Thursday, 17 March 2022

  कृपया  जय हिंद * लिहून एक वंदन द्या.अमर रहे.           काळ्या पाण्याची शिक्षा झालेले किती लोक आहेत.* 

*मित्रांनो,आपण यांना ओळखता का..?*

*१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,* 

*२. स्वातंत्र्यवीर भिमाजी* 

*३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील* 

*४. स्वातंत्र्यवीर भीमराव* 

*५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले* 

*६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले* 

*७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले* 

*८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले* 

*९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले* 

*१०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले* 

*११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी* 

*१२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु* 

*१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण* 

*१४. स्वातंत्र्यवीर बारकू* 

*१५. स्वातंत्र्यवीर भीमा* 

*१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण* 

*१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण* 

*१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण* 

*१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी*

*२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु* 

*२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर* 

*२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई* 

*२३. स्वातंत्र्यवीर पांचाली गोविंद देसाई* 

*२४. स्वातंत्र्यवीर राघोबा देसाई* 

*२५. स्वातंत्र्यवीर देवाजी शिरसाठ* 

*२६. स्वातंत्र्यवीर देवजी गायकवाड* 

*२७. स्वातंत्र्यवीर गानू सावंत* 

*२८. स्वातंत्र्यवीर गणेश महाराज =*

*२९. स्वातंत्र्यवीर गणू सखाराम.* 

*३०. स्वातंत्र्यवीर हरिभाऊ गरबेद* 

*३१. स्वातंत्र्यवीर विठू गवळी* 

*३२. स्वातंत्र्यवीर हनुमंत घाटगे* 

*३३. स्वातंत्र्यवीर संत साली गोपाल* 

*३४. स्वातंत्र्यवीर गोविंद* 

*३५. स्वातंत्र्यवीर गोवर्धन* 

*३६. स्वातंत्र्यवीर गोविंद महार* 

*३७. स्वातंत्र्यवीर गोविंद विठू* 

*३८. स्वातंत्र्यवीर गोविंद गोविंद* 

*३९. स्वातंत्र्यवीर हरी* 

*४०.स्वातंत्र्यवीर देवजी हिंदालकर* 

*४१. स्वातंत्र्यवीर होनाजी* 

*४२. स्वातंत्र्यवीर रघु जाधव* 

*४३. स्वातंत्र्यवीर सुभाना बापू जाधव* 

*४४. स्वातंत्र्यवीर जयराम राजे* 

*४५. स्वातंत्र्यवीर शिवाजी अभिमन्यु* 

*४६. स्वातंत्र्यवीर बाजी जोरेकर* 

*४७. स्वातंत्र्यवीर अन्न नथु* 

*४८. स्वातंत्र्यवीर गणाजी कबरे* 

*४९. स्वातंत्र्यवीर अन्न बापू कदम* 

*५०. स्वातंत्र्यवीर राम कदम* 

*५१. स्वातंत्र्यवीर रावजी काळजी कदम* 

*५२. स्वातंत्र्यवीर गोपाल कार्सोवकर* 

*५३. स्वातंत्र्यवीर जिल्लू कोचारकर* 

*५४. स्वातंत्र्यवीर गोपाल कोकामकर* 

*५५. स्वातंत्र्यवीर मान्या कोळी* 

*५६. स्वातंत्र्यवीर बोंबी कोकमकर* 

*५७. स्वातंत्र्यवीर विठू सातवजी कुंभार* 

*५८. स्वातंत्र्यवीर गिरवार कुणबी* 

*५९. स्वातंत्र्यवीर जवाहर कुणबी* 

*६०. स्वातंत्र्यवीर हैबतराव आप्पा महाडिक* 

*६१. स्वातंत्र्यवीर विठू बहिरू महल्ले* 

*६२. स्वातंत्र्यवीर अप्पा मालवणकर* 

*६३. स्वातंत्र्यवीर नरसिह माने* 

*६४. स्वातंत्र्यवीर मावजी* 

*६५. स्वातंत्र्यवीर मावजी धुमाळ* 

*६६. स्वातंत्र्यवीर म्हसकर रावजी लीन्गोजी नाईक* 

*६७. स्वातंत्र्यवीर तात्या मोहिते* 

*६८. स्वातंत्र्यवीर लिंब भवानी मोरे* 

*६९. स्वातंत्र्यवीर मोहन* 

*७०. स्वातंत्र्यवीर भीमा नाईक* 

*७१. स्वातंत्र्यवीर बी.वाय नाईक* 

*७२. स्वातंत्र्यवीर गंगा एक्का नाईक* 

*७३. स्वातंत्र्यवीर नारोजी लीन्गाजी नाईक* 

*७४. स्वातंत्र्यवीर सोमिया जत्रा नाईक* 

*७५. स्वातंत्र्यवीर नालाजी वारादिकीर* 

*७६. स्वातंत्र्यवीर नाना चीलोजी* 

*७७. स्वातंत्र्यवीर व्यंका पवार* 

*७८. स्वातंत्र्यवीर बापू पाइप्कर* 

*७९. स्वातंत्र्यवीर पांडू सिंगीकर* 

*८०. स्वातंत्र्यवीर भाऊ कान्जोरा पाटील* 

*८१. स्वातंत्र्यवीर भाऊ हरजी पाटील* 

*८२. स्वातंत्र्यवीर भिल्ल अत्त्या पाटील* 

*८३. स्वातंत्र्यवीर गरिब्दास पाटील.* 

*८४. स्वातंत्र्यवीर इत्तु पाटील* 

*८५. स्वातंत्र्यवीर खुशाल गोविंद पाटील* 

*८६. स्वातंत्र्यवीर मावजी अर्जुन पाटील* 

*८७. स्वातंत्र्यवीर पांडू धोंडी पाटील* 

*८८. स्वातंत्र्यवीर त्र्यंबक हरी पाटील.* 

*८९. स्वातंत्र्यवीर जीवासा भीरु पाटील* 

*९०. स्वातंत्र्यवीर रामजी जगताप* 

*९१. स्वातंत्र्यवीर राम परब* 

*९२. स्वातंत्र्यवीर रामराव*

*९३. स्वातंत्र्यवीर भिकाजी रावनेकर* 

*९४. स्वातंत्र्यवीर गोपाल साळवी* 

*९५. स्वातंत्र्यवीर साधू* 

*९६. स्वातंत्र्यवीर सन्तु चंदू* 

*९७. स्वातंत्र्यवीर बाबाजी सावंत* 

*९८. स्वातंत्र्यवीर गणू सावंत* 

*९९. स्वातंत्र्यवीर मनु अप्पा सावंत* 

*१००. स्वातंत्र्यवीर पुताजी बाबुराव सावंत* 

*१०१.स्वातंत्र्यवीर त्र्यंबक सावंत* 

*१०२. स्वातंत्र्यवीर विश्राम सावंत* 

*१०३. स्वातंत्र्यवीर नारायण पिराजी शिंदे* 

*१०४. स्वातंत्र्यवीर दोन्द सावंत* 

*१०५. स्वातंत्र्यवीर राम रघु शिंदे* 

*१०६. स्वातंत्र्यवीर बापू नारोजी थोरात* 

*१०७. स्वातंत्र्यवीर तुकाराम कृष्णाजी* 

*१०८. स्वातंत्र्यवीर रघु त्र्यंबक* 

*१०९. स्वातंत्र्यवीर बालाजी विलोबा* 

*११०. स्वातंत्र्यवीर बाबाजी विठा* 

*१११. स्वातंत्र्यवीर विठोबा* 

*११२. स्वातंत्र्यवीर विठोबा जुनकर*

*११३. स्वातंत्र्यवीर वित्ठू* 

*११४. स्वातंत्र्यवीर वित्तू बाबा* 

*हे सर्वजण आहेत,*

*अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी*

*बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती!* 

*लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे. वरील सर्वजण राजकीय कैदी आहेत.*

*काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. ते अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.* 

*मग यांनाहि आम्ही भारताचे "स्वातंत्र्यवीर" च म्हणणार. नाही का ?*

*त्यांना अंधारात ठेवले गेले, त्यांच्यावर अनन्वित जुलूम करून त्यांना छळण्यात आले, सक्तीने मजुरी करवून घेतली ....*

*आशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन.......!*

*एक निवेदन : आपण ही पोस्ट सर्वत्र वितरित करा कारण भारतातील वृतपत्रे आणि टीव्ही हे अजिबात दाखवणार नाहीत. तुम्ही आम्हीच प्रचारक आहोत.*

        🇮🇳🌹🙏

 दापोली येथे 13 ते 17 मे दरम्यान सुवर्ण पालवी कृषी महोत्सव

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आढावा

·       डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव

 

            मुंबईदि. 16 : दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास  पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या वतीने वर्षभर शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने सुवर्ण पालवी या नावीन्यपूर्ण कृषी महोत्सवाचे आयोजन 13 ते 17 मे 2022 रोजी करण्यात येणार आहे. या कृषी महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

            कोकण कृषी महोत्सवामध्ये ५०० पेक्षा जास्त स्टॉल्स असणार असून २०० एकर परिसरावर शिवार फेरी आयोजित करण्यात येणार आहे. कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरूकताकृषी विद्यापीठाचे आजपर्यंतचे संशोधनशासकीय योजनांची माहितीशेतकरी उत्पादन विक्री व्यवस्थाविद्यापीठ व इतर संस्थांचा शेतकऱ्यांशी समन्वय व कोकणच्या शेती प्रगती संदर्भात चर्चा असा या सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचा उद्देश असल्याचे श्री भुसे यांनी सांगितले.

             या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी तसेच समारोपप्रसंगी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले जाणार आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञानाशी निगडीत सर्व संस्था यांची दालने देखील या महोत्सवात असणार असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.

            या कृषी महोत्सवामध्ये रान भाज्याशेडनेटभात संशोधनपशुसंवर्धन तंत्रज्ञान यासोबतच विविध विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यासंदर्भात निर्देश  श्री भुसे यांनी दिले. तसेच पुष्प प्रदर्शनमहिला शेतकरी मेळावागोड्या पाण्यातील मत्स्य पालननाचणी व बांबू शेती आदींचा समाविष्ट कृषी महोत्सव मध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

            कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आलेले कार्य सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही चांगली संधी असून या कृषी महोत्सवाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री भुसे यांनी केले.

            या प्रदर्शनामध्ये राज्यातील सर्व कृषी विद्यापीठेशासनाचे कृषी व विकास विभागमहामंडळे व सहकारी संस्थाकृषी उद्योजककृषी निविष्ठांची निगडित मत्स्य संस्थामत्स्य निविष्ठा उत्पादकमहिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देखील मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याचे निर्देश कृषीमंत्री श्री.भुसे यांनी दिले.

             यावेळी  कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंतसंचालक विस्तार व शिक्षण डॉ. संजय भावेडॉ. प्रमोद सावंतडॉ. अजय राणेडॉ. मंदार खानविलकर उपस्थित होते.

सुवर्ण पालवी या कृषी महोत्सवाच्या माहितीपुस्तिकेचे अनावरण

            दापोली येथे १३ ते १७ मे दरम्यान होणाऱ्या सुवर्ण पालवी या कृषी महोत्सवाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दिलीप बोरसेकुलगुरू डॉ. संजय सावंतसंचालक विस्तार डॉ. संजय भावेडॉ. प्रमोद सावंतडॉ. अजय राणेमंदार खानविलकर उपस्थित होते.

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांची मुलाखत.

          मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        गुरूवार, दि. 17 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

                राज्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात झालेली वाढ,त्याची कारणे आणि अशा घटना रोखण्यासाठी वन विभागातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, व्याघ्र व त्यांचे व्यवस्थापन, संवर्धन, राज्यात गेल्या दोन वर्षात नव्याने घोषित करण्यात आलेले संवर्धन राखीव,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच ठाणे खाडी अभयारण्य यांचे व्यवस्थापन अशा सर्व निर्णयांची व विविध नाविन्यपूर्ण योजनांची माहिती श्री. सुनील लिमये यांनी 'जय महाराष्ट्र ' या कार्यक्रमातून दिली आहे.

00000



 आर्थिक शिस्त आणि समतोल विकासाच्या अर्थसंकल्पासह राज्य अग्रेसर

- वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि. 16 : मागील दोन वर्षापासून कोविडसारख्या महामारीचा सामना करीत असताना राज्याची आर्थिक स्थिती अडचणीत आली असतानाही आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसवली आहे. वित्त विभागाने नियोजन करुन, आर्थिक शिस्त लावून सर्वसमावेशक विकासाचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्याद्वारे राज्य समतोल विकासाच्या दृष्टिने पाऊल पुढे टाकत आहे, असे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. सन 2022-23 च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेवर उत्तर देताना वित्त राज्यमंत्री श्री. देसाई बोलत होते.

            वित्त राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. 2020-21 मध्ये कोविडची परिस्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या महसुलावर झाला. विविध योजनासाठी जवळपास 60 ते 70 टक्के निधी देण्यात आलेला आहे. कुठल्याही योजनेच्या निधीमध्ये कपात करण्यात आली नसल्याचे सांगून श्री.देसाई म्हणाले की, इतर राज्यांच्या तुलनेत 2.64 टक्के कर्ज कमी घेवून राज्याने अर्थव्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) चे 26 हजार 500 कोटी रुपये येणे बाकी आहेत. कररुपाने वाटा उचलणारे महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे.     

            कोविडकाळात नागरिकांच्या पाठिशी ठाम उभे राहून कोविडच्या कामासाठी कुठेही सरकारच्यावतीने पैसा कमी पडू दिला नाही. राज्यात अनेक ऑक्स‍िजन प्लांट, रुग्णालये, उभारले. तसेच प्रत्येक जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट उभारुन राज्याला स्वयंपूर्ण बनविले. करचुकवेगिरीला आळा घालून अधिक उत्पन्न वाढ कशी होईल, यासाठी प्रयत्न केले. राजकोषीय तूट कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

            उद्योग विभागामध्ये आतापर्यंत 98 सामंजस्य करार करण्यात आले असून चार लाख कोटी रुपये गुंतवणूकीच्या माध्यमातून उद्योग वाढीसाठी चालना देण्यात आली आहे. सद्यस्थितीत 98 प्रकल्पापैकी 5 प्रकल्प प्रलंबित असून उर्वरित सर्व प्रकरणे मार्गी लागली आहेत.

            सारथी, बार्टी आणि महाज्योती या तीनही महामंडळाचा निधी मागणीप्रमाणे नियोजनामध्ये प्राप्त करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मद्यतस्करी रोखण्यासाठी विदेशी मद्यावरील कर कमी करण्याचा प्रायोगिक तत्वावर शासनाने निर्णय घेतला. यामुळे राज्याच्या उत्पनामध्ये वाढ झाली.

            सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जम्बो कोविड केअर सेंटर सुरु केले. रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्यावर संग्रहालयाला सर्व निधी देवून संग्रहालयाचे काम मार्गी लावले जाईल.

            कृषि क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत महिलांसाठी ज्या योजना आहेत. त्यांच्यासाठी तीस टक्के वाटा होता. तो वाढवून 50 टक्के ठेवला जाईल. 2022-23 च्या अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी भरीव तरतुद करण्यात आली आहे. कोविडच्या परिस्थितीमुळे नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही. कुठल्याही विभागावर अन्याय होणार नाही, विभागीय असमतोल होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचेही वित्तराज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

            मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी व मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात असून चर्नी रोड येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. तसेच त्याचे उपकेंद्र नवीमुंबई येथे उभारण्यात येणार आहे. शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. कौशल्य विकास विभागाच्या योजना शहर व महानगरासह ग्रामीण भागात घेवून जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोविड परिस्थ‍ितीमुळे मागील कालावधीत ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले होते. आता ते ऑफलाईन सुरु केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून कौशल्य विकास विभागाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही श्री.देसाई यांनी सांगितले.

            गृहविभागाला सीएसआर फंडाच्या माध्यमातून पोलीसांसाठी गाड्या उपलब्ध करुन देण्यात आल्या.

            रोजगार हमी योजनेचे प्रस्ताव प्राप्त होतील त्याप्रमाणे निधीचे वितरण केले जाईल. वाईच्या पाठशाळेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले पोहरादेवी स्थळाचा आरखडा तयार केला असून याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आरखड्यासाठी आधिकचा वाढीव निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.

            सन 2022-23 च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, जयंत पाटील, विनायक मेटे, शशिकांत शिंदे, डॉ.परिणय फुके, संजय दौंड, निरंजन डावखरे, निलय नाईक, डॉ.रणजित पाटील, सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर, विक्रम काळे, रामदास आंबटकर, अनिकेत तटकरे, महादेव जानकर, कपिल पाटील, प्रसाद लाड, श्रीमती प्रज्ञा सातव आदींनी सहभाग घेतला होता.

000000

वृत्त क्र. 892

दोन वर्षपूर्तीनिमित्त आयोजित चित्रमय प्रदर्शन  

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचा आरसा

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत.

            मुंबई, दि. 16 : राज्य शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण आणि आकर्षक असून महाविकास आघाडी सरकारनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासाची घोडदौड यात प्रतिबिंबित होत असून हे प्रदर्शन शासनाच्या विकासकामांचा आरसा आहे अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

            कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात शासनाने सामान्य जनतेला मदतीचा हात देण्याबरोबरच प्रत्येक क्षेत्रात लोकाभिमुख निर्णय घेऊन काम केले. शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देणाऱ्या ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित चित्रमय प्रदर्शनाचे मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात आयोजन केले आहे.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या प्रदर्शनास भेट दिली. आणि डिजिटल स्वरूपातही जिल्ह्यातील विकासकामांचा समावेश करून प्रत्येक जिल्ह्यात प्रदर्शन आयोजित करावे अशा सूचना केल्या.

            प्रदर्शनातील सर्व विभागांच्या फलकांजवळ थांबून त्यांनी पहाणी केली, त्यावर सविस्तर चर्चा केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे यांनी प्रदर्शन आयोजित करण्यामागची भूमिका आणि संकल्पना यांची माहिती दिली. यावेळी उपसंचालक श्रीमती सीमा रनाळकर उपस्थित होत्या.

            या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 360 डिग्री व्हिडीओ सेल्फी पॉईंटबद्दल कौतुकाने चौकशी करून श्री.पाटील यांनी उत्साहाने व्हीडिओ सेल्फी काढून घेतला.

            या प्रदर्शनात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केलेल्या कामगिरीबरोबरच आरोग्य, मदत व पुनर्वसन, कृषी, उद्योग आदी विविध विभागांच्या निर्णयांच्या फलकांची आणि संबंधित छायाचित्रांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आवर्जून पाहणी केली.

            कोरोनासारख्या संकटावर मात करत महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या विकासाची घोडदौड सुरू ठेवली. अशी प्रतिक्रियाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

0000



Wednesday, 16 March 2022

 वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून होळी व धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा.

            मुंबई, दि. 16 :- “समाजातील दुष्प्रवृत्तींचे होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण साजरा करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घ्या. वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या गावखेड्यात, विशेषत: कोकणात साजरा होणारा होळीचा सण यंदाही आनंदात, उत्साहात साजरा होऊ दे. समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अनिष्ट रुढी, परंपरांचा विनाश होऊ दे. राज्यातल्या घराघरात, मनामनात ज्ञानाचा प्रकाश उजळू दे. होळी व धुलीवंदन साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळावा, नैसर्गिक रंगाचा वापर करावा. डोळे व त्वचेला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षित होळी साजरी करा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

0000000



 होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या १०० विशेष गाड्या.

परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांची माहिती.

प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करणार.

            मुंबई, दि. १६ : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून १६ ते २७ मार्च २०२२ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, तसेच एसटी संपाचा गैर फायदा घेवून खासगी बसेसनी प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारु नये, याबाबत प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्यादा भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करणाऱ्या दोषींवर परिवहन आयुक्त यांनी कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिले.

            होळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी जात असतात. एसटी महामंडळाचा संप काही ठिकाणी अद्याप सुरु असल्याने खासगी बसेस प्रवाशांची अडवणूक करुन अधीक दर आकारत आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेवून याबाबत परिवहन आयुक्त यांनी तपास पथक नेमून कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री ॲड.परब यांनी दिले.

            गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील आगारांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्यासाठी वाहतूक विभागाने पूर्ण तयारी केली असून पुणे, सातारा, सांगली आदी भागातून जादा बसेस मागविण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांचे नियोजन करण्यासाठी आगारांत एसटीचे अधिकारी व पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे सांगून सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही ॲड.परब यांनी केले आहे.

००००



 बाल संगोपनगृहात वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत संगोपन

राज्यात बाल संगोपन गृहांची संख्या वाढवणार

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

            मुंबई, दि. 16 : राज्यातील निराधार आणि बेघर बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत बाल संगोपन गृहात ठेवले जात होते, मात्र, वयाच्या २३ वर्षापर्यंत बाल संगोपन गृहात मुलांना राहण्याची परवानगी देणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. ११.४३ कोटी रूपयांची तरतूद आर्थिक संकल्पात करण्यात आली असून, बाल संगोपन गृहांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत सांगितले.

            रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ, बेघर तसेच दिवसभर रस्त्यावर राहून नजिकच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांबाबत सदस्य रईस शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, रस्त्यावरील बालकांच्या सर्वेक्षणाचे काम वेळोवेळी करण्यात येते, राज्यात सुमारे १९५ हॉटस्पॉट शासनाने शोधले असून, या ठिकाणी असलेल्या मुलांच्या सुटकेकरिता आणि त्यांच्या संगोपनाकरिता शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे तयार केलेल्या रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचा बचाव आणि पुनर्वसनासाठीच्या मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण करताना आढळून आलेल्या बालकांची चौकशी करून त्यांना सर्वप्रथम त्यांचे पालक किंवा नातेवाईकांकडे दिले जाते तसेच त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. बालकांच्या नातेवाईकांचा शोध न लागल्यास अशा पालकांना बालकल्याण समितीच्या समोर आणून आवश्यकतेनुसार बालगृहात दाखल करण्यात येते. राज्यात ३२६ बालगृहे कार्यरत असून महानगरपालिका क्षेत्रात बालकांसाठी ४३ खुली निवारागृहे असल्याची माहितीही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सभागृहाला दिली.

            शहरातील सिग्नलवर सुरू असलेल्या डे केअर सेंटर साठी सीएसआरमार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्यात विविध बालगृहांमध्ये असलेल्या बालकांचे संगोपन २३ वर्षांपर्यंत केले जात आहे. याचबरोबर वेश्या वस्तीतील मुलांसाठी अंगणवाड्या व शाळा आहेत. सूचना असल्यास त्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.



Featured post

Lakshvedhi