Saturday, 28 May 2022

 दिलखुलास' कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे

सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या मुलाखतीचे पुनःप्रसार.

            मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या विशेष मुलाखतीचे पुनःप्रसारण होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या सोमवार दि. 30 मे रोजी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            पर्यटन संचालनालयाच्या स्थापनेमागचा उद्देश, भूमिका आणि रचना, राज्यात युनेस्कोने जाहीर केलेली पर्यटनस्थळे, पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि योजना, पर्यटन संचालनालयाची प्रसिद्धी मोहीम, कृषी पर्यटन धोरण, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या उपाययोजना आदी विषयांची माहिती डॉ. सावळकर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.


००००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi