून त्याची मिक्सरमधे जमेल तशी पावडर करून ठेवा पावसाळ्यात घरातील कोणाला जुलाब झाल्यास त्या पावडरचा काढा करून द्या.  ह्यामूळे जुलाब लागले की हाॅस्पिलटमधे अॅडमीट होणे, वेगवेगळ्या टेस्ट करणे, सलाईन, इंजक्शने वगैरे न लागण्याची व  पैसेही वाचण्याची शक्यता आहे*.

अरविंद जोशी . B.Sc.पुणे.942194889.                                            *वटसावित्री*! 

*नवीनच लग्न झालेल्या* एका *मित्राकडे* बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी *वटसावित्रीची पौर्णिमा* होती. मी सहज *नवीन वहिनींना प्रश्‍न केला*, काय वहिनी! *झाले का बुकिंग*?तर *ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे*.असल्या *अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही*.

 सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, *‘सांग बाबा काही समजावून*!’ असे होते. मग *म्हणालो ‘वहिनी’ बसा*! *विज्ञाननिष्ठा म्हणजे काय* हो?


 *कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना*? त्या म्हणाल्या *हो! बरोबर*.

 मी म्हणालो, *मग आता सांगा* *वडाचीच पूजा का करायची*? *आंबा, फणस, जांभूळ* वा *बाभळीची का नाही*? मी म्हणालो,

 मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. *ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची* *श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही*? *ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती*? मग मी म्हणालो, *हे काहीच माहिती नाही*? *कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही*! तर *मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता*? *बिचारीजवळ उत्तर नव्हते*. अनेकांजवळ नसते. 

*शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका*.


 *जगात सर्वात दाट सावली असते वडा ची*. वडाच्या *पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते*. त्यामुळे *वडाखालील जमीन सदैव ओलसर असते*. याचसाठी *वडाची सावली अद्भुत गुणकारी* आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-

 कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌

 | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌

*|*अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते*. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता*.

 *वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य* जगात *सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड*.


 *ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला*. *गरमीने त्रासला*. *प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले*. 

*त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात* आणि *उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले*. हे आहे *पतीचे प्राण वाचविणे*. *बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:*

|’ प्रकारातील *समजायची असते*. *ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा*!

ती म्हणाली *याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट.* 

*सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही*. हा *जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे*.

 *जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात*. *जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.*

 *संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे.* म्हणून *तर ‘तप’ १२ वर्षे*. *नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या*.

 *१२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात*. *जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी.* *नवा देह*.

 *असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे*. पूर्वी *विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे*!’ अर्थात *पती १६+८४=१०० वर्षे जगू देत*.

 *शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे*. *वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला*. 

*आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय*? *याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा*!’


*खूपच छान माहिती* 👌🙏

*नक्की वाचा* 🙏

स्वामी

 *🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏*


      *🙏सामर्थ्यवान प्रार्थना🙏*


या प्रार्थनेला सुमारे एक मिनिट लागतो!

प्रामाणिकपणे प्रार्थना करा.


*स्वामीं देवा मी ही प्रार्थना वाचत असताना देखील मला आशीर्वाद द्या, ! व हा संदेश एका विशिष्ठ मार्गाने पाठविणाऱ्या व्यक्तीलाही आशीर्वाद द्या करुणा सागरा,*

*आमच्या आयुष्यात आज अलौकिक अध्यात्मिक दरवाजे उघडा..कृपासिंधु,*

*देवा स्वामी समर्था,आपल्या आत्म्याचा,चेतनेचा एक दुप्पट भाग आम्हाला द्या,जेणेकरून आम्ही परत मिळवू ,आमचे भावनिक आरोग्य,शारीरिक स्वास्थ्य,आर्थिक स्थिति, परस्पर संबंध,मुले, व्यवसाय,नोकरी,घरे, आणि वैवाहिक आयुष्य.*

*मी आपले आभार मानू इच्छितो हे दयाघना! कारण जोपर्यंत तूम्ही म्हणत नाही की "सारं संपलंय"तोपर्यंत काहीही संपत नाही..हा ठाम विश्वास आहे कारण ब्रम्हांडनायक तुम्हीच आहात.*

*देवा स्वामी समर्था, तुमच्या कृपेने*

*आमची कुटुंबे आशीर्वादित आहेत;*

*आमचे आरोग्य उत्तम आहे;*

*आमचे वैवाहिक आयुष्य उत्तम आहे;*

*आम्हाला सर्व आर्थिक आशीर्वाद आहेत;*

*आमचे व्यवसाय उत्तम आहेत;*

*आमच्या नोकऱ्या उत्तम आहेत;*

*आमचे निर्णय आशीर्वादित आहेत.**

*चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि आणखी येऊ घातलेल्या आहेत.*

*आमच्या अंतःकरणातल्या सर्व इच्छा वाटेवर आहेत; ज्या आमच्या आयुष्यासाठी,तुमच्या परिपूर्ण इच्छेनुसार आणि योजनेनुसार आहेत !*

*तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.*

🙏


(या प्रार्थनेची प्रार्थना करा,आणि मग ही प्रार्थना आपणाला माहीत असलेल्या प्रत्येकाला पाठवा.)

काही तासांतच,अगणित लोकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली असेल आणि तुम्ही कारणीभूत असाल,असा लोकसमुदाय वाढविण्यासाठी जो एकमेकांकरिता देवाला प्रार्थना करत असेल !

*🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏*

महिला लोकशाही दिंन

 प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन

महिला व बालविकास अधिकारी यांचे अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई दि. 13 : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे.

            समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना त्वरीत न्याय मिळावा यादृष्टीने त्यांच्या तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी दि. 4 मार्च 2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

            कोविड निर्बंधांमुळे यात खंड पडला होता. परंतु शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे.

            महिला लोकशाही दिनासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, 1 ला टप्पा, 2 रा मजला. आर. सी. मार्ग चेंबुर - 71 येथे उपलब्ध आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज हा महिला व बाल विकास विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन ही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 022-25232308 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महिला व बालविकास अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Monday, 13 June 2022

पाऊस

 पहिल्या पावसातील मृदगंधाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३०)

पहिल्या पावसाची आतूरता माणसापुरतीच मर्यादित नाही. जमिनीतून बाहेर पडणारे चिमुकले कीटक, मुंग्या, असंख्य पक्षी, प्राणी, गवत, वनस्पती, बुरशी, शेवाळ अशा सर्वांनाच पावसाची ओढ असते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे स्वत:च्या प्रजातीचा करावयाचा विस्तार. आपल्या पश्चातही आपली प्रजाती आणि आपला वंश / अंश टिकून राहावा यासाठीची ही धडपड! ती दृश्य जीवांची असते तशीच अदृश्य जीवाणूंचीसुद्धा. गंमत म्हणजे, या जीवाणूंचाच संबंध पहिल्या पावसातील मातीच्या सुगंधाशी म्हणजे मृदगंधाशी आहे. या मृदगंधाने अनेक कल्पना, कवितांना जन्म दिला. पण त्याचा संबंध एका सूक्ष्मजीवाशी आहे. त्याचीच ही गोष्ट.


संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Soil-Smell-Reason


भवताल वेबसाईट वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी मालिकेतील ३० वी गोष्ट!

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

(इतरांसोबत शेअरही करा.)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com



रक्त दान

 ऐक्यासाठी रक्तदान...

            रक्तदान अनमोल आहे. आपले रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकते. रक्ताची गरज कोणाला कधीही आणि कुठेही लागू शकते. त्यामुळे करुन “दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे” हे व्रत सर्वांनीच अंगिकारणे गरजेचे आहे.

            Donating blood is an act of solidarity. Join the effort and save live, असे जागतिक आरोग्य संघटनेचे यंदाच्या वर्षीचे रक्तदान दिनानिमित्तचे घोषवाक्य आहे. रक्तदानाबाबत जाणिव जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिन’ साजरा केला जातो.

            संशोधक कार्ल लॅन्डस्टायनर यांचा १४ जून हा जन्म दिवस. त्यांनी ABO रक्तगटाचा शोध लावला. ‘जागतिक रक्तदाता दिन’ प्रथम सन २००४ मध्ये साजरा करण्यात आला आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने दरवर्षी हा दिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. रक्तदान करुन रुग्णांसाठी life saving gift दिलेले आहे अशा दात्यांचे व रक्तदान शिबीर संयोजक यांनी रक्तदान शिबीरे आयोजित केल्याबाबत त्यांचे आभार मानणे व युवा वर्गामध्ये नियमितपणे स्वैच्छिक रक्तदान करण्यासाठी जनजागृती निर्माण करणे आहे.

            राज्यात स्वैच्छिक रक्तदानाची टक्केवारी ९९.०७% आहे. महाराष्ट्र राज्य देशामध्ये रक्तसंकलनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. राज्यामध्ये ३६१ रक्तकेंद्र आणि ३६१ रक्त साठवणूक केंद्रे आहेत. कोविड -१९ महामारीचा काळ असताना देखील महाराष्ट्राने अनुक्रमे १५.२८ व १६.७३ लाख युनिट रक्त संकलन केले. देशातील अव्वल क्रमांक कायम ठेवला.

रक्तदानाचे महत्त्व

            जग प्रगत झालेले असतानाही रक्ताला कुठलाही पर्याय शोधता आलेला नाही. माणसाला फक्त माणसाचेच रक्त लागते. जगामध्ये दर दोन ते तीन सेकंदाला कुणाला ना कुणालातरी रक्ताची गरज भासते. आजकाल धावपळीच्या काळात दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढते आहे. अपघात, छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया, प्रसुतीदरम्यान रक्तस्त्राव, विविध आजार, तसेच थॅलेसिमिया सारखे रक्ताशी निगडीत इतर आजार, मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती, या कारणांमुळे रक्त व रक्तघटकाची मागणी वाढते आहे.

            रक्तदानास “द्रवरूपी अवयवदान” (fluid transplant) म्हणून संबोधले जाते, कारण रक्त व रक्तघटक दिल्यामुळे लाखो रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे रक्ताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

            नियमित रक्तदाते व रक्तदान शिबिर संयोजक यांच्या सहकार्यामुळे, महाराष्ट्रात स्वैच्छिक रक्तदानाची चळवळ चांगल्या प्रकारे रुजली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये रक्त संकलनामध्ये आघाडीवर आहे. कोरोना सारख्या आजाराच्या संक्रमण काळातही रक्त संकलन १६.७३ लाख युनिट होते.

रक्त संक्रमण सेवा मजबूत

             महाराष्ट्रामध्ये रक्त संक्रमण सेवेसाठी सद्यस्थितीत ३६१ रक्तकेंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी ७६ रक्तकेंद्रे शासकीय क्षेत्रातील आहेत तर उर्वरीत २८५ रक्तकेंद्र धर्मदाय संस्था, खाजगी संस्था व इंडियन रेड क्रॉस संचलित आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पातळीवर ३६१ रक्त साठवणूक केंद्र आहेत. एवढ्या मोठया प्रमाणात रक्त सेवेच्या पायाभूत सुविधा व जाळे असणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे.

            एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त सेवेच्या पायाभूत सुविधा व जाळे असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. रक्ताची आयुमर्यादा (shelflife) फक्त ३५ दिवस असल्याने एकाचवेळी ज्यास्तीचे रक्त संकलन करता येत नाही. यामुळे रक्तदात्यांनी विशेषतः युवा वर्गाने नियमित म्हणजे दर तीन महिन्याला रक्तदान करावे.

रक्तदान करणे सहज सोपे

            रक्तदान करणे सुलभ प्रक्रिया आहे. त्यासाठी केवळ १० मिनीटे लागतात. आपल्या शरीरामध्ये ४ ते ५ लिटर रक्ताचा साठा असतो. ३५० मिली म्हणजे शरीरातील एकूण रक्ताच्या ५% रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे वर्षातून ४ वेळा तरी १८ ते ६५ वयोगटातील निरोगी व्यक्तींनी रक्तदान करावे. एका रक्तदानातून तुम्ही ४ व्यक्तींना जीवनदान देऊ शकता. १८ ते ६० वयोगटातील आणि ४५ किलोपेक्षा जास्त वजन असणारी कोणतीही व्यक्ती रक्तदान करु शकते. मात्र वैद्यकीय तपासणी करुन दाता रक्त देण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करावे.

स्वतःचे रक्त वापरणे

            कोणताही व्यक्ती आपले स्वतःचे रक्त स्वतःसाठी वापरु शकतो. पुर्वनियोजित शस्त्रक्रिया असणारी व्यक्ती अगोदर रक्तदान करुन शस्त्रक्रियेदरम्यान रक्त वापरु शकतो. यामुळे ऐनवेळी धावपळ करावी लागत नाही. संक्रमणाची शक्यता नसते. स्वतःचे रक्त अत्यंत सुरक्षित असते, रक्तदान कोणत्याही शासनमान्य पेढीतच करावे.

             ( लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय येथे वरिष्ठ सहायक

जय हो

 बालगृहातील 144 विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले अभिनंदन


            मुंबई, दि. 13 : नुकत्याच झालेल्या उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेत राज्यातील बालगृहातील 144 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळविले आहे. यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

            मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी बालगृहातील या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले व या मुलांनी केलेल्या अविरत अभ्यासामुळे हे यश मिळाले आहे. बालगृहातील मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत नेहमीच घेतली जाते. या मुलांना शिक्षणासाठीही विभागामार्फत मदत व मार्गदर्शन केले जाते.

            राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते, असे मंत्री ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

            राज्यात पुणे जिल्ह्यातील बालगृहातील सर्वाधिक 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबई शहरातील 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कला शाखेतील 2 विद्यार्थ्यांनी 75 ते 85 टक्के गुण मिळविले आहेत. वाणिज्य शाखेतील 11 विद्यार्थ्यांनी 65 ते 75 टक्के गुण मिळविले आहेत. विज्ञान शाखेतील 3 विद्यार्थ्यांनी 75 ते 85 टक्के गुण मिळविले आहेत.

------

पर्यटन

 केरळमध्ये पर्यटन खात्याने लाटांवर उभारला तरंगता पूल.

आता अनुभवा लाटांवर चालण्याचा मज्जा!


!

Featured post

Lakshvedhi