Sunday, 26 December 2021

 औद्योगिक संबंध संहिता नियम -2021 च्या मसुद्याबाबत

 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुदा शासनाने 3 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला आहे. या मसुद्याबाबत हरकती व सूचना 45 दिवसांच्या आत सादर कराव्यात, असे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक संबंध संहिता, 2020 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, 2021 चा मसुदा नियम महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in तसेच कामगार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahakamgar.maharashtra.gov.in यावर कायदा व नियम शिर्षाखाली प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे पूर्व, मुंबई – 400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या mahalabourcommr@gmail.com वर स्विकारण्यात येतील.

            या अधिसूचनेवर नमूद केलेला कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी या प्रारूपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेकडून प्राप्त होणारे आक्षेप किंवा सूचना, राज्य शासनामार्फत विचारात घेण्यात येतील, असे कामगार आयुक्त यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

000

 *कर्म फळ*

श्रीकृष्णाने कंसाला मारल्यावर, वासुदेव व देवकी, अर्थात त्याचे आई आणि वडील, यांना सोडवण्यास तुरुंगात आला. 

देवकी माताने उत्सुकतेने विचारले, *“बाळा, तु स्वःतच देव आहे, आणि तुझ्याजवळ तर दैवी शक्ती सुद्धा आहेत; मग, तु कंसाला मारण्यास आणि आम्हाला सोडवण्यासाठी चौदा वर्षाची वाट का बघितलीस?”*

श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाला, *“आदरणीय माते, क्षमा कर. पण मागच्या ज्नमी तु मला चौदा वर्ष वनवासासाठी जंगलात का पाठवले होतेस?”*

देवकी खुप आश्चर्यचकीत ज्ञाली आणि तिने नाकारत म्हणाली, “कृष्णा, हे कस अशक्य आहे? हे तु कशावरून म्हणतोस?”

श्रीकृष्णाने शांततेने उत्तर दिले, *“माते, तुला मागच्या जन्माबद्दल काही आठवणार नाही. मागच्या जन्मी तु कैकयी होतीस आणि पिता दशरथ होते.”*

देवकी खुप आश्चर्यचकीत झाली आणि तिने कुतुहलाने विचारले, *“मग, आता कौसल्या कोण आहे?”*

श्रीकृष्णाने उत्तर दिले, *“माता यशोदा. मागच्या जन्मी जे चौदा वर्षे मातृ प्रेमाला ती वंचीत राहिली, ते तिला ह्या जन्मी मिळाले”*

*कर्मा ची फळं सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका ज्ञालेली नाही.* 

आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा.

*स्वार्थ सोडुन, सर्व धर्माची, देशाची, समाजाची आणि कुटुंबांची सेवा करत रहा.*

    🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

Govt resolution


 

Government resolution


 

Govt resolution


 

 


 जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने काम करावे,


 


                                                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार

        सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का): जिल्ह्याच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती सरकार म्हणून आम्ही करू. विकासासाठी काम करताना त्यामध्ये कोणतेही राजकारण न आणता एकोप्याने काम करा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

            जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात नियोजन समितीचे कामकाज, कोविड - 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाय योजना तसेच चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याविषयी आढावा बैठकीचे आयोजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. व्यासपीठावर केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

       जिल्ह्यातील विकास कामे करताना मंत्रालयीन स्तरावर काही अडचणी असल्यास त्या आम्हाला सांगा, आम्ही त्या सोडवू असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, प्राथमिक स्तरावर अडचणी सोडवून तातडीने कामे पूर्ण करण्यासाठी त्यावर मार्ग काढा. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा. त्यासाठी परवानग्या मिळण्यात काही अडचण असल्यास निदर्शनास आणाव्यात. समन्वयाने त्या अडचणी सोडवण्यात येतील. चिपी विमानतळाचा रस्ताही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा. वेंगुर्ला येथील सागर बंगला सुस्थितीत करावा. तसे करत असताना त्याचे वैशिष्ट्य तर जपाच पण त्यात आणखी काय नवीन करता येईल याचाही एक आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

       कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करून त्यानुसार काम करावे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरसा साठा निर्माण करावा. कोविड नियंत्रणासाठी निधीची नव्याने आवश्यकता असल्यास तो ही देण्यात येईल. सध्या सुरू असलेली कोविड रुग्णालयाची कामे तातडीने पूर्ण करावीत. कुडाळ येथील महिला रुग्णालयाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करावे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा, ठेकेदारांशी बोलावे. कोविड काळात सेवा बजावत असताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना द्यावयाची मदत तातडीने देण्यात यावी. राज्य सरकार आणखी काही रुग्णवाहिका घेणार आहे. त्यामधून जिल्ह्याला आणखी किती रुग्णवाहिकांची गरज आहे त्याचा प्रस्ताव सरकारकडे तातडीने पाठवावा अशा सूचना केली.

            चक्रीवादळ आणि अतिवृष्टीचा आढावा घेताना ते म्हणाले, जिल्ह्यासाठी एसडीआरएफच्या निधीचा दुसरा हप्ता तातडीने देण्यात येईल. तसेच मच्छिमारांच्या डिजेल परताव्यासाठीची रक्कमही लवकरात लवकर देण्यात येईल. जिल्ह्यातील रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत. त्यासाठी निधी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचा प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर सादर करावा. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने काय सोयी करता येतील या विषयी प्रस्ताव तयार करावेत. जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात येणारा निधी सर्व विभागांनी खर्च करावा. हा निधी जनतेच्या कामांसाठी आहे. त्यामुळे तो योग्य प्रकारे व वेळेत कसा खर्च होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सक्त सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

       पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाकरिता देण्यात आलेला निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा यासाठी आपण स्वतः लक्ष घालत असून संबंधित यंत्रणांनी तो निधी योग्यरित्या खर्च व्हावा याकडे लक्ष द्यावे व त्या अनुषंगाने प्रस्ताव द्यावेत. तर केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री श्री. राणे यांनी पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याला जास्तीचा निधी देण्याची मागणी केली. यंत्रणांनी पूरहानी सारख्या कामांचे प्रस्ताव सादर करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी अशी सूचना त्यांनी केली.

       आमदार वैभव नाईक यांनी रस्त्यांच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्य द्यावे अशी सूचना केली. आमदार दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेऐवजी सिंधुरत्न योजना सुरू केली आहे. ही योजना राबवण्यासाठी नियोजन विभागाने चांदा ते बांदा या योजनेच्या नावात फक्त बदल करावा आणि सिंधुरत्न योजना असे नामकरण करावे अशी मागणी केली.

        जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी नियोजन समितीच्या खर्चाचा आढावा देताना सांगितले, जिल्हा नियोजनच्या 170 कोटींच्या तरतुदीपैकी 42 कोटी 7 लक्ष रुपये म्हणजेच 25 टक्के निधी खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनांच्या 14 कोटी 78 लक्ष पैकी 2 कोटी 73 लक्ष म्हणजेच 19 टक्के निधी खर्च झाला आहे. आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्राचा 19 टक्के निधी खर्च झाला आहे. सन 2018-19 मध्ये 99.02 टक्के, 2019-20 मध्ये 97.82 टक्के आणि 2020- 21 मध्ये 100 टक्के निधी खर्च खर्च झाला आहे. कोविडसाठी आतापर्यंत एकूण 43 कोटी 70 लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे चक्र महिला पोलिसाच्या हाती

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या वाहनाचे सारथ्य पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक या महिला पोलीसाच्या हाती होते. तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. त्या मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी या गावच्या 

Featured post

Lakshvedhi