Saturday, 28 May 2022

 दिलखुलास' कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे

सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या मुलाखतीचे पुनःप्रसार.

            मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या विशेष मुलाखतीचे पुनःप्रसारण होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या सोमवार दि. 30 मे रोजी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            पर्यटन संचालनालयाच्या स्थापनेमागचा उद्देश, भूमिका आणि रचना, राज्यात युनेस्कोने जाहीर केलेली पर्यटनस्थळे, पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि योजना, पर्यटन संचालनालयाची प्रसिद्धी मोहीम, कृषी पर्यटन धोरण, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या उपाययोजना आदी विषयांची माहिती डॉ. सावळकर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.


००००००



 


 *🍁वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो*


🌷🌷 *शुभ सकाळ*🌷🌷

 : *जिथे दान देण्याची सवय असते*

*तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे* 

*माणुसकीची शिकवण असते.....*

*तिथे*

*माणसांची कमी नसते👈.....*

            🌹 *शुभ सकाळ* *🍁वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवते.









 


 

सावित्री ची पूजा

 


वटवृक्षांची तोड आणि पिकांचे नुकसान,यांचा संबंध दाखवणारी गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी १९)

गेल्या १० - १५ वर्षांमध्ये रस्त्या रुंदीकरण आणि विकासकामे यांच्यासाठी सर्वाधिक बळी गेला तो झाडांचा, विशेषत: पाऊणशे-शंभर वर्षांहूनही जुन्या वडाच्या झाडांचा. ही झाडे तोडल्यामुळे नेमके काय घडले? याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की ही झाडे कमी होत गेली, तसे वटवाघुळांचे फळबागांवरील हल्ले कित्येक पटीने वाढले आहेत. ही परिस्थिती कमीअधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळते… वडाची झाडांची तोड आणि पिकांचे होणारे नुकसान, यांचा संबंध दाखवून देणारी ही गोष्ट.


भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही एकोणिसावी गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Tree-Cutting-Bat-Attacksl

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Featured post

Lakshvedhi