पोयसर सबे रुंदीकरण लवकरच होणारआ. अतुल भातखळकर यांची माहिती
मुंबई, दि. 13 मे (प्रतिनिधी)
पावसाळ्यापूर्वी पोयसर सब वे च्या रुंदीकरणासंदर्भात पावसाळ्यापूर्वी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून काम चालू करण्यात येणार आहे. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न तसेच त्यावरील उपाययोजनांसदर्भात महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रबंधकांसोबत मुंबई सेंट्रल येथे पार पडलेल्या बैठकीत ठरल्याची माहिती आ. अतुल भातखळकर यांनी दिली. याशिवाय मालाड पूर्वेला सरकता जिना बसवण्याचे आश्वासनही रेल्वेच प्रबंधक शीलभद्र यांनी दिल्याचे आ. भातखळकर म्हणाले.
विधानसभा मतदारसंघातील देवचंद नाला तसेच परिसरातील नाले सफाई तातडीने पूर्ण करून पावसाळ्यात पाणी साठणार नाही, अशा उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी आ. भातखळकर यांनी केल्या. त्यावर पालिका आधिकाऱ्यांनी नाले सफाई तसेच पावसाळा पूर्व तयारीची झालेली तसेच सुरू असणाऱ्या कामांची माहिती दिली. यावेळी पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणार नाही, यासाठी दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील, याचा सविस्तर आराखडा तयार करावा, अशा सूचनाही आ. भातखळकर यांनी केल्या. बैठकीला महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते तसेच रेल्वेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment