Friday, 27 May 2022

 ---संग्राहक विजय डोंगरे

*वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती : A.A.A.D.D.*

*{Age-Activated Attention Deficit Disorder}*

आता ही वृत्ती म्हणजे काय ते माझ्याच उदाहरणाने पाहू या.

एकदा मी बागेला पाणी घालायचे ठरविले. रबरी नळी नळाला जोडून ती उलगडत बागेकडे जातांना माझं लक्ष माझ्या कारकडे गेलं आणि ठरवलं. कार धुवायला हवी.! 

म्हणून मी माझा मोर्चा गॅरेजकडे वळवला तोच माझं लक्ष जिन्याजवळच्या टपाल पेटीकडे गेलं.

म्हटलं आता आधी काय टपाल आलंय ते आधी पाहूया आणि मग कार धुवूया.!

टपालपेटीवर कारची चावी ठेवून, टपालपेटीतले सर्वच टपाल दोन्ही हातात घेऊन मी घरी आलो. सर्व पाकिटे एक एक करुन उघडीत, निरुपयोगी कचरापेटीत टाकायची पत्रे एका बाजूला टेबलावर ठेवली.

ती टेबलाखालच्या डब्यात टाकण्यासाठी बघतो तर तो डबा कागदपत्रांनी तुडूंब भरलेला.! 

मग टाकायची पत्रं टेबलावर ठेऊन तो डबा प्रथम कचराकुंडीत रिकामा करायला खाली जिन्याजवळ जायचं ठरवलं.

आता खाली जातोच आहे तर तिथे जवळच बिलांचे चेक टाकायची पेटी आहे, त्यात आताच चेक टाकावे असं ठरवलं.

चेक लिहायला घेतल्यावर एकच चेक शिल्लक असल्याचे कळले. दुसरे चेकबुक घ्यायला कपाटाकडे वळलो तर टेबलाकडे नजर गेली आणि बरेच दिवसांपासून शोधत होतो तो माझा वाचायचा चष्मा दिसला.

तो उचलून जागेवर ठेवणार, इतक्यात त्याच्याजवळ फ्रीजमध्ये ठेवायची पाण्याची बाटली रिकामी पडलेली दिसली. 

तेव्हा आताच ती पाणी भरुन फ्रीजमध्ये टाकावी म्हणून उचलून मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे ओट्यावर कुणी टी.व्ही. चा रीमोट ठेवला होता.

मनात विचार आला की संध्याकाळी टी.व्ही. लावतांना रीमोट कुठे आहे ते आठवणार नाही. तेव्हा आताच तो टिपाॅयवर ठेवावा. पण तत्पुर्वी बाटली पाण्याने भरावी. तेव्हढ्यात ती काचेची बाटली माझ्या हातातून सटकली आणि खाली लादीवर पडून फुटली.!

लादीवरचे काचेचे तुकडे गोळा करुन लादी पुसतांना विचार करायला लागलो.

मी बागेला पाणी घातलं नाही,

कार धुतली नाही,

डबा कचराकुंडीत रिकामा केला नाही,

बिलांचे चेक टाकले नाहीत,

वाचायचा चष्मा, रीमोट जागेवर ठेवले नाहीत,

कारची चावी कुठे ठेवली तेही आठवत नाही.!

माझा सगळा दिवस कामाच्या घाईगडबडीत गेला आणि माझी खूपच दमछाक झाली. तरी एकही काम धड झालं नाही, असं का.?

अशी धरसोड वृत्ती वयपरत्वे सर्वच व्यक्तींना येईल असे नाही. खालील गोष्टींचा अवलंब केल्यास ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

१. शारीरिक व मानसिक द्दष्टीने सक्रीय रहावे.

२. कामाचे नियोजन करावे. करावयाच्या कामांची यादी करुन कामांचा प्राधान्यक्रम लावावा. 

३. प्राधान्यक्रम लावतांना केवळ तातडीची कामेच नव्हे तर महत्वाची कामेही लक्षात घ्यावी.

४. खिशात/पर्समध्ये आणि घरात हाताशी मिळेल अशा जागी, एक छोटी वही व पेन ठेवावे आणि कधीकधी अचानकपणे एखादी गोष्ट करायची आहे ते डोक्यात येते, तेव्हाच त्याची नोंद करावी. कधीकधी अशा गोष्टीचे थोड्याच वेळात विस्मरण होते आणि आठवण्याचा खूप प्रयत्न करुनही अाठवत नाही, म्हणून मन अस्वस्थ होते.

५. एका वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करु नये. एकच काम हाती घेऊन, ते पूर्ण केल्याशिवाय दुसरे काम हाती न घेण्याची सवय करावी.

६. स्वयंशिस्त बाळगावी.

७. वय वाढते तसे 'मन धावते, पण शरीर धावू शकत नाही' याचेही भान ठेवावे. शारिरीक हालचाली झेपतील अशाच गतीने कराव्या. 

८. सर्व कामे स्वतःच करण्याचा हट्ट धरु नये. काही कामे दुसऱ्या व्यक्तींवर सोपवावयास मनाची तयारी करावी. 

९. कामे उरकायची आहेत, हा विचार ताणतणाव निर्माण करतो. मात्र प्रत्येक काम करण्यातील आनंद घेत काम केल्यास वेळ मजेत जाईल. 

१०. प्राणायाम व ध्यानधारणा यांचा मन स्थिर ठेवण्यास उपयोग करा.

*तुमच्या मित्रांसाठी, आप्तेष्टांसाठी जरुर पुढे पाठवा.*


🙏🙏🙏🙏

 World's largest lift installed in Jio office .BKC Mumbai, Capacity 200 person


बडबड करा

 *तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसतसे अधिक बोला*


   असे डॉक्टर सांगतात. * सेवानिवृत्तांनी (ज्येष्ठ नागरिकांनी) अधिक बोलले पाहिजे कारण सध्या स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. अधिक बोलणे हा एकमेव मार्ग आहे. *

  ज्येष्ठ नागरिकांशी अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत.

    *प्रथम:* बोलण्याने मेंदू सक्रिय होतो आणि मेंदू सक्रिय राहतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात, विशेषत: पटकन बोलत असताना, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांचे प्रतिबिंब जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. जे ज्येष्ठ नागरिक बोलत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.


    *दुसरे:* बोलल्याने बराच ताण दूर होतो, मानसिक आजार टाळतो आणि तणाव कमी होतो. आपण अनेकदा काहीही बोलत नाही, पण आपण ते आपल्या हृदयात दडवून घेतो आणि आपला गुदमरतो._हे खरे आहे! तर! वरिष्ठांना अधिक बोलण्याची संधी दिल्यास आनंद होईल.


    * तिसरा: * बोलण्यामुळे चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो आणि त्याच वेळी घशाचा व्यायाम होतो आणि फुफ्फुसाची क्षमता देखील वाढते, त्याच वेळी डोळे आणि कान खराब होण्याचा धोका कमी होतो आणि चक्कर येण्यासारखे सुप्त धोके कमी होतात. . आणि बहिरेपणा.


   *थोडक्यात, सेवानिवृत्त, म्हणजेच ज्येष्ठ नागरिक* अल्झायमरपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शक्य तितके बोलणे आणि लोकांशी सक्रियपणे संवाद साधणे. त्यावर दुसरा उपचार नाही. *

   *म्हणून, आपण अधिक बोलूया आणि इतर ज्येष्ठांना नातेवाईक आणि मित्रांसोबत अधिक बोलण्यास प्रोत्साहित करूया...👍* सौजन्य FB

बडबड

 

Name: Shriyan Naik

Age: 7

मधाची गोष्ट


 सह्याद्रीतील आदिवासींच्या मधाची गोष्ट!


(भवतालाच्या गोष्टी १८)

आग्या मोहोळ हे उंच कड्याला लागते. ते काढायला किमान आठ-नऊ लोकांचा गट असतो. त्यात सर्वजण रक्ताच्या नात्याचे असतात. कमरेला दोर बांधून खाली टांगता राहणारा व तो दोर गच्च पकडून ठेवणारा या दोघातील नाते बर्‍याचदा मेव्हण्याचे असते. त्यात जबाबदारीची जाणीव अधिक प्रबळ होत असावी... पोळे सील झाले म्हणजे मध साठवलेले पोळे माश्यांनी पांढर्‍या स्रावाने बंद केले की तो मध पक्व झाल्याचा संकेत असतो...

आदिवासींच्या मध गोळा करण्यामध्ये अशा अनेक प्रथा, रिती, ज्ञान, किस्से आहेत. त्यांची माहिती घेणे म्हणजे त्यांचे भावविश्व समजून घेणे. गेल्याच आठवड्यात ‘आंतरराष्ट्रीय मधमाशी दिन’ होता. त्यानिमित्त सह्याद्रीतील आदिवासींची मध गोळा करण्याची ही गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Tribal-Honey-Story

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही अठरावी गोष्ट.

भवतालविषयक दर्जेदार माहितीसाठी उत्तम पर्याय - bhavatal.com

(इतरांसोबत शेअरही करा.)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 नाव दावोसला जाण्याचं, मात्र जनतेच्या पैशावर सैर करण्याचे हे उद्योग

 - आ. अतुल भातखळकर यांची मविआ मंत्र्यांच्या दौर्‍यावर कडाडून टीका

मुंबई, दि. 27 मे (प्रतिनिधी)

            मविआचे मंत्री दावोसला केवळ भारतीय कंपन्यांशी करार करण्याकरिता गेले होते का? अथवा दाओस दौर्‍यामध्ये अन्य किती कंपन्यांशी करार केला याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी तसेच केवळ दोन भारतीय कंपन्यांशी करार केले असल्यास या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा या सर्व मंत्र्यांकडून वसूल करण्यात यावेत अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर यांनी केली.


             महाविकास आघाडी सरकारचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, त्याचबरोबर ऊर्जा मंत्री नितीन राऊत व उद्योग मंत्री सुभाष देसाई हे सर्वजण दाओसला जाऊन भारतीय कंपन्यांबरोबर करार करून परत आले. यावेळी त्यांनी एक कंपनी गुरगावातील Renewable Energy ज्याच्याबरोबर हजारो कोटींचे करार केले तर दुसरी शैक्षणिक कंपनी, Byju ज्याच्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांकरिता MOU केला गेला. जर परदेशात जाऊन भारतीय कंपन्यांबरोबर MOU करायचे होते तर त्याच्याकरिता जनतेच्या पैशाचा चुराडा करून दावोसला जाण्याची आवश्यकता काय होती? असा सवाल आ. भातखळकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. नाव दावोसला जाण्याचं, मात्र जनतेच्या पैशावर सैर करण्याचे हे उद्योग असल्याची टीका आ. भातखळकर यांनी केली. त्यामुळे दावोसला जाऊन अन्य किती कंपन्यांशी करार केले याची माहिती जनतेला द्यावी आणि या दोन कंपन्यांशी करार केले असतील तर दावोसच्या दौऱ्यावर जनतेच्या पैशातून जो खर्च झालेला आहे तो सर्व खर्च जनतेला परत देण्यात यावा आणि हे पैसे तिन्ही मंत्र्यांकडून वसूल करण्यात यावेत अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केली.

 मा. अमित शहा यांनी बंद दरवाजाआड वचन दिलं होतं”, हे खोटं कोण बोलतंय

हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले आहे

 - आ. अतुल भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

            जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी खोटं बोलू शकतात, ते मा. अमित शहा यांच्याशीही बोलू शकतात. “त्यामुळे बंद दरवाजाआड वचन दिलं होतं” हे खोटं कोण बोलतंय हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले आहे अशी बोचरी टीका भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

              जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी, ते सुद्धा त्यांच्या विषयाकरिता खोटं बोलू शकतात, असे मुख्यमंत्री मा. अमित शहा यांच्याशी तर सहजतेने खोटं बोलू शकतात हे आज पूर्णपणे सिद्ध झाले आहे अशी टीका आ. भातखळकर यांनी यावेळी केली. तसेच कुठल्याही मुख्यमंत्रीपदाचे वचन हे त्यांना दिले गेले नव्हते परंतु केवळ सत्तेच्या लालसेपायी स्वतः मुख्यमंत्री व्हायचे आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री करायचे म्हणून हिंदुत्व, मराठी बाणा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे, हेच आजच्या छत्रपती संभाजीराजेंच्या विधानांवरून सिद्ध झालेले आहे असे म्हणत आ. भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.



Featured post

Lakshvedhi