यशदा,पुणे येथे *पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन'* या महत्त्वाच्या विषयावर *दि.२४ ते २६ मार्च व दि.२८ ते ३० मार्च* अश्या दोन तुकड्यामध्ये *दोन दिवशीय मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन* करण्यात आले आहे.*पाणलोट क्षेत्रात* कार्यरत असलेल्या संस्था,कार्यकर्ते,प्रशिक्षक अथवा काम करण्यास इच्छुक असलेले आपल्या ओळखीचे कार्यकर्ते असल्यास वरील पत्रकात दिलेल्या नंबरवर संपर्क करुन प्रशिक्षण सहभाग नोंदणी करण्यासाठी *दि.२१ मार्च* पर्यंत नाव नोंदवणे गरजेचे आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 19 March 2022
##चंद्रप्रभावटि.... एक अद्भुत रसायन...
... आयुर्वेदातील अतिशय महत्त्वाचे रसायन आहे ही ,वटि,..चंद्रासारखी प्रभा देणारि, म्हणजे शरिर तुमचे चमकायला लागतं, निरोगी व निकोप राहतं, . सर्व प्रकारच्या मूत्रविकारा वर फार मोलाचे सहकार्य करते.. एकूण..३७ प्रकारच्या आयुर्वेद जडिबुटिंचा वापर करून हि वटि तयार होते.
..##घटक..
चंद्रप्रभा(कर्पुर) मरिच, वच, पिंपळी, मुस्ता, मक्षिका, भूनिंब, यवक्षर, अम्रुता, सर्जिक्षार, देवदारू, सैंधव,लवण, हरिद्रा, सौवर्चला,लवण, अतिविषा, विडलवण, दारुहरिद्रा, त्रिव्रुत, पिप्पलिमूल, दंति, चित्रक, तेजपत्ता, धान्यक, , हरितकि, , बिभीतक, वंशलोचन, आमलकि, लोहभस्म, चव्य, सीता, विडंग, शिलाजीत, गजपिप्पली, गुग्गुळ, सुंठ., शिलाजीत..
..##चंद्रप्रभावटिचे..फायदे..👉.. मधुमेह या आजारांवर दररोज दोन गोळ्या घेतल्यास शर्करा नियंत्रणात येईल..जर, युरिन साफ होत नसेल, किंवा, वारंवार लागत असेल तर, जळजळ होत असल्यास, दोन वेळा जेवणानंतर दोन वटि घ्याव्यात, कारण चंद्रप्रभा वटित अॅंटिबॅक्टेरिअल गुण आहेत. याने युरिनरि ट्रॅकचे सर्व प्रकारचे दोष दूर होतात..
आजकाल पुरुषांचे.*प्रोस्टेट ग्रंथी* चे आजार वाढले आहे. या ग्रंथि वाढतात, त्यामुळे युरिन कोंडते, व युरिन न आल्याने वेदना होतात, मूत्रपिंड सूजते, या सर्व त्रासांवर..*चंद्रप्रभा वटी* खुप लाभदायक आहे. दूधासोबत दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घ्या.संक्रमण दूर होते...
##निरामय##आयुर्वेद....
बरेच वेळा. शरिरात दुर्बलता येते, थकवा येतो,काम करण्यासाठी उत्साह वाटत नाही, अशा वेळी, दररोज दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घ्या, हे रसायन असल्याने त्वरित आराम मिळतो.
सूजाक,उपदंश, या आजारांमध्ये हि वटि मोलाचं योगदान देत असते,यात फोड, फुंसि, खाज येते, तेव्हा
.चंदनासव काढा सोबत हि वटि दिल्यास लवकर आराम मिळतो.
ही वटि शरिरातील विषारी पदार्थ बाहेर काढते.धातू बळकट होतात, स्त्रियांकरता हि वरदान आहे. मासिक पाळीत पोट दुखणं, जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे, पाळी नियमित नसणं, श्वेतप्रदर, या सर्व त्रासांवर .*चंद्रप्रभा वटी* रोज दूधा सोबत दोन वेळा दोन वटि घ्याव्यात. याने सर्व प्रकारचे त्रास दूर होतात..
. लहान मुलांना जर हि वटि दिली तर,यांचि स्मरण शक्ती वाढते, कारण हे उत्तम रसायन आहे.
संधिवात आमवात, गुडघेदुखी कंबरदुखी, या सर्व वातविकारांवर हि वटि उत्तम कार्य करते. अंगावरचि सूज कमी होते. यात असलेल्या महत्वाच्या औषधि मुळे, उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलेस्टेरॉल वाढत नाही. आणि ह्रुदय मजबूत राहते. बर्याच स्रियांचे गर्भाशय कमजोर असतं, त्यामुळे गर्भधारणा होत नाही. सारखा गर्भपात होतो. अशा वेळी .. चंद्रप्रभा वटी मोलाचं कार्य करते. काही दिवस घेतल्यास
... गर्भधारणा होते.. यात शिलाजीत हे ताकद देणारे घटक असल्याने. आपण टाॅनिक म्हणून घेऊ शकतो..
... तेव्हा.अशी मी मौल्यवान आयुर्वेद औषधी गरजेप्रमाणे घेऊन आरोग्य चांगले ठेउ शकतो...
आयुर्वेद अभ्यासक.... सुनिता सहस्रबुद्धे... निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार...
Friday, 18 March 2022
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
मुंबई, दि. १७ : जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिनांक २२ मार्च २०२२ रोजी विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.
जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव रामनाथ सोनवणे यांनी दिली आहे.
भूजल व भूपृष्ठावरील उपलब्ध पिण्यायोग्य पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याची बचत करणे आणि भूजल पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी पर्जन्य जलसंचयासारखे उपक्रम राबवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन व जनजागृती करणे आवश्यक आहे. या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन पाणी बचतीसाठी वैयक्तीक व सामूहिकरित्या योगदान द्यावे, असे आवाहन जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य श्री. संजय कुलकर्णी (जसं), श्रीमती श्वेताली ठाकरे (अर्थ) आणि श्रीमती साधना महाशब्दे (विधी) यांनी केले आहे.
0000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...