Sunday, 13 March 2022

फेक कॉइन


 

छोटी आई

 





 

 *उष्माघात वाढतोय, काळजी घ्या...*

~~~~~~~~~~~~~~~~~~

शरीरातील पाणी वाढवा - उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.

~~~~~~~~~~~~~~~~~

*उपाय---*

🔰 नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.

🔰 अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.

🔰 उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.

🔰 उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील. सकाळच्या आणि दुपारच्या जेवणानंतर मात्र थोडा वेळ डाव्या कुशीवर अवश्य झोपा ज्यायोगे पाचक रस जास्त स्रवण्यास मदत होईल.

🔰 हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.

🔰 माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.

🔰 पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.

🔰 आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.

🔰 सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी सावकाश प्या.

🔰 प्रत्येक काम सावकाशच करा. 

🔰 जेवतेवेळी मधे मधे एक दोन वेळा एखादा घोट असे थोडे पाणी प्यावे.

🔰ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.

🔰 खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.

🔰 जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.

🔰 दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.

🔰 रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.

🔰 उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.


◼पाणी प्यावे आवडीने,

आजार पळवा सवडीने.

: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*

➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖


 *दही भात :: एक आयुर्वेदिक औषध*


*पुर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तोही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा! आग्रह करताना सांगितले जायचे, " शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो !* " 

*मग मात्र तो जावई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे !* 

*आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत!*

*मग, काय आहे, नेमके, या शेवटाच्या दहीभाताचे इंगित ?* 

*यामागे, खरेतर फार मोठे आयुर्वेदिक शास्त्रीय कारण आहे !*

*पण ते तसे आरोग्यदायी व अत्त्यावश्यक म्हणून सांगितले असते तर तत्कालीन समाजाने स्विकारलेच असते, मानलेच असते, किंवा दैनंदिन अंगिकारले असतेच, याची खात्री नव्हती ! मग मानवी जीवनाला अत्त्यावश्यक बाब या पध्दतीने सातत्याने सांगितली गेली म्हणून ती आजवर सुखनैव चालू आहे, अंगिकारली जातेय !*

*मग नेमके ते भाग्य, सत्य काय आहे ?*

*दहीभातात दडलंय आनंदाचे रहस्य; काय म्हणते शास्त्र ?*

*आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो. तसेच ब्राम्हण वर्ग दही भात खातात.व तो कसा योग्य आहे ते आता सिद्ध झाले आहे.*

*जगातील सर्वात जुने शास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे. यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का?*

 *दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे संशोधनात सिद्ध झाले आहे.*

*मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते.*

 *पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटकांसोबत त्याचे मिश्रण झाल्यावर *सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे.* *त्याने आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात. *ट्रिप्टोफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावे लागते.ते इतर रसायनांएवढे सोपे नाहीये. त्यासाठी ट्रिप्टोफॅनचे कर्बोदकांबरोबर विघटन व्हावे लागते. कर्बोदकांच्या मदतीने ट्रिप्टोफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पोहोचते.*

*आता असा प्रश्न पडेल की कर्बोदक सांगितल्यावर दही भाताबरोबरच का खावे?*

 *याचे प्रमुख कारणे म्हणजे तांदळामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता.त्यामुळे यापुढे जेवणाची सांगता करताना थोडातरी दहीभात......*

*दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.*

*भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र दही भात खाणे हितकारक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढत नाही तर कमी होतं. आजकालच्या जीवनशैलीचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होतो. पुर्वी दही भात आर्वजून खाला जात असे. जाणून घेऊया दही भात खाण्याचे फायदे.*

*वजन कमी होते*

*दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते, कॅरलीज घटतात.*

*तापावर फायदेशीर*

*ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. *अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.*

*तसंच दह्यामुळे तुमची इम्मुनिटी वाढते.*

*पोट बिघडल्यावर*

*पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते. अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.*

*बद्धकोष्ठतेवर परिणामकारक*

 *तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रासअसेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात.* 

*यामुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.*

*तणावमुक्ती*

 *दही भात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मुड सुधारण्यास मदत होते.*


*श्रीकृष्ण पंडित*

*रत्नागिरी* 

९४२००५४०४०

८६६८३२९२०२ 

*पोस्ट जास्तित जास्त लोकाना पाठवा. कारण इतकं सहजतेने व साधं अस खाणं सर्वाना परवडणारं आणि आरोग्यास अतिशय चांगलं असं दुसरं कोणतच नाही.*

Saturday, 12 March 2022

Rikshaw, टॅक्सी fare

 




 नमुद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन

मान्यताप्राप्त शेअर ए-ऑटोरिक्षा व टॅक्सी प्रवासांसाठी स्टँड यादी आणि प्रतीप्रवासी भाडे


            मुंबई दि. १२: ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाडे भाड्यापेक्षा मीटरप्रमाणे देय होणारे भाडे हे कमी असते. मुंबईतील विविध भागातील प्रवाशांना या योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शेअर-ए-ऑटोरिक्षांच्या ८० मार्गांना व शेअर-ए-टॅक्सींच्या १७ मार्गांना मान्यता देण्यात आली आहे.

            या योजनेचा लाभ घेणाऱ्या जनतेला या प्रसिद्धीपत्रकामार्फत या दरांबाबत अवगत करण्यत येत असून संबंधित मार्गिकेसाठी ठरवून दिल्याप्रमाणेच प्रतीप्रवासी भाडे अदा करावे. तसेच शेअरिंग योजनेचा लाभ घेताना नमूद भाडे दरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास प्रवासाचा तपशील व वाहन क्रमांकासह कार्यालयाकडे तक्रार करावी, तसेच जनतेनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन सचिव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धीपत्रकामार्फत केले आहे.

            शेअर-ए-ऑटोरिक्षा व शेअर-ए-टॅक्सी या योजनेतून प्रवास करण्यासाठी मान्यताप्राप्त स्टँड यादी व त्या-त्या मार्गावर प्रतीप्रवासी किती भाडे देय आहे याची यादी सोबत जोडण्यात आली आहे . असे सचिव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धीपत्रकामार्फत कळविले आहे.


 


 


  


 


 


 

Featured post

Lakshvedhi