Friday, 13 May 2022

 कृषी पर्यटन दिनानिमित्त विशेष लेख :

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

सध्याच्या धावपळीच्या युगात विशेषतः शहरातील नागरिकांना विरंगुळा हवा असतो. परंतु हा वेळ केवळ रिकामा न घालवता त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता आले आणि त्यातही पारंपरिक आणि आधुनिक शेतीची माहिती घेता आली तर विरंगुळ्याबरोबरच माहितीपूर्ण पर्यटनाची सुवर्णसंधी साधता येईल. त्याचबरोबर शेतकरी आणि संबंधितांना रोजगार देखील उपलब्ध होईल. रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ साधण्याचा हाच प्रयत्न पर्यटन विभागाने केला आहे.

            राज्याच्या पर्यटन विभागाने नुकतेच आपले कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतोय. शेतीची कामे कशी चालतात त्याचा स्वतः अनुभव घेऊन निसर्गाशी मैत्री करण्याची संधी मिळतेय आणि निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा देखील मिळतेय. 

            आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विभाग व कृषी पर्यटन विकास कंपनी (एटीडीसी) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 16 मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी पर्यटन विकासाशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात राज्यात नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना पुरस्कृत केले जाणार आहे.

            कृषी-पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना आहे. कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थाजनाच्या संधी निर्माण होत आहेत. याद्वारे गावांचा शाश्वत विकास होईल. 2020 मध्ये धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून, गेल्या दोन वर्षांत केवळ ऑनलाइन कृषी पर्यटन परिषद झाली होती, यंदा कोविडबाबतचे नियम शिथील झाल्याने आणि उद्योगधंद्यांना संजीवनी मिळाल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यामध्ये अनेक कृषी पर्यटन केंद्र संचालकांना कृषी पर्यटन विकासासाठीच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.

            राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे नेहमी सांगतात, आपल्या राज्यात बर्फ आणि वाळवंट सोडले तर पर्यटनाच्या सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. गड किल्ले, थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे, डोंगर दऱ्यांनी संपन्न निसर्ग, ऐतिहासिक वास्तू आदींसह वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती ही देखील महाराष्ट्राची विशेष ओळख आहे. अजिंठा वेरूळ सारख्या लेण्या, बिबीका मकबरा, पाणचक्की, लोणार सरोवर, प्राचीन मंदिरे, अष्टविनायकाची ठिकाणे, देशातील ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख मंदिरे यांची जागतिक स्तरावर कीर्ती आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर रिसॉर्टच्या माध्यमातून राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

            पर्यटनाच्या या पारंपरिक साधनांना राज्याच्या पर्यटन विभागाने नावीन्यपूर्ण कल्पनेची जोड देऊन साहसी पर्यटन, कॅराव्हॅन, बीच शॅक्स, कृषी पर्यटन आदींच्या माध्यमातून पर्यटन विकासाची धोरणे जाहीर केली आहेत. यातील कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना व्यावसायिक लाभ तर होतोच शिवाय रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटनाची आणखी एक संधी उपलब्ध होत आहे.

            पर्यटन संचालनालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या 354 कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांच्या रोजगारात सुमारे 25 % वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कृषी पर्यटन केंद्रांवर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या काही लाखांमध्ये आहे. इतकेच नाही तर कृषी पर्यटनातून विशेषतः ग्रामीण भागातील सुमारे एक लाख महिला आणि तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनाला नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागल्याचे पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अनुभवायला आले आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.

            कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते. म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील मार्गदर्शक या कार्यक्रमात पर्यावरण पूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या नव्याने आणि वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ज्यांची माहिती करून घेण्यासाठी अधिकाधिक तरूणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.


 

 पोयसर सबे रुंदीकरण लवकरच होणारआ. अतुल भातखळकर यांची माहिती

मुंबई, दि. 13 मे (प्रतिनिधी)

            पावसाळ्यापूर्वी पोयसर सब वे च्या रुंदीकरणासंदर्भात पावसाळ्यापूर्वी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून काम चालू करण्यात येणार आहे. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न तसेच त्यावरील उपाययोजनांसदर्भात महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रबंधकांसोबत मुंबई सेंट्रल येथे पार पडलेल्या बैठकीत ठरल्याची माहिती आ. अतुल भातखळकर यांनी दिली. याशिवाय मालाड पूर्वेला सरकता जिना बसवण्याचे आश्वासनही रेल्वेच प्रबंधक शीलभद्र यांनी दिल्याचे आ. भातखळकर म्हणाले.


विधानसभा मतदारसंघातील देवचंद नाला तसेच परिसरातील नाले सफाई तातडीने पूर्ण करून पावसाळ्यात पाणी साठणार नाही, अशा उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी आ. भातखळकर यांनी केल्या. त्यावर पालिका आधिकाऱ्यांनी नाले सफाई तसेच पावसाळा पूर्व तयारीची झालेली तसेच सुरू असणाऱ्या कामांची माहिती दिली. यावेळी पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणार नाही, यासाठी दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील, याचा सविस्तर आराखडा तयार करावा, अशा सूचनाही आ. भातखळकर यांनी केल्या. बैठकीला महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते तसेच रेल्वेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  



 . बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन

शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज

-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

            रत्नागिरी दि. 13 : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे. अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असा आशावाद राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

            दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्ण पालवी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल महोदयांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

            या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री दादाजी भुसे तसेच भटके आणि विमुक्त व अर्ध भटक्या जाती जमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष दादा इदाते, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. इतर प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, तसेच या प्रदर्शनाचे प्रायोजक पितांबरी समुहाचे रविंद्र प्रभूदेसाई आदी समावेश होता.    

            रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. एका बाजूला डोंगररांगा दुसऱ्या बाजूला सागर किनारा असणाऱ्या या जिल्ह्याची हापूस आंब्यामुळे संपूर्ण जगभरात ओळख आहे. यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या. प्रथम श्वेतक्रांती नंतर हरित क्रांती आणि आता निलक्रांती धोरण स्वीकारण्यात आले आहे, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

            प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे व्यावहारिक ज्ञान मोठ्या प्रमाणावर आहे तर विद्यापीठात शेती विषयक विज्ञान व संशोधन आहे. याची सांगड घालण्याचा प्रयत्न या चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात व्हायला हवा असेही राज्यपाल महोदयांनी सांगितले.

            जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य वातावरण असावे यासाठी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. याचा वापर शेती विज्ञान आणि संशोधन यासाठी होणार असेल तर अभ्यासिकेची इमारत विद्यापीठास देण्याची तयारी आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

            डॉ. बाळासाहेब सावंतांसारखी व्यक्ती रत्नागिरी तालुक्यात जन्मली हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवास मी शुभेच्छा देतो असेही सामंत म्हणाले.

            यंदा मान्सून चांगला राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे आणि आताच्या स्थितीनुसार मान्सून लवकर येण्याचीही शक्यता आहे. या स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार खते आणि बियाणे पुरविण्यास शासन तयार आहे असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

            यावेळी स्वागतपर भाषणात कुलगुरु डॉ. सावंत यांनी विद्यापीठाची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील नियोजन याबाबत माहिती दिली. त्यासोबत या प्रदर्शनाच्या आयोजनाची भूमिका मांडली.

            कार्यक्रमाची सुरुवात व शेवट राष्ट्रगीताने झाला.

प्रदर्शनाचे उद्घाटन

            राज्यपाल महोदयांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन झाले. त्यांनी प्रदर्शनात पाहणी करुन शेतकरी व इतर सहभागी स्टॉल्सला भेट देवून माहिती घेतली.

            विद्यापीठात जंगल भ्रमंतीसाठी इलेक्ट्रीक वाहन घेण्यात आले आहे. यात बसून राज्यपाल महोदयांनी याबाबत विद्यापीठाचे कौतुक केले.



 राज्यपालांकडून पसायदान ओव्या ऐकून ज्येष्ठ नागरिकांना सुखद धक्का

‘चला कल्पतरूंचे आरव। चेतना चिंतामणीचे गाव। बोलते जे अर्णव। पीयूषांचे’...

            मुंबई, दि. 13 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे निघालेल्या पसायदानातील ओव्या ऐकून ज्येष्ठ नागरिकांना सुखद धक्का बसला.

            'विसावा' ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थेच्या ४० सदस्यांनी अलीकडेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी झालेल्या अनौपचारिक गप्पांच्या वेळी राज्यपालांनी त्यांना तोंडपाठ असलेल्या ओव्या सहजतेने म्हणून दाखवल्या. 





            भगवदगीतेतील काही श्लोक वारंवार उद्धृत केले जातात त्यामुळे ते लोकांच्या परिचयाचे झाले आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक, संत तुकारामांचे अभंग आदी संत साहित्यातील निवडक श्लोक देखील व्यवहारात वापरून रूढ केले पाहिजे जेणेकरून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या समाजोपयोगी उपक्रमांचे राज्यपालांनी यावेळी कौतुक केले. 

            संस्थेचे प्रतिनिधी गणेश आंबर्डेकर यांनी संस्थेतर्फे केल्या जात असलेल्या विविध सेवाकार्यांची तसेच आठव उपक्रमांची राज्यपालांना यावेळी माहिती दिली.

            यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील बांदेकर, सुरेंद्र देवस्थळी, सुलोचना बापट, उर्मिला परांजपे, सचिव राजीव पाठारे तसेच इतर सदस्य उपस्थित होते. राज्यपालांसोबत झालेल्या भेटीनंतर उपस्थितांनी राजभवनात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तू, देवी मंदिर तसेच भुयाराला भेट दिली. 

००००

A group of senior citizens from the organisation 'Visava' meets Governor

            Mumbai, 13th May : A group of senior citizens from the organisation 'Visava' had an informal interaction with Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. The Governor complimented the senior citizens for their good work for the society. After the interaction, members of the organisation had a guided tour of the heritage precinct of Raj Bhavan.

            Office bearers Sunil Bandekar, Surendra Devasthali, Sulochana Bapat, Urmila Paranjpe, Rajiv Pathare, Ganesh Ambardekar and others were present.

0000

वृत्त क्र. 1470

राज्यपालांच्या हस्ते 'प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी' पुस्तकाचे प्रकाशन

            मुंबई, दि. 13 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज लेखक व बँकर डॉ रमेश यादव लिखित 'प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी' या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. 

            यावेळी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ करुणाशंकर उपाध्याय, अद्विक प्रकाशनचे अशोक गुप्ता, हास्यकवी सुभाष काबरा, राजीव निगम, नरेंद्र सोळंकी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Governor releases the book on Banking Technology and Hindi

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the book 'Banking Technology and Hindi' authored by writer and banker Dr Ramesh Yadav at Raj Bhavan, Mumbai.

      Academician and writer Dr Karuna Shankar Upadhyaya, publisher Ashok Gupta, Subhash Kabra, Rajiv Nigam, Narendra Solanki and others were present.


००००



 ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी

गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

 

          मुंबई, दि. 13 : नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.

          राज्यातील जिल्हा परिषदपंचायत समितीग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिकानगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.

          राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेतऔरंगाबाद विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेतनाशिक विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ५.३० ते ७.३० या वेळेतकोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी २.३० ते ४.३० या वेळेतअमरावती विभागीय कार्यालयात २८ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेतनागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी ४.३० ते ६.३० या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील.

०००

 

          मुंबई, दि. 13 : नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.

          राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.


          राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत, औरंगाबाद विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नाशिक विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ५.३० ते ७.३० या वेळेत, कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी २.३० ते ४.३० या वेळेत, अमरावती विभागीय कार्यालयात २८ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी ४.३० ते ६.३० या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील.


०००


 

न ट खं ट


 

 आज सायंकाळची आठवण


भवताल कट्टा ४४


विषय -

वन्यप्राण्यांच्या गणनेची कहाणी

(महाराष्ट्राच्या दृष्टीने उन्हाळ्यातील शेवटची पौर्णिमा म्हणजे बुद्धपौर्णिमा. वन्यप्राण्यांच्या गणनेचा दिवस. या निमित्ताने वन्यप्राण्यांच्या गणनेचा इतिहास, त्याचे महत्त्व, विविध पद्धती आणि सद्यस्थिती यावर प्रकाश टाकणारा कट्टा...)

वक्ते -

डॉ. सुनील लिमये

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

शुक्रवार, १३ मे २०२२;

सायं. ७ ते ८.३०

सहभागासाठी

झूम लिंक:

https://bit.ly/3skjCTA

किंवा

भवतल फेसबुक पेजवर लाईव्ह;

पेजची लिंक:

https://facebook.com/bhavatal/

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Featured post

Lakshvedhi