Thursday, 17 March 2022


 

 


गेले ते दीन गेले.

 होळी,रे holeeeeeee

पूर्वी आपल्याला कोठलाही सण यायच्या आधी जवळ जवळ महिनाभर वेद लागायचे ,हल्ली सण कधी येतात आणि जातात ते कळतच नाही.मला वाटते नुसत्या formalities आपण पुऱ्या करतो.

खरे म्हणजे आपल्या लहानपणीचा म्हणजे आपल्या पिढीचा ,लहानपण ते मॅट्रिक पर्यंतचा कालखंड म्हणजे साधारण 1975 पर्यंतचा कालखंड किंवा जास्तीत जास्त 1978 पर्यंतचा कालखंड हे खरे सुवर्ण युग होता हे मानावे लागेल.आपल्या वयातील लोकांनी अनुभवी लेला तो वेळ हा शेवटाला कालखंड होता.कारण साधारण 1980 पासून आधुनिकीकरण व्हायला सुरुवात झाली आणि जुने ते सोने म्हणायची वेळ सुरू झाली.

म्हणून आपल्या वयाची पिढी ही शेवटची पिढी ठरली.

मी त्यात आणखी भाग्यवान ठरलो कारण होळी च्या मजेशीर गोष्टी मी आवास,थळ आणि शेवटी रेवदंडा येथे anubhavilya.

होळी च्या आधी आठ दिवस रिकामे डबे शोधायचे आणि ते दगडाने चेचून चपटे करायचे आणि त्यातील गॅप मध्ये दोरी ओवून ती गळ्यात अडकवायचे आणि दिवस भर काठ्यानी कुटत बसायचे आणि रात्री होळीवर कुटत बसायचे.असे वाद्य कुठे लोप पावले ते कळले नाही......

......त्यावेळी माणुसकी होती त्यामुळे दुसऱ्याच्या वाडीतील नारळ किंवा शहाळी चोरून खाणे हा आपला जन्म सिद्ध हक्क होता.आणि चोडांची रास त्याच वाडीत ठेवून जायचे .

पण बिचारा मालक कधी पोलीस स्टेशन ला गेला नाही. काही मुले अशी असायची की स्वतःच्याच वाडीत इतर मुलांना घेवून नारळ चोरायला अथॉरिटी द्यायचे.

मी थळ ला असताना आमच्या बाजूला पारेकरांची वाडी होती,खूप मोठी जवळ जवळ 5 एकर.त्यामुळे आजूबाजूच्या दोन तीन आळीतील पोरे त्याच वाडीला टार्गेट करायचे.त्यात दोन तीन माड मोहाचे होते त्यामुळे त्या माडा ना जास्त डिमांड होता.

मालक मिश्किल आणि चांगला होता तो काही दुसऱ्या दिवशी गोंगाट करत नसे, पण एके वर्षी त्याला कोणीतरी गुरू भेटला किंवा त्याने कुठून तरी उपाय ऐकले असतील ,त्याने त्या वर्षी त्या तीन ही madana ब्लेड अर्धी करून धारदार बाजू बाहेर राहील अशी ठराविक अंतराने लावून ठेवली आणि आणि त्यावर्षी होळीच्या पहिल्याच दिवशी madawar चढणारी दोन तीन मुले सोलपटून निघाली....

आट्या पाट्या ही मी खूप खेळलो आहे.revadandyat हा खेळ जास्त नसायचा......

रेवदंडा येथे घरावरील किंवा दुकानावरील नावाच्या पाट्या बदलण्याची मजा खूप असायची.आम्ही विठोबा आळीत राहायचो तेंव्हा आमच्या घराबाहेर असलेली" वार्डे गुरुजी" ही पाटी बच्चू भाई मुकादम राहत असलेल्या त्यांच्या शेजारील रिकाम्या घराला कोणी तरी नेवून लावली होती, आणि आमच्या घराबाहेर "देशी दारूचे दुकान" ही पाटी आणून लावली होती.सकाळी घरावरून जाणारे हसत हसत जात होते पण आमच्या लक्षात येत नव्हते आणि सुमारे 9 वाजता आमच्या वडिलांच्या लक्षात समोर राहत असलेल्या चंद्रकांत पाटील(जो टॉकीज वर होता) याने आणून दिले.आम्ही जवळ जवळ दोन दिवस खूप हसत होतो....

आत्ता घरात पुरण पोळ्या वर्षातून बऱ्याच वेळा बनविल्या जातात पण त्या काळी होळी व्यतिरिक्त बनवत नसत.घरातील बायकांचे पोळ्या बनविण्याचे काम चालू असताना मध्येच जावून वाटलेले पुरण चिमटीत घेवून किंवा नुकतीच उकडून ठेवलेली (पुरण पोळी साठी) चण्याची गोड डाळीचा बकाणा मारल्या शिवाय मजा वाटत नसे.शिवाय जेवायला बसल्यावर पुरण पोळी खायची स्पर्धा असायची ती वेगळीच.आताची आपली मुले जेमतेम आर्धी पुरण पोळी खातात....

....,प्रत्येक गावात आणि प्रत्येक आळीत "होळीच्या फाका" घालण्यात हातखंडा असलेली दोन चार टारगट पोरे असायचीच.(त्या वेळी कुठली अश्लीलता वाटली नाही. ).बाकी इतर मुलं "फोदेव" म्हणून त्यांना कोरस द्यायची.. ,..

वेग वेगळी सोंगे काढून घरो घरी जावून पैसे मागणे(लोक प्रेमाने द्यायचे) आणि ते पैसे बरोबर असलेल्या सगळ्यांनी वाटून घेणे ही मजा काही औरच असायची....

.......आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी होळी वरील पेटत असलेल्या निखाऱ्यावर आंघोळी साठी पाणी तापवून आणणे ही गावो गावची अलिखित प्रथा असायची.आणि त्यातच "करी "साठी मटण आणायला जाणे हा एक कार्यभाग असायचा......

......आपण अनुभव घेतलेल्या गमती जमती आताची पिढी मिस करतेय....

आता आपण फक्त..

" जुन्या आठवणी आठवत राहायचे....

  आठवणी काढत आठवणीत रमायचे...."

सूचना

 होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर.

            मुंबई दि. 17 : होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

            होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. १७ मार्च, २०२२ रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा. तसेच दि. १८ मार्च रोजी धूलिवंदन व २२ मार्च रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.

            होळी / शिमगा सणानिमित्ताने (विशेष करून कोकणात) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी. महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने दि. १ मार्च, रोजी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

            कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

००००

 नागपूर येथे 1 मे पर्यंत ई-लायब्ररी सुरू

- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 16 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत मानेवाडा येथे अद्यावयात अशा ई-लायब्ररीच्या इमारतीचे बांधकाम झाले असून या ई-लायब्ररीत डिजिटल वृत्तपत्रांबरोबर, पुस्तके, मराठी वाक्यप्रचार अशा विविध प्रकारच्या माहितीचे स्त्रोत विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ई-लायब्ररीत दुर्मिळ तसेच हस्तलिखित साहित्यही उपलब्ध असणार असून या लायब्ररीचे बांधकाम पूर्ण होत असून उर्वरित कामे युद्धपातळीवर करून दि. 1 मे पर्यंत ही ई-लायब्ररी सुरू करण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

            महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांचा विकास या योजनेंतर्गत या ई-लायब्ररीकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याकरिता निधीची कमतरता भासल्यास ती पूर्ण करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.शिंदे यावेळी सांगितले.

            ई-लायब्ररी संदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला होता.

000

 


  कृपया  जय हिंद * लिहून एक वंदन द्या.अमर रहे.           काळ्या पाण्याची शिक्षा झालेले किती लोक आहेत.* 

*मित्रांनो,आपण यांना ओळखता का..?*

*१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,* 

*२. स्वातंत्र्यवीर भिमाजी* 

*३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील* 

*४. स्वातंत्र्यवीर भीमराव* 

*५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले* 

*६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले* 

*७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले* 

*८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले* 

*९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले* 

*१०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले* 

*११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी* 

*१२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु* 

*१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण* 

*१४. स्वातंत्र्यवीर बारकू* 

*१५. स्वातंत्र्यवीर भीमा* 

*१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण* 

*१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण* 

*१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण* 

*१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी*

*२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु* 

*२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर* 

*२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई* 

*२३. स्वातंत्र्यवीर पांचाली गोविंद देसाई* 

*२४. स्वातंत्र्यवीर राघोबा देसाई* 

*२५. स्वातंत्र्यवीर देवाजी शिरसाठ* 

*२६. स्वातंत्र्यवीर देवजी गायकवाड* 

*२७. स्वातंत्र्यवीर गानू सावंत* 

*२८. स्वातंत्र्यवीर गणेश महाराज =*

*२९. स्वातंत्र्यवीर गणू सखाराम.* 

*३०. स्वातंत्र्यवीर हरिभाऊ गरबेद* 

*३१. स्वातंत्र्यवीर विठू गवळी* 

*३२. स्वातंत्र्यवीर हनुमंत घाटगे* 

*३३. स्वातंत्र्यवीर संत साली गोपाल* 

*३४. स्वातंत्र्यवीर गोविंद* 

*३५. स्वातंत्र्यवीर गोवर्धन* 

*३६. स्वातंत्र्यवीर गोविंद महार* 

*३७. स्वातंत्र्यवीर गोविंद विठू* 

*३८. स्वातंत्र्यवीर गोविंद गोविंद* 

*३९. स्वातंत्र्यवीर हरी* 

*४०.स्वातंत्र्यवीर देवजी हिंदालकर* 

*४१. स्वातंत्र्यवीर होनाजी* 

*४२. स्वातंत्र्यवीर रघु जाधव* 

*४३. स्वातंत्र्यवीर सुभाना बापू जाधव* 

*४४. स्वातंत्र्यवीर जयराम राजे* 

*४५. स्वातंत्र्यवीर शिवाजी अभिमन्यु* 

*४६. स्वातंत्र्यवीर बाजी जोरेकर* 

*४७. स्वातंत्र्यवीर अन्न नथु* 

*४८. स्वातंत्र्यवीर गणाजी कबरे* 

*४९. स्वातंत्र्यवीर अन्न बापू कदम* 

*५०. स्वातंत्र्यवीर राम कदम* 

*५१. स्वातंत्र्यवीर रावजी काळजी कदम* 

*५२. स्वातंत्र्यवीर गोपाल कार्सोवकर* 

*५३. स्वातंत्र्यवीर जिल्लू कोचारकर* 

*५४. स्वातंत्र्यवीर गोपाल कोकामकर* 

*५५. स्वातंत्र्यवीर मान्या कोळी* 

*५६. स्वातंत्र्यवीर बोंबी कोकमकर* 

*५७. स्वातंत्र्यवीर विठू सातवजी कुंभार* 

*५८. स्वातंत्र्यवीर गिरवार कुणबी* 

*५९. स्वातंत्र्यवीर जवाहर कुणबी* 

*६०. स्वातंत्र्यवीर हैबतराव आप्पा महाडिक* 

*६१. स्वातंत्र्यवीर विठू बहिरू महल्ले* 

*६२. स्वातंत्र्यवीर अप्पा मालवणकर* 

*६३. स्वातंत्र्यवीर नरसिह माने* 

*६४. स्वातंत्र्यवीर मावजी* 

*६५. स्वातंत्र्यवीर मावजी धुमाळ* 

*६६. स्वातंत्र्यवीर म्हसकर रावजी लीन्गोजी नाईक* 

*६७. स्वातंत्र्यवीर तात्या मोहिते* 

*६८. स्वातंत्र्यवीर लिंब भवानी मोरे* 

*६९. स्वातंत्र्यवीर मोहन* 

*७०. स्वातंत्र्यवीर भीमा नाईक* 

*७१. स्वातंत्र्यवीर बी.वाय नाईक* 

*७२. स्वातंत्र्यवीर गंगा एक्का नाईक* 

*७३. स्वातंत्र्यवीर नारोजी लीन्गाजी नाईक* 

*७४. स्वातंत्र्यवीर सोमिया जत्रा नाईक* 

*७५. स्वातंत्र्यवीर नालाजी वारादिकीर* 

*७६. स्वातंत्र्यवीर नाना चीलोजी* 

*७७. स्वातंत्र्यवीर व्यंका पवार* 

*७८. स्वातंत्र्यवीर बापू पाइप्कर* 

*७९. स्वातंत्र्यवीर पांडू सिंगीकर* 

*८०. स्वातंत्र्यवीर भाऊ कान्जोरा पाटील* 

*८१. स्वातंत्र्यवीर भाऊ हरजी पाटील* 

*८२. स्वातंत्र्यवीर भिल्ल अत्त्या पाटील* 

*८३. स्वातंत्र्यवीर गरिब्दास पाटील.* 

*८४. स्वातंत्र्यवीर इत्तु पाटील* 

*८५. स्वातंत्र्यवीर खुशाल गोविंद पाटील* 

*८६. स्वातंत्र्यवीर मावजी अर्जुन पाटील* 

*८७. स्वातंत्र्यवीर पांडू धोंडी पाटील* 

*८८. स्वातंत्र्यवीर त्र्यंबक हरी पाटील.* 

*८९. स्वातंत्र्यवीर जीवासा भीरु पाटील* 

*९०. स्वातंत्र्यवीर रामजी जगताप* 

*९१. स्वातंत्र्यवीर राम परब* 

*९२. स्वातंत्र्यवीर रामराव*

*९३. स्वातंत्र्यवीर भिकाजी रावनेकर* 

*९४. स्वातंत्र्यवीर गोपाल साळवी* 

*९५. स्वातंत्र्यवीर साधू* 

*९६. स्वातंत्र्यवीर सन्तु चंदू* 

*९७. स्वातंत्र्यवीर बाबाजी सावंत* 

*९८. स्वातंत्र्यवीर गणू सावंत* 

*९९. स्वातंत्र्यवीर मनु अप्पा सावंत* 

*१००. स्वातंत्र्यवीर पुताजी बाबुराव सावंत* 

*१०१.स्वातंत्र्यवीर त्र्यंबक सावंत* 

*१०२. स्वातंत्र्यवीर विश्राम सावंत* 

*१०३. स्वातंत्र्यवीर नारायण पिराजी शिंदे* 

*१०४. स्वातंत्र्यवीर दोन्द सावंत* 

*१०५. स्वातंत्र्यवीर राम रघु शिंदे* 

*१०६. स्वातंत्र्यवीर बापू नारोजी थोरात* 

*१०७. स्वातंत्र्यवीर तुकाराम कृष्णाजी* 

*१०८. स्वातंत्र्यवीर रघु त्र्यंबक* 

*१०९. स्वातंत्र्यवीर बालाजी विलोबा* 

*११०. स्वातंत्र्यवीर बाबाजी विठा* 

*१११. स्वातंत्र्यवीर विठोबा* 

*११२. स्वातंत्र्यवीर विठोबा जुनकर*

*११३. स्वातंत्र्यवीर वित्ठू* 

*११४. स्वातंत्र्यवीर वित्तू बाबा* 

*हे सर्वजण आहेत,*

*अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी*

*बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती!* 

*लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत.*

*काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. ते अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.* 

*मग यांनाहि आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार. नाही का ?*

*त्यांना अंधारात ठेवले गेले, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून त्यांना छळण्यात आले, सक्तीने मजुरी करवून घेतली ....*

*आशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन.......!*

*एक निवेदन : आपण ही पोस्ट सर्वत्र वितरित करा कारण भारतातील वृतपत्रे आणि टीव्ही हे अजिबात दाखवणार नाहीत. तुम्ही आम्हीच प्रचारक आहोत.*

        🇮🇳🌹🙏

Featured post

Lakshvedhi