Wednesday, 18 May 2022

 मोहाची दारू आणि आदिवासी विकास,


याची गुंतागुंतीची गोष्ट !


(भवतालाच्या गोष्टी १२)


 


ठाकरवाडीतला भावका भलताच नादी. मासे - खेकडे धरणार, गलोलीने पाखरू पाडणार. मोहाच्या पहिल्या धारेच्या दारूपायी रोज पहाटे शे-पाचशे फुटाचा थरारक कडा उतरून जाणार. सकाळी नऊला माघारी शेती, गुरे सांभाळायला हजर. असाच एक दिवस घाटात तोल जाऊन पडला आणि निसर्गात विलीन झाला. भावका तुमच्या आमच्या दृष्टीने व्यसनी, वाया गेलेला असेल कदाचित. पण खरोखर त्याचे भावविश्व, प्रेरणा समजावून घेतल्या तर मोहाच्या उपयुक्तता आपणास समजेल.


निसर्गपूजक आदिवासींना अलीकडे सप्ते, कर्मकांड, शाकाहार या अवडंबरात अडकवले गेल्याने त्यांच्या आरोग्याचे प्रश्न जटील होत आहेत. आदिवासींसाठी कार्यरत असलेली बहुतांश मंडळी स्थिरस्थावर मध्यमवर्गीय पार्श्वभूमीची. ते चांगल्या जगण्याच्या स्वत:च्या कल्पना आदिवासींवर लादतात. त्यात आदिवासींच्या शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक गरजा, आहार, जीवनशैली, भावविश्व यांचा विचार नसतो. मग हे आदिवासी, आपली मूलभूत कौशल्ये, उपजत प्रेरणा हरवून बसतात. परिणामी, हा समाज अशा अर्धवट स्थितीत येऊन ओळख हरवून बसतो. याला आदिवासी विकास म्हणता येईल का?




(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील बारावी गोष्ट.)


संपूर्ण वाचण्यासाठी लिंक:


https://bhavatal.com/Moha-Adivasi-Vikas


(इतरांसोबतही शेअर करा)


भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय - bhavatal.com




--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability


)

9545350862 / bhavatal@gmail.com


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi