Monday, 1 November 2021

 *संपू दे अंधार सारा*

 उजळू दे आकाश तारे

 *गंधाळल्या पहाटेस येथे*

वाहू दे आनंद वारे....

*जाग यावी सृष्टीला की*

 होऊ दे माणूस जागा

*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*

घट्ट व्हावा प्रेम धागा...

*स्वच्छ सारे मार्ग व्हावे*

अन् मने ही साफ व्हावी

*मोकळ्या श्वासात येथे*

जीवसृष्टी जन्म घ्यावी...

*स्पंदनांचा अर्थ येथे*

एकमेकांना कळावा

*ही सकाळ रोज यावी*

आणि माणसाचा देव व्हावा.........

*आजपासून दिवाळी सुरू होतेय*...

*सगळ्यांना दीपोत्सवाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा!!!*

  *🌹सुप्रभात🌹*

 ☀️                       *सुप्रभात*                      ☀️

*बहुत फर्क होता है..*

         *किसी को 'जानने' और 'समझने' में....*

*जानता वो है जो 'साथ' होता हैं....*

       *समझता वो है जो 'पास' होता हैं...

            🙏🏻🙏🙏*🌹एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात.

*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*

         

      🌹🌻 *|| शुभ सकाळ ||*🌻🌹

Sunday, 31 October 2021


 

 महानगरपालिका व बेस्ट कर्मचाऱ्यांना दीपावली -२०२१ साठी

सानुग्रह अनुदान जाहीर

 

         बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी यांना दीपावली - २०२१ सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबईच्या महापौर श्रीमती किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक २९ ऑक्टोबर २०२१) मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगला येथे झालेल्या बैठकीत रुपये २० हजार इतके सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

दीपावली -२०२१ करीता महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय या बैठकीत घोषित करण्यात आला.

 

क्रम

तपशिल

सानुग्रह अनुदान रक्कम

महानगरपालिका आणि बेस्ट अधिकारी /  कर्मचारी, प्राथमिक शिक्षक

रु. २०,०००/-

माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित शाळा यातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारी

रु. १०,०००/-

प्राथमिक शिक्षण सेवक

रु. ५,६००/-

आरोग्य सेविका

रु. ५,३००/-

विनाअनुदानित माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा शिक्षण सेवक

रु. २,८००/-

 

बैठकीला उप महापौर ऍड. सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, बेस्ट समितीचे अध्यक्ष श्री. आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्रा, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी / कर्मचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.     

0000

 

(संदर्भ क्रमांक: जसंवि/ ४१५/ बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग)


 *पैशालाच किंमत देणारेसाठी अवश्य वाचावे असे*


*"लक्ष्मी आणि विष्णू मधील संवाद"*


*लक्ष्मी म्हणते:-*जग सर्वच पैशावर चालते, पैसा नाहीतर काही नाही म्हणून मलाच किंमत'.*


*विष्णू:-* सिद्ध करुन दाखव.


*लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते त्यात अंतयात्रा चाललेली असते*


*लक्ष्मी वरुन पैशांचा वर्षाव करते, सर्व लोक त्या प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात.*

*लक्ष्मी विष्णूंना म्हणते कि- बघा बघितल,ं पैशाला किती किंमत आहे ते !!*


*विष्णु हसले न म्हणाले-*प्रेत नाही उठले पण ते पैसे जमा करायला?*


*लक्ष्मी:-*प्रेत कसे उठणार तो तर मेलाय !*


*विष्णूंनी खूप सुंदर उत्तर लक्ष्मीमातेला दिले:-*

*'जो पर्यंत मी शरीरात आहे ,तो पर्यंतच तुला ह्या जगात किंमत आहे.*

*ज्या क्षणी मी ह्या शरीरातून*

*जाईन तेव्हा पैसा सर्व माती मोलच'....*

*नाते सांभाळायचे असेल तर..*

*चुका सांभाळून घेण्याची*

*मानसिकता असावी ...*

*आणि*

*नाते टिकवावयाचे असेल तर ..*

*नको तिथे चुका काढण्याची*

*सवय नसावी ....*


*कुटुंब आणि आप्त प्रेम हेच*

*जीवनाचे खरे मुळ आहे*


*रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही आपण ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न करत असतो.*


  *तसेच,आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण त्या रांगोळीप्रमाणेच ते जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.*


*माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..मोठी असत ते माणुसकी*

🙏🙏🙏🙏👏👏👏👏

 



दि. 25 ऑक्टोबर 2021

 

मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

 

        मुंबईदि. 25 : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

            मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पुनरीक्षण कार्यक्रम राबविणार आहेदिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहेया कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक वय असलेले नागरिक आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहेविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

            महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात घरोघरी आकाशदिवा लावला जातो आणि रांगोळी काढली जातेयाच आकाशदिवा आणि रांगोळीच्या माध्यमातून यंदाची दिवाळी लोकशाहीमय साजरी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. ‘सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी’ हे लक्षात ठेवून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करावेआकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावाजसे डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन  इ. वापरावा. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावेचुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरिता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करावा.

            बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो. पण तसे नसून मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदारयादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासून घ्यावेत, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावा18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात यावे.

            स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत  https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या दुव्यावर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये  (प्रथम क्रमांक), सात हजार रुपये (द्वितीय क्रमांक), पाच हजार रुपये (तृतीय क्रमांक) आणि दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. स्पर्धेची आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यंदाची दिवाळी लोकशाहीमय करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले आहे.

स्पर्धेची नियमावली :

१.      स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत.

२.     स्पर्धकाला आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गुगल अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे.

३.     आकाशदिवा (आकाशकंदील) स्पर्धा :-

अ.   आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले असावे.

आ. लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.

इ.      प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावतीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.

ई.       फोटोवर कोणाचेही नावलोगोचित्रफ्रेमडिजा, असे अधिकचे काही जोडू नये. 

उ.     आकाशदिवा स्पर्धेसाठी टांगलेल्या आकाशदिव्याची चित्रफीत पाठवावी, जेणेकरून आकाशदिव्याची सजावट चहुबाजूंनी दिसू शकेल. ही चित्रफीत कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची असावी.

ऊ.   आकाशदिव्याच्या चित्रफितीची (व्हिडिओची) साज जास्तीत-जास्त ०० MB असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असाव.

ऋ.   आकाशदिव्याची चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, चित्रफितीत कोणाचेही नावलोगोचित्रफ्रेमडिजा, असे अधिकचे काही जोडू नये. चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.

ऌ.    आकाशदिवा स्पर्धेंसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित आकाशदिव्याचे तीन फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

४.   रांगोळी स्पर्धा :-

अ.   लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.

आ.  प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त  Mसाइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावतीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.

इ.      फोटोवर कोणाचेही नावलोगोचित्रफ्रेमडिजा, असे अधिकचे काही जोडू नये. 

ई.      रांगोळी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे तीन फोटो पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

५.    आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये घोषवाक्यांचा वापर केला असेल तर गुगल अर्जामध्ये ती घोषवाक्ये लेखी स्वरूपातही पाठवावीत.

६.     आपले फोटो आणि चित्रफीत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.

७.    स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा.

८.    दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ ते १५ नोव्हेंबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

९.     आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांच्या बक्षिसांचे स्वरूप प्रत्येकी पुढीलप्रमाणे असेल:

अ. प्रथम क्रमांक :- ११,०००/-

ब. द्वितीय क्रमांक :- ७, ०००/-

क. तृतीय क्रमांक :- ५,०००/-

ड. उत्तेजनार्थ :- १,००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

10लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयाशी संबंधित साहित्य पाठवणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच, विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह  देण्यात येईल.

11. आलेल्या साहित्यामधून सर्वोत्तम साहित्य निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.

12. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल.

13. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

14. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये आकाशदिवा स्पर्धकांचे साहित्य प्रसारित केले जाईल. तेव्हा उत्कृष्ट आकाशदिवा स्पर्धकांनी आपले साहित्य जपून ठेवावे. कार्यालय आपल्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधेल.

000

 *🌹एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात.

*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*

         

      🌹🌻 *|| शुभ सकाळ ||*🌻: *🌅🙏..


आयुष्याच्या वाटचालीत तुम्ही

*निवडलेला* रस्ताच जर

*योग्य* आणि *इमानदारीचा* असेल 

तर मग *थकून* जाण्याचा 

*प्रश्नच* उरत नाही...,

भले कोणी  तुमच्या *सोबत* असो  किंवा  नसो...!


...!💐


★ ◆ ★

Featured post

Lakshvedhi