Wednesday, 18 May 2022

 टीपीएस योजनेच्या भूखंडधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार

            'नैना' क्षेत्रात टीपीएस-०१ (टाऊन प्लॅनिंग स्कीम), टीपीएस-०२, टीपीएस-०३ मध्ये मिळणाऱ्या भूखंडांचा ताबा लवकरात लवकर जागामालकांना प्रॉपर्टी कार्डसह देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने टाऊन प्लॅनिंग योजना १ आणि २ यांना मंजुरी दिलेली असून जमीन मालकाला भूखंड वाटपाचे काम सुरू केलेले आहे. वाटप केलेल्या भूखंडांची मालमत्ता पत्रके तयार करण्यात आलेली आहेत. तसेच ही प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी त्यांचे महाराष्ट्र जमीन, महसूल संहितेनुसार विहित अधिकारासह सिडकोला वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे 'नैना'तील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार असून त्यामुळे ही कारवाई जलदगतीने करणे शक्य होणार आहे.

शेतकऱ्यांकडून सुधारणा शुल्क (बेटरमेंट चार्जेस) घेणार नाही

            सिडकोमार्फत नवी मुंबई क्षेत्रात १२.०५ टक्के योजनेमध्ये १.५ चा चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येत असून २२.०५ टक्के योजनेमध्ये २.० चे चटई क्षेत्र देण्यात येतो. 'नैना' क्षेत्राचा विकास हा टाऊन प्लॅनिंग स्कीमद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यास ४० टक्के भूखंड जमीन मालकाला फ्रि होल्ड देण्यात येतो. या भूखंडावर २.५ टक्के चटई क्षेत्र मंजूर असून भूखंडधारकास त्या जमिनीचे संपूर्ण क्षेत्र म्हणजेच १०० टक्के क्षमता विकास करण्यासाठी उपलब्ध आहे. टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये घेण्यात येणाऱ्या सुधारणा शुल्काला स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याला अनुसरून आता हे सुधारणा शुल्क या जमीनीचा शेवटचा फायदा होणाऱ्या घटकाकडून वसूल करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून शेतकऱ्यांवर त्याचा कोणताही भार पडणार नाही.

            या निर्णयांमुळे एकीकडे 'नैना' प्राधिकरणाला अनधिकृत बांधकामे बांधणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. तर दुसरीकडे 'नैना'मध्ये सहभागी होण्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेली नाराजी दूर करता येणे देखील शासनाला शक्य होणार आहे.


००००



 परिक्षेतील यश कौतुकास्पद;सारथी' व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 17 :- ‘एमपीएससी’च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पहिल्या पाचपैकी 4, पहिल्या 10 पैकी 7, एकूण उत्तीर्ण 597 पैकी 198 उमेदवार 'सारथी' संस्थेचे आहेत. यावरुन 'सारथी'ची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'सारथी'च्या कामगिरीचे कौतुक केले. देशात, जगाच्या पाठीवर उद्योगक्षेत्राची गरज ओळखून रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम तरुणांनी निवडावेत. प्रशिक्षणानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. कृषी, उद्योग, आर्थिक क्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्यविकासाचे अभ्यासक्रम निवडून पूर्ण करण्यासाठी 'सारथी'ने तरुणांना मदत करावी. राज्यातील तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसायात संधी देऊन यशस्वी होण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. 'सारथी' व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’ने त्यांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, त्यांना योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिला.

            मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, 'सारथी'चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. मोहिते, राजेंद्र कोंढरे, अनंत पवार, धनंजय जाधव, आप्पासाहेब कुढेकर, गंगाधर काळकुटे हे उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 'सारथी' व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’चे कामकाज प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या.

            राज्यात छत्रपती राजाराम महाराज गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या 11 हजार 186 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत 7 हजार 674 विद्यार्थ्यांना 7 कोटी 36 लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांना मे महिनाअखेर वाटप करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीत 'सारथी' व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला. 'सारथी'च्या माध्यमातून विद्यार्थी, विद्यार्थींनींसाठी वसतीगृहांची सोय करणे, कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरु करणे, 'सारथी'ची विभागीय उपकेंद्रे सुरु करणे, तिथे पदभरती करणे आदी मुद्यांवर चर्चा झाली. ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’ला आवश्यक निधी प्राधान्याने देण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला.'सारथी'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवताना, जे अभ्यासक्रम आपल्या देशात उपलब्ध नाहीत, अशाच अभ्यासक्रमांचा विचार व्हावा. परदेशी शिक्षणासाठी निवडले जाणारे अभ्यासक्रम हे वैशिष्ट्यपूर्णच असतील, याची खात्री करण्याची सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

            'सारथी'ची पुणे मुख्यालय इमारत, कोल्हापूर उपकेंद्राची इमारत, तसेच खारघर-नवीमुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर येथील केंद्राच्या निर्मितीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

-----०००००००-----


 मोहाची दारू आणि आदिवासी विकास,


याची गुंतागुंतीची गोष्ट !


(भवतालाच्या गोष्टी १२)


 


ठाकरवाडीतला भावका भलताच नादी. मासे - खेकडे धरणार, गलोलीने पाखरू पाडणार. मोहाच्या पहिल्या धारेच्या दारूपायी रोज पहाटे शे-पाचशे फुटाचा थरारक कडा उतरून जाणार. सकाळी नऊला माघारी शेती, गुरे सांभाळायला हजर. असाच एक दिवस घाटात तोल जाऊन पडला आणि निसर्गात विलीन झाला. भावका तुमच्या आमच्या दृष्टीने व्यसनी, वाया गेलेला असेल कदाचित. पण खरोखर त्याचे भावविश्व, प्रेरणा समजावून घेतल्या तर मोहाच्या उपयुक्तता आपणास समजेल.


निसर्गपूजक आदिवासींना अलीकडे सप्ते, कर्मकांड, शाकाहार या अवडंबरात अडकवले गेल्याने त्यांच्या आरोग्याचे प्रश्न जटील होत आहेत. आदिवासींसाठी कार्यरत असलेली बहुतांश मंडळी स्थिरस्थावर मध्यमवर्गीय पार्श्वभूमीची. ते चांगल्या जगण्याच्या स्वत:च्या कल्पना आदिवासींवर लादतात. त्यात आदिवासींच्या शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक गरजा, आहार, जीवनशैली, भावविश्व यांचा विचार नसतो. मग हे आदिवासी, आपली मूलभूत कौशल्ये, उपजत प्रेरणा हरवून बसतात. परिणामी, हा समाज अशा अर्धवट स्थितीत येऊन ओळख हरवून बसतो. याला आदिवासी विकास म्हणता येईल का?




(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील बारावी गोष्ट.)


संपूर्ण वाचण्यासाठी लिंक:


https://bhavatal.com/Moha-Adivasi-Vikas


(इतरांसोबतही शेअर करा)


भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय - bhavatal.com




--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability


)

9545350862 / bhavatal@gmail.com


Tuesday, 17 May 2022

 *कूर्मजयंती 

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे

*मंदिराच्या बाहेर कासव*

 *असण्याचे महत्त्व*

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. 

 कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.


काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.


   *कासवाचे गुण*


1)कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात 


*काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर* 

कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे 


2) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे. 


3) कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.


४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.


*कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ*


कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.


आपणास माहिती आहे का कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दुध पाजत नसते तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते


 त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्या कडे वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न मागता आपल्या सर्व ईच्छा पुर्ण व्हाव्या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.


कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते,

कर्माचा सिध्दांत

 👇 कर्माचा - सिद्धांत 👇

                

*कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.*

काही लोकांना नाही पटणार हा विषय, 

पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!! ....

अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ...

जसे की  

1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,...

2) अपमानास्पद वागणुक,...

3) कोणांचे मन दुखावले असू शकते,...                     

4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,...

5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,.....

6) *छळ केलेला असेल,.....*

7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल.....

8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल......

9) शारिरीक दुखापत केलेली असेल, .......

10) विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल......                                       

11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल.....

त्रासाचे कुठलेही कारण असो...

वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते , 

जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, 

 पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही , *पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते, मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.*

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,....

*आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत* हे फक्त आपल्याला व 

*आपल्या अंतर्मनालाच माहीत असते.*

समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते, 

*तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,*

 चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,

मी एका पुस्तकात वाचले होते,

राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले,

*तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?*

 माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,

की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे? 

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.

धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली.          

   धृतराष्ट्र राजाची *त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.*

*कर्म हे फळ देऊनच शांत होते.*

प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, 

हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे, 

चांगले कर्म,चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे-पुढे होऊ शकते.

हाच कर्माचा सिध्दांत आहे.

आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे.

*"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥*

*क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट".*.                                                                                              

आणि हो महत्वाचे म्हणजे शेअर जरूर करा, चांगले विचार दुसऱ्यांपर्यत पोहोचवणे हा सुद्धा पुण्याचाच भाग आहे, कदाचित एक कर्म तुमच्या खात्यात जमा होईल,( प्रेषक -रमेश देशपांडे) (Forwarded)                                 

                              श्रीगुरुदेवदत्त !!!


                                      🙏राम कृष्ण हरी 🙏🏻

काळजी घ्या

 🏥👌🏻👌🏻👍

सर्वांनी सदर वैद्यकीय पोस्ट संग्रही ठेवावी!

     🌸🌼🌸🌼

*प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचे वैद्यकीय क्रमांक*

 1. रक्तदाब: 120/80

 2. नाडी: 70 - 100

 3. तापमान: 36.8 - 37

 4. श्वसन: 12-16

 5. हिमोग्लोबिन: पुरुष (13.50-18)

  महिला ( 11.50 - 16 )

 6. कोलेस्टेरॉल: 130 - 200

 7. पोटॅशियम: 3.50 - 5

 8. सोडियम: 135 - 145

 9. ट्रायग्लिसराइड्स: 220

 10. शरीरातील रक्ताचे प्रमाण: 5-6 लिटर

 11. साखर: मुलांसाठी (70-130)

  प्रौढ: 70 - 115

 12. लोह: 8-15 मिग्रॅ

 13. पांढऱ्या रक्त पेशी: 4000 - 11000

 14. प्लेटलेट्स: 150,000 - 400,000

 15. लाल रक्तपेशी: 4.50 - 6 दशलक्ष..

 16. कॅल्शियम: 8.6 - 10.3 mg/dL

 17. व्हिटॅमिन डी3: 20 - 50 एनजी/मिली (नॅनोग्राम प्रति मिलीलीटर)

 18. व्हिटॅमिन बी12: 200 - 900 pg/ml


 *जे खालील नमूद वय ओलांडले आहेत त्यांच्यासाठी टिप्स:*

    *40*

    *50*

    *60*

  आणि वर,

  *निसर्ग तुम्हाला आज्ञापालन, आरोग्य आणि निरोगीपणा देवो..*

             *पहिली सूचना:*

  तुम्हाला आजारी वाटत नसताना किंवा कोणताही आजार नसला तरीसुद्धा चुंबकीय पद्धतीचा अवलंब करा चुंबकीय वस्तू सतत आपल्या जवळ असले पाहिजे त्यामुळे शरीराचे रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते व शरीराला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतो

          *दुसरी सूचना:*

  तुम्हाला तहान लागली नाही किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या... आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतेक शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आहेत.

           *तिसरी टीप:*

  तुम्ही तुमच्या व्यस्ततेच्या शीर्षस्थानी असतानाही खेळ खेळा... शरीराला हालचाल करणे आवश्यक आहे, जरी फक्त चालणे... किंवा पोहणे... किंवा कोणत्याही प्रकारचे खेळ.

  *चौथी टीप*

 जेवण कमी करा...

  जास्त अन्नाची लालसा सोडा...कारण ते कधीही चांगले *स्वतःला वंचित ठेवू नका, पण प्रमाण कमी करा.*

          *पाचवी टीप*

  शक्य तितके, अगदी आवश्यक असल्याशिवाय कार वापरू नका... तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुमच्या पायावर पोहोचण्याचा प्रयत्न करा *(किराणा, एखाद्याला भेटणे...) किंवा कोणतेही ध्येय*.

           *सहावी टीप*

  राग सोडा...

  राग सोडा...

  राग सोडा...

  काळजी सोडून द्या... गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा...

 गडबडीच्या परिस्थितीत स्वतःला गुंतवू नका... ते सर्व आरोग्य कमी करतात आणि जगण्यातील वैभव काढून घेतात.  

          *सातवी टीप*

  म्हटल्याप्रमाणे..तुमचे पैसे उन्हात सोडा..आणि सावलीत बसा..स्वत:ला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मर्यादित करू नका..पैसा त्याच्यासाठी बनवला आहे, जगण्यासाठी नाही.

  *आठवी टीप*

  स्वतःला कोणाबद्दल वाईट वाटून घेऊ नका,

  किंवा ज्या गोष्टीवर तुम्ही साध्य करू शकत नाही,

   किंवा तुमच्या मालकीची नसलेली कोणतीही गोष्ट.

  त्याकडे दुर्लक्ष करा, विसरा;

          *नववी टीप*

 नम्रता..पैसा,प्रतिष्ठा,सत्ता आणि प्रभावासाठी..त्या सर्व गोष्टी अहंकाराने भ्रष्ट झालेल्या आहेत.

  नम्रता ही लोकांना प्रेमाने तुमच्या जवळ आणते.

           *दहावी टीप*

  जर तुमचे केस राखाडी झाले तर याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही. चांगले जीवन सुरू झाल्याचा तो पुरावा आहे. आशावादी, आठवणीने जगा, प्रवास करा, स्वतःचा आनंद घ्या.

  *((शेवटचा आणि सर्वात महत्वाचा सल्ला)*

           🙏 *स्वतःची काळजी घ्या 🙏*

सुन्दर माझे घर

 "... मम्मी, तू आणि बाबांनी खूप अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत...

 गेली *छत्तीस वर्षं* संसार केलात...

आमच्या पिढीला का गं जमत नाही हे ?

*" तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली*. 

चार वर्षं मज्जेत *बॉयफ्रेन्ड* असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी *हजबन्ड* झाल्यानंतरचा हा राग होता.

*"प्रश्न विचारलास, का ?

पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली; 

" *उत्तर हवंय*, का ?

'हो 

"उत्तर हवंय", लेक म्हणाली. 

"असे आहे न बाळा," आई सहजच म्हणाली;

"आम्ही *'कसं जमवता येईल'* ते शोधत होतो; 

तुम्ही *'जमलं तर पाहू'* म्हणताय.

"आमच्या वेळी प्रेम हे *व्हायचं*; तुमच्या काळात ते *केलं* जातं.

"आम्ही *साथीदार* व्हायचो; तुम्ही *पार्टनर* बनवता. 

"आमच्यात प्रेम ही *सहजता* होती; तुमच्यात तो *अट्टहास* झालाय.

"आमचं प्रेम *लहानाचं मोठं* व्हायचं; तुमचं प्रेम *लहानपणीच घाई* करतं. 

"आमच्या वेळी *मैत्री विश्वासात* रुपांतरीत व्हायची; तुम्ही *जवळिकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई* करताय.

"आम्ही कविता *लिहायचो*; तुम्ही त्या *फॉरवर्ड* करताय. 

"आमचे *जीवनसाथी* होते; तुमचे *बॉयफ्रेन्ड* नि *गर्लफ्रेन्ड* आहेत.

"आमचं प्रेम *आमच्यासाठी* होतं; तुमचं प्रेम *'सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहीजे',* म्हणून केलं जातंय. 

"आमचे *बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट* जाणवायचं. तुमच्यात *इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहीजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहीजे*, 

"आम्ही *गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित* करायचो; तुमच्या *गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल* याची *कैलक्युलेशन्स* असतात. 

"आम्ही *धुंद* होतो; तुम्ही *उधळलेले* आहात. 

"आम्ही *चेहऱ्यावरचं तेज* शोधायचो; तुम्ही *शर्टचा ब्रान्ड* पाहताय. 

"आम्हाला नजरेतली *समजदार चमक* भाळायची; तुम्हाला *गॉगलच्या किमती* भुरळ घालतायत. 

"आमच्या शरीरांना *पेशन्स* मंजूर होता; *तुमच्या मनालाच तो नकोय."*

..."बाळा; *जमणं - न जमणं हे क्षमतेवर* अवलंबून असतं. क्षमता *डेव्हलप* करायची

 असते..!

✍🏻✍🏻

*जगता आलं पाहिजे... मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव उजाळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पापं काय* *कसही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे.* *शहाण्याचं सोंग घेऊन, वेड होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे.* *जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...* 

*आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे*

👏🚩🙏

Featured post

Lakshvedhi