Wednesday, 4 May 2022

 *•मानसिक ताण तणावावर विजय मिळवा•* 


आपण अनेकदा आपल्या भावनांविषयी सजग नसतो किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, असं करता कामा नये कारण असं करणं आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आपल्याला आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी सकारात्मक भावनांचं स्वागत करायला हवे. 

*१- नकारात्मक भावनांपासून दूर राहा* 

आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपला बहुतांश वेळ नकारात्मक भावनांमध्ये जातो. राग, चिंता, नैराश्य, अपराधी भावना आणि लाज यांसारख्या सगळ्या भावना आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात, हे अनेक संशोधनांनी सिद्ध झाले आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्यावर नकारात्मक भावनांचा परिणाम खुप लवकर होतो, म्हणून नेहमीच अशा *नकारात्मक भावनांपासून व व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयन्त करायला हवा व सकारात्मकता अंगिकारली हवी.* 

*२-तणावाला ठेवा दूर*

तणाव हे कोणत्याही समस्येवरील उपाय नाही, यामुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो आणि आनंद हास्य नाहीसं होतं. यापासून दूर राहण्यासाठी तणाव निर्माण करणाऱ्या अनावश्यक कारणांना आयुष्यातून काढून टाका. *जगातील सगळ्यात जास्त हार्ट अटॅकचे मुख्य कारण मानसिक तणाव हे आहे.* नुरोलॉजिस्ट सांगतात की बदलती जीवनशैली अपेक्षांचं ओझं मानसिक आजारांना कारणीभूत ठरतात. तणावामुळे डोकेदुखी, मायग्रेन, उच्च आणि कमी रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकतात. 

*३-झोप पूर्ण करा*

तुम्ही दिवसभरात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी किती वेळ आणि लक्ष देता. जर झोप पूर्ण झाली नाही तर तुम्ही निरोगी राहु शकत नाही. झोपेची कमतरता आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते. पुरेशी झोप व्यायाम, आणि आरोग्यदायी आहाराएवढीच महत्वाची आहे. 


*||बांधिलकी आरोग्यसेवेची||*

      

*------------🌿-----------*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi