Tuesday, 8 March 2022

 महिला दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ‘कमला पॉवर विमेन पुरस्कार’ प्रदान

· अभिनेत्री सुहास जोशी सन्मानित

            मुंबई, दि. 32 :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील 38 कर्तृत्ववान महिलांना येथे 'कमला पॉवर विमेन' पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            अभिनेत्री सुहास जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. ट्रस्टच्या संस्थापिका निदर्शना गोवानी व रमेश गोवानी व्यासपीठावर उपस्थित होते.

            अंकीबाई घमंडीराम ट्रस्टच्या माध्यमातून निदर्शना गोवानी यांनी कोरोना काळात गरीब, महिला, कोविड योद्धे व उपेक्षितांची सेवा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना महिला हे शक्तीस्वरूप असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            भारतात स्त्रियांचा सन्मान करण्याची परंपरा वेदकाळापासून असल्याचे सांगताना त्यांनी गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी, अरुंधती आदींच्या विद्वत्तेचा गौरव केला. देश पारतंत्र्यात असताना काही महिलाविरोधी अनिष्ट प्रथा रुढ झाल्या. परंतु आज महिला सर्व क्षेत्रांत पुढे जात आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी मुलींनी अलीकडेच माउंट एव्हरेस्ट देखील सर केले. देश संकटात असताना महिला पुन:श्च शक्तिरूपा होऊन मदतीला धावून येतील असे त्यांनी सांगितले. 

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी चेतना सिन्हा, स्मिता थोरात, श्वेताली ठाकरे, कीर्ती चिंतामणी, रंजना कोळगे, पूनम चोक्सी, एलिझाबेथ एफ कट्टूक्करेन, प्रतिभा सांगळे, डॉ.जया महेश, पूजा उदेशी, शक्ती मोहन, सिमा टपरिया, विद्या भांडे, भावना जैन, रेखीव खान, प्रभात खान, स्मिता थोरात, विनिता साहू, गीता व्यंकटेश्वर, अलिशा सिंग, नीती मोहन, फरजाना दोहाडवाला, डॉ. रिश्मा पै, अधिवक्ता गौरी छाब्रिया, झैनाब जाविद पटेल, सिस्टर बर्टिला, सिस्टर लुसिया, नीती गोयल, डॉ.महिमा बक्षी, डॉ ऋचा जैन, अनुपमा देवराजन, माधुरी मडावी, बिनाफर कोहली, श्वेता वर्धन, सुलोचना चव्हाण, मनीषा वाघमारे, दिया मिर्झा, पूनम गौरव बोरसे, संगिता दशरथ धनकुटे, समीरा गुजर यांना सन्मानित करण्यात आले.

0000

Governor Koshyari presents 'Kamala Power Women Award

2022' to 38 women achievers

            Mumbai, Dt. 8 :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 'Kamala Power Women Award 2022' to 38 women achievers from various walks of life at Raj Bhavan Mumbai on the occasion of International Women's Day on Tuesday (8 Mar)

            The felicitation of women achievers was organised by the Ankibai Ghamandiram Gowani Trust. Theatre and film actor Suhas Joshi was among those felicitated on the occasion.

            Founders of the Trust Nidarshana Gowani and Ramesh Gowani were present.

            The Governor felicitated Chetna Sinha, Smita Thorat, Shwetali Thakare, Kirti Chintamani, Ranjana Kolge, Poonam Choksi, Elizabeth F Kattookkaren, Pratibha Sangale, Dr. Jaya Mahesh, Pooja Udeshi, Shakti Mohan, Sima Taparia, Vidya Bhande, Bhawna Prakash, Rekha Khan, Jasmin Bhasin, Vinita Sahu, Geetha Venkateswar, Alisha Singh, Neeti Mohan, Farzana Dohadwala, Dr. Rishma Pai, Advocate Gauri Chhabria, Zainab Javid Patel, Sister Bertilia, Sister Lucia, Neeti Goel, Dr. Mahima Bakshi, Dr. Richa Jain, Anupama Devarajan, Madhuri Madavi, Binaifer Kohli, Shweta Vardhan, Sulochana Chavan, Manisha Waghmare, Poonam Gaurav Borse, Samira Gujar and Sangita Dashrath Dhankute on this occasion. Samira Gujar conducted the proceedings.

0000





 




 


  मुक्ता

            कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी मुक्ततेसाठी मिशन मुक्ता ही मोहीम राबविण्यात येणार आहे. किरकोळ कारणासाठी कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी, त्यांना न्यायव्यवस्थेत कायदेशीर मदत मिळत नसल्यामुळे किंवा बोर्ड ऐकत नसल्यामुळे कारागृहात रहावे लागते, अशा महिलांना कायदेशीर मदत करून त्यांना कारागृहातून सोडवणुकीसाठी कोर्टामध्ये सहकार्य करणे व त्यांचे समुपदेशन करणे याकरिता महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण संचालक, महाराष्ट्र अभिवक्ता संचालक, जेल प्रिझम यांच्या समवेत महिलांच्या कायदेशीर सहकार्याकरिता राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.  

नवतेजस्विनी अंतर्गत महिला बचत गटांना 523 कोटींचा निधी

            ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी नवतेजस्विनी अंतर्गत महिला बचत गटांना 523 कोटींचा निधी दिला आहे.सर्वांगीन प्रगती साधण्यासाठी महिला आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे.त्यामुळे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या उपक्रमांना सुरवात झालेली असून यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पासाठी बेसलाईन सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे.241 सबप्रोजेक्टना मंजुरी देण्यात आलेली आहे.

अंगणवाड्यांच्या माध्यमातून परसबाग

            राज्याच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत परसबाग ही संकल्पना राबवण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या परिसरात परसबागांचा उपक्रम घेण्यात येतो आहे. यामध्ये विविध पालेभाज्या आणि फळभाज्या यांची पिके घेतली जातात. पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येत असलेली परसबाग योजना आता कुटुंबांसाठी वरदान ठरते आहे, यामुळे अनेक कुटुंबांची दररोजची थाळी चौरस आहाराने सजते आहे. परसबाग या सुंदर संकल्पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केलं, ते अंगणवाडी सेविकांनी.

पोषण माह

            कुपोषित आईच्या पोटी कुपोषित बालक जन्माला येणार, त्यामुळे सुदृढ बालके, सुदृढ कुटुंब, सुदृढ समाज आणि सुदृढ राष्ट्र घडवायचे असेल तर महिलांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक पोषणाकडे लहानपणापासून लक्ष देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र व महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर हा महिना पोषण माह म्हणून घोषित केला आहे. अंगणवाड्यांमधून योग्य आहार गरोदर व स्तनदा माता, मुले यांना पुरविण्यात येत आहे. कोरोना काळातही यात खंड पडू दिला गेलेला नाही.

राज्य महिला आयोग

            राज्यातील पीडित महिलांना आपल्या तक्रारी इत्यादी प्रकरणात जलद न्याय मिळणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे.राज्यभरातील महिलांना आपल्या तक्रारी घेऊन मुंबईला येणे सोयीचे नाही, हे लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालयांच्या मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे ही सर्व कार्यालये कार्यान्वित करण्यात आली आहेत. 

 नागरी सुविधांसाठी मौजे कामठा आणि जोडपिंपरी गावांना

अनुक्रमे ४३ आणि १९ लाखांचा निधी मंजूर

-मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. ७ :- मुलभूत नागरी सुविधांसाठी हिंगोली जिल्ह्यातील मौजे कामठा आणि जोडपिंपरी या गावांना अनुक्रमे ४३ लाख आणि १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्यातील दोन टप्प्यांत निधी दिला असून मागणी आल्यास शिल्लक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

            विधानसभा सदस्य चंद्रकांत नवघरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, अंजनवाडी या पूरग्रस्त गावाचे पुनर्वसन तेथील ग्रामस्थांनी केले असून मुलभूत नागरी सुविधा तेथे पुरविल्या आहेत. १९७६ पूर्वीच्या प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्त कामठा व जोडपिंपरी या गावठाणातील नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकांना शासनाने मान्यता प्रदान करुन निधी देखील वितरीत केल्याचे मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

००००

 


 सक्षम महिला समृद्ध राष्ट्र

            महिलांचा आर्थिक विकास आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा म्हणजे महिलांचे सक्षमीकरण नव्हे. आर्थिक विकासाबरोबर त्यांचा सामाजिक विकास घडवून आणणे, त्यांना त्यांचे हक्क व जबाबदारीची जाणीव करून देणे, त्यांना नियोजन व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे, त्यांच्या क्षमतेचे संवर्धन करून आर्थिक क्षमता प्राप्त करण्यास सबळ बनविणे तसेच महिला या समाजाचा घटक असल्यामुळे समाजाच्या विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होय. लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत.

महिला धोरण

            महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या विकासासाठी राज्याने पहिले महिला धोरण सन 1994 मध्ये जाहीर केले. महिला धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.त्यानंतर सन 2001 व 2014 मध्ये दुसरे व तिसरे महिला धोरण विभागामार्फत जाहीर करण्यात आले. आता चौथ्या महिला धोरणाचा मसूदा अंतिम टप्यात आहे. या वर्षीचे धोरण हे केवळ मार्गदर्शक सूचनांच्या स्वरुपात मर्यादीत न राहता त्याला कृती आराखड्याची व संनियंत्रणाची जोड पहिल्यांदाच देण्यात येत आहे. अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना कोणत्या असतील आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाच्या कोणत्या विभागाची असेल, या मुद्यांचा समावेश धोरणातच करण्यात आला आहे.

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 3 टक्के निधी.

            राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रत्येक जिल्हयामध्ये महिला व बाल सशक्तीकरण या सर्वसमावेशक योजनेकरिता (Umbrella Scheme) जिल्हा नियोजन समितीस नियोजन विभागाकडून मिळणाऱ्या एकूण निधीच्या किमान 3% इतका निधी कायमस्वरुपी महिला व बालविकास विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या विकासासाठी शासनातर्फे त्रिस्तरीय धोरण राबविण्यात येत असून महिला सबलीकरण आणि बालकांचा विकास, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध

            महिला बचत गट चळवळीमुळे महिलांचे एक जाळे निर्माण झाले असून त्यांच्यातील आत्मविश्वासामुळे कुटुंबात त्यांच्या मताला मान दिला जातो. या बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी मी महत्त्वाचे‍ निर्णय घेत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी बचतगटासारख्या माध्यमांचा उपयोग केला आहे. मविमही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी त्यांना सक्षम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. बचतगटाच्या महिलांच्या शेतमालाला बाजारपेठ व उत्कृष्ट दर मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. माविम आपल्या ई-बिझनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून त्यासाठी बाजारपेठेतील संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.त्याच्या अनुषंगाने, वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे सामंजस्य करार केले आहेत.

सायबर सखी उपक्रमातून महाविद्यालयातील मुलींना प्रशिक्षण

            मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे फसवणूक यातही वाढ होते आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी डिजीटल स्त्री शक्ती उपक्रम 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरूणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम,तांत्रिक फसवणूक आदी बाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

Continue.

Featured post

Lakshvedhi