*कर्म फळ*
श्रीकृष्णाने कंसाला मारल्यावर, वासुदेव व देवकी, अर्थात त्याचे आई आणि वडील, यांना सोडवण्यास तुरुंगात आला.
देवकी माताने उत्सुकतेने विचारले, *“बाळा, तु स्वःतच देव आहे, आणि तुझ्याजवळ तर दैवी शक्ती सुद्धा आहेत; मग, तु कंसाला मारण्यास आणि आम्हाला सोडवण्यासाठी चौदा वर्षाची वाट का बघितलीस?”*
श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाला, *“आदरणीय माते, क्षमा कर. पण मागच्या ज्नमी तु मला चौदा वर्ष वनवासासाठी जंगलात का पाठवले होतेस?”*
देवकी खुप आश्चर्यचकीत ज्ञाली आणि तिने नाकारत म्हणाली, “कृष्णा, हे कस अशक्य आहे? हे तु कशावरून म्हणतोस?”
श्रीकृष्णाने शांततेने उत्तर दिले, *“माते, तुला मागच्या जन्माबद्दल काही आठवणार नाही. मागच्या जन्मी तु कैकयी होतीस आणि पिता दशरथ होते.”*
देवकी खुप आश्चर्यचकीत झाली आणि तिने कुतुहलाने विचारले, *“मग, आता कौसल्या कोण आहे?”*
श्रीकृष्णाने उत्तर दिले, *“माता यशोदा. मागच्या जन्मी जे चौदा वर्षे मातृ प्रेमाला ती वंचीत राहिली, ते तिला ह्या जन्मी मिळाले”*
*कर्मा ची फळं सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका ज्ञालेली नाही.*
आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा.
*स्वार्थ सोडुन, सर्व धर्माची, देशाची, समाजाची आणि कुटुंबांची सेवा करत रहा.*
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
No comments:
Post a Comment