सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 24 March 2022
एमपीएससी : राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर
सहायक मोटार वाहन निरीक्षक - २०२० परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध.
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षा -२०१९ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे, तर सहायक मोटार वाहन निरीक्षक - २०२० परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक या संवर्गातील ३५ पदांकरीता मुख्य परीक्षा- २०१९ घेण्यात आली होती, या परीक्षेचा निकाल आयोगाने जाहीर केला आहे. त्याशिवाय आयोगामार्फत नोव्हेंबर, २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक २०२० ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
००००
वृत्त क्र. 967
राज्यातील ९२१ केंद्रांवर ३ एप्रिलला महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा.
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. ३ एप्रिल, २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ९२१ उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ३ लाख ८ हजार २३६ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ मधून उद्योग संचालनालयात उद्योग निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक, विमा संचालनालयात तांत्रिक सहायक तसेच कर सहायक, लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) या गट-क संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. या परीक्षेमध्ये गैरव्यवहार व अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आयोगातर्फे प्रत्येक जिल्हा केंद्रासाठी शासन सेवेतील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
००००००
वृत्त क्र. 966
बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग - नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2021 साठी
पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य व ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई, दि. 23 : बार्टी संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2021 साठी पात्र उमेदवारांना आर्थिक सहाय्य व ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
बार्टी संस्थेने यु.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षा 2020 च्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेच्या तयारीकरिता ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन दिले होते.
या उपक्रमामध्ये सहभागी 23 उमेदवारांपैकी 10 उमेदवारांना यु.पी.एस.सी. परीक्षेत यश प्राप्त झाले होते. गतवर्षीप्रमाणे व उमेदवारांच्या मागणीनुसार यावर्षीही सनदी अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक यांचेद्वारे व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. तसेच बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2021 साठी उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- चे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी संस्थेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी http://barti.maharashtra.gov.in > NOTICE BOARD> Advertisement- BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2021 Financial assistance Scheme या लिंकवर भेट द्यावी असे आवाहन बार्टी मार्फत करण्यात आले आहे.
***
इतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात
दोन वसतीगृहे सुरु करणार.
- विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. 23 : राज्यातील इतर मागासवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी दोन वसतीगृहे सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंजुरी दिली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली.
इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये आणि सामाजिक व न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना श्री.वडेट्टीवार बोलत होते.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मागण्यासंदर्भात बोलताना मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तिढा निर्माण झाला. हा तिढा सोडविण्यासाठी शासनाने ओबींसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्याला लोकप्रतिनीधींनीही एकमताने मान्यता दिली. याबाबत राज्यपालांच्या सहीने कायदाही तयार करण्यात आला असून पुढील काळात अडचणी येणार नाहीत. तसेच राज्यातील इतर मागासवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थींनींसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी 100-100 विद्यार्थी संख्या असलेली दोन वसतीगृहे सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याला मुख्यमंत्र्यांनीही मंजुरी दिली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या मागण्यासंदर्भात बोलतांना मंत्री ॲड. के.सी.पाडवी म्हणाले, आदिवासी विकास विभागाला मिळणाऱ्या निधीचे विनियोजन अधीक प्लॅन नॉनप्लॅन प्रमाणे केले जात होते. मात्र नीती आयोगाच्या निर्देशानुसार खर्चाचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार निधी वाटप करण्यात येतो. या विभागाच्या आस्थापनेवरील खर्च जास्त असल्याने विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री सकारात्मक आहेत. केंद्र शासनाकडूनही भरीव निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजना राबविण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचेही श्री.पाडवी यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या मागण्यांवर उत्तर देतांना मंत्री अमित देशमुख म्हणाले, राज्यात वैद्यकीय शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) धोरणाचा राज्याने स्वीकार केला असून या तत्वावर वैद्यकीय व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यशासन कार्यवाही करीत आहे. अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुणे येथे इंटिग्रेटेड मेडीसिटी निर्माण करण्यात येणार आहे असा प्रकल्प देशात पहिल्यांदाच निर्माण होत आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पदांची भरती करण्यासाठी मंजुरी मिळाली असून एमपीएससीमार्फत जाहिरात काढण्यात आली आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरु आहे. विक्रमी कालावधीमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील. शासनाने अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयालाही मान्यता दिली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या मागण्यांना उत्तर देतांना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांसाठी स्वाधार योजना ही तालुक्यापर्यंत पोहचविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून 60 हजार विद्यार्थी लाभ घेत आहेत. आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येत होती. ती आता 100 विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न राज्यशासनाने केला आहे. कोरोना काळातही योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. सामाजिक न्यायविभागाच्या वाडी वस्ती योजनांची जातीवाचक नावे बदलली गेली पाहिजे. या दृष्टिने योजनांची जातीवाचक नावे काढण्याचा निर्णय शासनाने घेताला आहे.सन 2022-23 या आर्थिक वर्षात ठिकठिकाणी संविधान सभागृह निर्माण करणे तसेच घरकुल योजनेंतर्गत राज्यभरात पाच लाख घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी औरंगाबाद येथे पंचतारांकीत पद्धतीची शाळा प्रायोगिक तत्वावर चालविण्यात येणार आहे. जात प्रमाणपत्र संबंधित 50 वर्षांचा डेटा उपलब्ध आहे. येणाऱ्या काळात जातीचे प्रमाणपत्र हे पासपोर्टप्रमाणे विहीत काळात दिले जातील, असे सांगून सामाजिक न्याय विभागाद्वारे भेदभाव न करता सर्वांना समान न्याय दिला जातो, असेही श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.अजित पवार यांनी विभागाच्या एकूण 44 हजार 443 कोटी 36 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या मांडल्या होत्या. त्यांना सभागृहात बहुमताने मंजुरी देण्यात आली. या चर्चेत प्रा.अशोक उईके, दिलीप लांडे, हरिभाऊ बागडे, टेकचंद सावरकर, तुषार राठोड, राहुल कुल, योगेश कदम, दादाराव केचे, श्रीनिवास वनगा, विजयकुमार गावित, श्रीमती सरोज अहिरे, मनिषा चौधरी आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
००००
कोडे
*हे गणित अदभूत आणि अप्रतिम आहे*
ज्याने बनवले त्याला मानाचा मुजरा...
खाली लिहिलेल्या नेत्यांतून कोणताही एक नेता निवडा..👇
👉१. सोनिया गांधी 🧛♀
👉२. राहुल गांधी 🧛♂
👉३. लालूप्रसाद 👨🔬
👉४. शरद पवार 🧓
👉५. उद्धव ठाकरे 😁
👉६.अरविंद केजरीवाल 🙍♂
👉७. मनमोहन सिंह👳♂
👉८. अखिलेश👴
👉९.*नरेंद्र मोदी*
⚔१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ यातून कोणताही एक अंक निवडा..
नंतर त्याला
👉३ ने गुणाकार करा
👉३ मिळवा आणि पुन्हां
👉३ ने गुणाकार करा
तुम्हाला दोन अंकी उत्तर मिळेल, त्या दोन अंकांची बेरीज करा..
उत्तर पहा, कोण आहे तुमचा आवडता नेता..🤴
💪👊
जशी करणी
‼️ *एक चुकीचे कर्म*
*तुमच्या ९९ चांगल्या कर्मावर*
*पाणी फिरवते !*‼️
-कथा आहे महाभारतातील !
कर्ण चारित्र्यवान, दानशूर होताच तितकाच तो प्रजेसाठी सतत जागृत होता. त्याच्या दारी आलेल्याला कधीही त्याने रिकाम्या हाताने पाठवलं नव्हतं. प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडले सुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती !
इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुना करवी कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावून मारले.
हे अनेकांना न उलगडलेले कोडे !
तेच कोडे रुक्मिणीला सुद्धा पडलेले !
युद्ध संपल्यावर कृष्ण जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले *"कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता तरी तुम्ही त्याला का मारले..?"*
त्यावर कृष्णाने सांगितलं की,
"नक्कीच कर्ण दानशूर होता,
चारित्र्य संपन्न होता.
याचकाला कधीही त्याने विन्मुख पाठवले नाही.
अशी अनेक चांगली कामे (कर्म) त्याने केले.
मात्र जेव्हा अभिमन्यूने लहान वयातही कौरवांचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता तेव्हा खरेतर त्याने सर्वाना जणू पराभूत केलेच होते त्यामुळे तिथून बाहेर पडणे इतकेच बाकी होते. मात्र बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता अन त्याचा फायदा घेऊन कौरवांनी त्याला मारले. त्यावेळी मरताना अभिमन्यूने त्याच्या जवळच उभ्या असलेल्या कर्णाला पाणी मागितले. कर्णाच्या पाठीमागेच जवळ एक खड्डा होता ज्यात स्वच्छ पाणी होते. मात्र तिथले पाणी आणून अभिमन्यूला दिले तर दुर्योधनाला वाईट वाटेल, त्याला ते आवडणार नाही असं समजून कर्णाने पाणी दिले नाही. आणि मग तहानेने व्याकुळ झालेल्या अभिमन्यूने तडफडत प्राण सोडला !
*त्यामुळे कर्णाने आयुष्यभर केलेल्या*
*सर्व चांगल्या कर्मावर पाणी फिरले !*
त्यामुळे "कर्म परत येतेच" याप्रमाणे नंतरच्या महायुद्धात कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्यात अडकले जिथे पाणी साठले होते (जे कर्णाने अभिमन्यू ला पाजले नाही) त्यामुळे त्या खड्यातच रथाचे चाक अडकणे हे कर्म परत येणे आहे. त्यामुळे त्याने चांगल्या केलेल्या कर्माचा एका वाईट कर्माने नाश झाला.
त्यामुळे त्याला मारावे लागले !
*तात्पर्य:*
*सातत्याने, कर्म रिटर्न्स हे नक्की आहे.*
*चांगले काम करत रहा.*
*वाईट कधीच कुणाचे करू नका.*
*मग तुमच्या चांगल्या कर्माचे फळ*
*चांगलेच तुम्हाला मिळणार !*
*नाहीतर तुमचे जहाज खूप चांगले आहे.*
*मजबूत पण आहे.*
*सुंदर देखील आहे.*
*मात्र त्यात तळाशी एक बारीक छिद्र असेल*
*तर ते जहाज नक्कीच आज न उद्या बुडणार.*
*एक वाईट काम*
*सगळ्या चांगल्या कामावर बोळा फिरवते.*
*हे कायम लक्षात घ्या*
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
