Friday, 11 March 2022

 Sent by- Padlikar: An idea gains value when you take action to bring it to life.

 लहान मुले पावसाळयात कागदाच्या लहान लहान होडया करून पाण्यात सोडतात, त्यांतली होडी तरली तरी हसतात, बुडाली तरी हसतात; त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसतखेळत झेलावीत; आणि हे एका नामानेच साधते.

श्रीराम समर्थ 🙏🏻

 





 



 

 


 *कावळा शिवण्याला काय आहे शास्त्राधार* । 👇🏻


माणसांना फक्त उजेडात दिसते... मांजराला उजेडात व अंधारातही दिसते... वटवाघुळ व घुबडास फक्त अंधारातच दिसते अशी निरनिराळी दृष्टी परमेश्वराने दिलेली आहे...

तशी त्या पिंडातील जीवात्मा दिसण्याची दॄष्टि परमेश्वराने कावळ्यास दिली आहे...

आपली इच्छा पुरी होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत तो जीवात्मा कावळयाला शिवू देत नाही... कावळे जवळ येतात पण उडून जातात... मृत व्यक्ति कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते, अशी अनेकांची समजूत आहे पण प्रत्यक्षात तसे नसून तो जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास मज्जाव करतो... पिंडाला कावळाच का शिवला पाहिजे तर कावळ्यास ही दृष्टी आहे म्हणून... जीवात्मा दिसण्याची दॄष्टि कावळ्याला आहे तर त्याचे डोळ्यातील लेंसप्रमाणे लेंस तयार करता आली तर आपणासही त्या पिंडातील जीवात्मा दिसू शकेल, असे वाटून जर्मनीतील एका संशोधकाने तशी लेन्स करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे... तशी लेन्स तयार झाली तरीही आपणास जीवात्मा दिसू शकणार नाही... कारण लेन्स हे जीवात्मा दिसण्याचे साधन नाही तर लेन्स बरोबर ती दॄष्टीही पाहिजे... तशी दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्यालाच् दिली आहे डोळ्यासारखा डोळा असूनही अनेक माणसांना दिसत नाही... दुसऱ्या माणसांना त्याचे डोळे इतर माणसां प्रमाणेच दिसतात पण दिसण्याची शक्ती त्यात नसते... दिसण्याची शक्ती सूर्याची असते... परमेश्वराच्या नेत्रापासून सूर्य निर्माण झाला आहे... चक्षो:सूर्यो अजायत... असे पुरुष सुक्तात म्हटले आहे... तसेच 'सूर्योमेचक्षुशिश्रिता' असे दूसरे वचन वेदांत आहे... याचा अर्थ पाहण्याची शक्ती सूर्यामुळे मिळते... डोळा हे पाहण्याचे साधन आहे... म्हणून कावळ्याच्या डोळ्यासारखी लेन्स तयार केली तरी त्यात सूर्यशक्ती नसल्याने (ध्वनीफितीत प्राणशक्ति नसते त्याप्रमाणे) त्या डोळ्यांनी जीवात्मा दिसणे शक्य नाही... जीवात्मा हा वायुरुप असतो... कावळा एकाक्ष,नजर तीक्ष्ण,सूक्ष्म... दहा दिवसापावेतो सूक्ष्म देह वासना रहिल्यास असतो, पिंडाभोवती फिरतो... कावळ्यास तो दिसल्याने काकस्पर्श होत नाही... ईच्छापूर्तीचे आश्वासन मिळाले की सूक्ष्म देह निघून जातो... हालचाल नाही म्हणून काक पिंडास स्पर्श करतो...

कावळा हा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे जो पर्यंत वैवस्वत मन्वन्तर आहे तो पर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिण्डाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामानी कावळ्याला वरदान दिले आहे म्हणून कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रांस होत नाही म्हणून कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात... 

 🙏🏻🍁🔆🍁🙏🏻


 

Featured post

Lakshvedhi