Wednesday, 4 May 2022

नकोशी मालमत्ता

 *दे डाय रिच...!!*

( *नकोशा मालमत्ता* )..............

    जयंत विद्वांस

*एकीकडे तरुण पिढी स्थावर मालमत्तांपासून दूर चालली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ अजूनही स्थावर मालमत्तामध्ये मनाने गुंतून पडलेले आहेत.*

 फक्त स्वत:साठीच राहायला घर नव्हे, तर आपल्या मुलांसाठीसुद्धा घरे ज्येष्ठांनी घेऊन ठेवली आहेत. 

ज्यांची पुढची पिढी महाराष्ट्राच्याही बाहेर नव्हे तर परराष्ट्रात आहे, अशांसाठीसुद्धा पालकांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जमवून घरे घेतली आहेत. 

त्यांच्यापुढील पिढय़ांना या घरांमध्ये काडीचाही रस नाही. या मालमत्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. पुढची पिढी खूप व्यवहारी आहे.

माझे एक अशील वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वारले. पत्नीचे आधीच निधन झाले होते. एक मुलगा लंडनमध्ये आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये रहातो. त्यांचे त्या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. दोघांनाही वडिलांनी घेतलेल्या घरामध्ये स्वारस्य नव्हते. वडिलांनी इच्छापत्रानुसार सर्व मालमत्ता दोन्ही मुलांत समप्रमाणात देण्याचे लिहून ठेवले होते. मी इच्छापत्रानुसार व्यवस्थापक होतो. दोन्ही मुलांना सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यास, नंतर विकण्यास वेळ नव्हता. दोघांनी माझ्या नावाने कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून दिले. सर्व मालमत्ता विकून येणारे पैसे विशिष्ट खात्यात जमा करून त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले. 

ज्येष्ठ नागरिक आपल्या वास्तूंमध्ये भावनात्मकदृष्टय़ा गुंतलेले असतात, तशी तरुण पिढी नसते.

एका क्लाएंटने त्यांच्या निवृत्तीपश्चात राहण्यासाठी कोकणात घर बांधले होते. आई-वडिलांच्या पश्चात त्या मालमत्तेच्या सात/बारा उताऱ्यावर नावे लावण्यास मुलांना वेळ नव्हता. खेडय़ात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटत होते. हे सोपस्कार करून मिळणाऱ्या पशांमध्ये रस नव्हता. कारण त्यांचे उत्पन्न भरपूर होते. म्हणून वडिलांनाच त्यांच्या पश्चात, कोठे आड जागी घर बांधले म्हणून दूषणे देत होते.

*आपली पारंपरिक दुसरी गुंतवणूक सोने-नाणे आणि चांदीच्या वस्तूंमध्ये असते.* आणि ती सांभाळणे जोखमीचे असल्याने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. बँकेत ठेवल्याने त्याचा वापर संपतो आणि लॉकरचे भाडे व लॉकरसाठी द्यावी लागणारी ठेव रक्कम *यांनी आपण बँकेला श्रीमंत करत असतो.*

आमच्या लहानपणी सोन्याचा भाव अमुक होता. आज तो इतका वाढला, असे आपण म्हणतो. आपण मधली वर्षे मोजत नाही. *सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घ मुदतीत परतावा फक्त सात टक्के असतो.* वस्तू घडणावळ आणि वस्तू मोडताना होणारी घट विचारात घेतल्यास तो अजून कमी होतो. 

तसेच होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो तो वेगळाच.

*सोन्या-चांदीतली गुंतवणूक ही खूपदा भावनात्मक जास्त असते. त्याचा व्यावहारिक विचार केला जात नाही.*

 मग सोने घेताना शुद्ध सोने घेऊन ठेवण्याऐवजी मुली-सुनांसाठी दागिने किंवा नातवंडांसाठी दागिने या स्वरूपात केली जाते. 

खूपदा जुन्या पद्धतीचे दागिने नवीन पिढीस आवडत नाहीत. मग ते मोडून नवीन डिझाइनचे बनविले जातात. यात पुन्हा घट आणि घडणावळ जाते. 

आज बाजारांत फेरफटका मारल्यास सर्वात जास्त दुकाने मोबाइलची नंतर सोने-चांदी, कपडेलत्ते, ओषधे, खाण्याचे पदार्थ यांची असतात. त्या तुलनेत वाणसामानाची फार कमी असतात. ज्यात नफा प्रचंड ती दुकाने जास्त. स्वाभाविकपणे त्यात ग्राहकाचा फायदा कमीच होणार. 

नवीन पिढी जोखीम नको म्हणून खरे दागिने घालण्यापेक्षा खोटे घालणे पसंत करते. *शेवटी खोटे जास्तच चकाकते.* 😀

सोन्याची मागणी चीन आणि भारत देशात सर्वात जास्त आहे. *इतर देशांत सोने दागिन्यांच्या स्वरूपात फार थोडय़ा प्रमाणात खरेदी केले जाते.*

 *गुंतवणूक म्हणून इतर देशांत सोने शुद्ध स्वरूपात बाळगले जाते.* बाजारातील सोन्याच्या भावातील चढ उतारानुसार त्याची खरेदी-विक्री केली जाते.

गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे. तो वेळीच समजून घ्या व पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे क्रमप्राप्त ठरेल.

*तिसरी भावनात्मक गुंतवणूक मुलांचे उच्चशिक्षण.*

 मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या हौस-मौजेवर काट मारून प्रसंगी कर्ज काढतात. मुलं नोकरीला लागली की ते कर्ज फेडतात. मुलं परदेशात असतील तर हे कर्ज खूपदा आई-वडीलच फेडतात. *याच्या पुढे जाऊन काही ज्येष्ठ आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची सोय म्हणून आयुर्वमिा पॉलिसी किंवा इतर गुंतवणूक करत असतात.*

 असेच एका ज्येष्ठ क्लाएंटला गुंतवणूक करताना विचारले, 

*‘‘काका, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. आता नातवासाठी गुंतवणूक का करता?’’* त्यांनी उत्तर दिले, ‘‘शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस खूप वाढतोय. तेवढीच नातवाच्या शिक्षणासाठी माझी थोडीशी मदत.’’ 

मी त्यांना म्हटले, *‘‘नातवाच्या शिक्षणासाठी गरज किती रकमेची असेल, याचा अंदाज आहे का? आणि तुमच्या मुलाने नातवाच्या शिक्षणासाठी यापूर्वीच ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली आहे. ती रक्कम त्याच्या शिक्षणासाठी भरपूर होईल.*

 नातवाच्या नावाने लाखभर रुपये ठेवण्यापेक्षा तुम्ही दोघे चांगल्या पर्यटनाला जाऊन या.’’ 

त्यावर ते म्हणाले, ‘‘ही रक्कम नातवाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आता तरी गुंतवा. नंतरच्या वेळचे नंतर पाहू.’’

*आपली मानसिकता कशी आहे. आपल्याला मुलांकडून पसे घ्यायला त्यातसुद्धा लग्न झालेल्या मुलीकडून पसे घ्यायला कमीपणा वाटतो. पण नातवंडांची सोय पाहणे जबाबदारीचे वाटते.*

*आयुष्यभर मुलांचा विचार केला आणि म्हातारपणी नातवंडांचा विचार करता.*

 आपले आयुर्मान वाढते आहे. आपले खर्च वाढते आहेत. याचा विचार करा. *कायम दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वत:ची हौस-मौज विसरू नका. आयुष्य स्वत:साठी जगा.*

 असे म्हणतात की *भारतीय लोक आयुष्यभर गरिबीत (कष्टांत) राहतात आणि पुढल्या पिढीला श्रीमंत करतात.. 

दे डाय रीच!*

sebiregisteredadvisor@gmail.com

*(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)*

हनुमान चालीसा नृत्य

 


 











 पुणेरी ताट

पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रम आयोजकांनी "पुणेकरास" मेनू विषयी त्याचं मत मागितल... त्यावेळी त्यांना पुणेकराने दिलेले हे उत्तर...

"मेनू साधारण असा असावा"😌

१. वरण-भात, तूप, मीठ, लिंबू - त्यात शक्य असल्यास चमचाभर पूरण. 

२. मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेलं खोबर आवश्यक...

३. पुऱ्या, आळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,

४. सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.

५. पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसळा भजी.

६. "ओल्या नारळाची" कोथिंबीरीची चटणी, काकड़ी- शेंगदाणे कूट आणि दही घातलेली कोशिंबीर.

७. चवी पुरतं पंचामृत.

८. गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.

९. मठ्ठा.

"आता काही सूचना.... लक्ष्य पूर्वक वाचा.."

🤨आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.

🤨तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.

🤨श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...

🤨 आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही... श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही...

🤨आळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावे, उगाच तुकडे तुकडे टाकू नये...

🤨तसेच, खोबरे देखील पाऊण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.

🤨मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते ५ ते ६ मि.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको.

🤨वरणाची डाळ "एक-पात्रीच" हवी, नाहीतर चव बदलते.

🤨पापड-कुरडई मरतुकडे नको.... त्याच्यातला "कुरकुरीतपणा" निघुन गेल्यास आमची "कुरकुर" सुरु होईल...

🤨गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.

🤨ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी... तिखट नको... त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारखं तिखट त्यात उधळू नये...

😌 "आता पान वाढावयाच्या सूचना -"

१. पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी..

२. पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...

३. पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग "शून्य अंश" पकडून मीठ वाढावे आणि 

४. त्याच्या "उणे पाच अंशावर" लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे...

५. उणे ९० अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.

६. मध्यभागी भाताचा मुद असावा व सगळं वरण "भसकन" वाढू नये... वरणाचा ओघळ नको... आणि त्यावर "साजूक तुपाची धार" हवीच... पण त्यासाठी जेवणार्यास वाट पहायला लावू नये... तुपाचा चमचा चांगला खोलगट असावा.. मागून चेपलेला अपेक्षित नाही.

७. मुदाचा आकार प्रमाणशीर असावा... "भसाडा नको..."

८. वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.

९. मसाले-भाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..

१०. आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.

११. उजव्या हाताला वरच्या बाजूला ४५ अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.

१२. आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.

वर नमूद केलेल्यात काही त्रुटी असल्यास तुमच्या तुम्हीच दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये. आणि उपकार केल्यासारखा वाढप्याचा चेहरा असू नये. 😡

बस ऐवढेच अपेक्षित आहे. सुचना संपल्या.🙏

"काटेकोर" पुणेकर...

🤣

 *•मानसिक ताण तणावावर विजय मिळवा•* 


आपण अनेकदा आपल्या भावनांविषयी सजग नसतो किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, असं करता कामा नये कारण असं करणं आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आपल्याला आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी सकारात्मक भावनांचं स्वागत करायला हवे. 

*१- नकारात्मक भावनांपासून दूर राहा* 

आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपला बहुतांश वेळ नकारात्मक भावनांमध्ये जातो. राग, चिंता, नैराश्य, अपराधी भावना आणि लाज यांसारख्या सगळ्या भावना आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात, हे अनेक संशोधनांनी सिद्ध झाले आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्यावर नकारात्मक भावनांचा परिणाम खुप लवकर होतो, म्हणून नेहमीच अशा *नकारात्मक भावनांपासून व व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयन्त करायला हवा व सकारात्मकता अंगिकारली हवी.* 

*२-तणावाला ठेवा दूर*

तणाव हे कोणत्याही समस्येवरील उपाय नाही, यामुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो आणि आनंद हास्य नाहीसं होतं. यापासून दूर राहण्यासाठी तणाव निर्माण करणाऱ्या अनावश्यक कारणांना आयुष्यातून काढून टाका. *जगातील सगळ्यात जास्त हार्ट अटॅकचे मुख्य कारण मानसिक तणाव हे आहे.* नुरोलॉजिस्ट सांगतात की बदलती जीवनशैली अपेक्षांचं ओझं मानसिक आजारांना कारणीभूत ठरतात. तणावामुळे डोकेदुखी, मायग्रेन, उच्च आणि कमी रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकतात. 

*३-झोप पूर्ण करा*

तुम्ही दिवसभरात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किती वेळ आणि लक्ष देता. जर झोप पूर्ण झाली नाही तर तुम्ही निरोगी राहु शकत नाही. झोपेची कमतरता आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते. पुरेशी झोप व्यायाम, आणि आरोग्यदायी आहाराएवढीच महत्वाची आहे. 


*||बांधिलकी आरोग्यसेवेची||*

      

*------------🌿-----------*

 *ज्वारीच्या भाकरीचे महत्व-* 


जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. 

ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.

तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.

भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

*ज्वारीचे फायदे*

1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.

2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.

3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.

4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.

9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या, ज्वारीला चांगली किंमत मिळाली तर शेतकरी शेतात ज्वारीचे उत्पादण करील , त्यातुन त्याला चांगले उत्पन्न आणी जनावरांना कडबा उपलब्ध होईल ,

ज्वारी आहारामध्ये उपयोग करा, रोग पळवा.

Tuesday, 3 May 2022

 आजच्या अक्षय्यतृतियेला तुम्ही कोणता आंबा खाल्ला?

(भवतालाच्या गोष्टी ०३)

आज अक्षय्यतृतिया, म्हणजे आंबा खाण्याचा दिवस! या दिवशी हमखास आंबा खाल्ला जातो. आता सांगा, आज तुम्ही कोणता आंबा खाल्ला?... तुमचं उत्तर ‘हापूस’ हे असेल तर तुम्हाला हे वाचावंच लागेल. कारण प्रश्न आंब्यांच्या विविधतेचा आहे, ती टिकणार की नाही याचा आहे! तऱ्हतऱ्हेच्या रंगछटा, चव, आकार, इतर वैशिष्ट्यं असलेले आंबे आता दिसत नाहीत. त्यांची विविधता नष्ट होत आहे. याचं कारण आहे- हापूस, पायरी यासारख्या ठराविकच आंब्यांचं वाढलेलं महात्म्य! या आंब्यांनी बाजार व्यापून टाकला, तशा इतर जाती नष्ट होत गेल्या... अगदी तुमच्या - माझ्या डोळ्यांदेखत!

भवताल वेबसाईटच्या bhavatal.com वाचकांसाठी खास ‘भवतालाच्या गोष्टी’ या मालिकेतील ही तिसरी गोष्ट...

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/MangoVsMango-diversity

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Featured post

Lakshvedhi