Tuesday, 26 October 2021

 बार्डो’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ताजमाल’ तर सामाजिक विषयासाठी  आनंदी गोपाळ’ ला पुरस्कार

 

            दिल्लीदि.25 : ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार देऊन उपराष्ट्रपती वैकंया नायडू यांनी गौरव केला. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारासाठी ताजमाल’ तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            विज्ञान भवनात 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुरकेंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगनमाहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रदान करण्यात आलेले पुरस्कार वर्ष 2019 चे आहेत. 

अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

            सुप्रसिद्ध तसेच बहुभाषिक अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी कन्नडतेलुगुतमिळहिंदीमल्ल्याळमइंग्लिशबंगाली या भाषेतील सिनेमांमध्ये अभिनय केलेला आहे. रजनीकांत यांचे मुळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड असून ते कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील मराठी कुटुंबातील आहेत. त्यांनी चित्रपट सृष्टीतील कारर्कीद 1975पासून सुरू केली.

            अभिनेता मनोज वाजपेयी यांना भोसले’ या हिंदी चित्रपटासाठी तर दक्षिण भारतीय अभिनेता धनुष यांना असुरन’ यांना तमिळ चित्रपटासाठी यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील पुरस्कार विभागुन प्रदान करण्यात आला.

            अभिनेत्री कंगना राणावत यांना मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’ आणि पंगा’ या दोन चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बार्डो’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

             बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे हे आहेत. रितु फिल्मस कट एलएलपीने हा चित्रपट निर्माण केलेला आहे. याच चित्रपटातील रान पेटला...’ या गाण्याच्या गायिका सावनी रवींद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

            आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनचाही पुरस्कार मिळाला आहे. प्रोडक्शन डिझाइन सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.

            राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ताजमाल’ या सिनेमाला प्रदान करण्यात आला आहे. हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शीत केला आहे. तर टूलाईन स्टूडियो प्रा.लि. यांची निर्मिती आहे.

            ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सुपर डिलक्स’ या तमिळ सिनेमासाठी विजय सेथुपथी यांना सहायक अभिनेता या श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार

            जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रियेशनने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.

            उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहे.  राज प्रीतम मोरे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे. सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत होली राईट्स’ या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.

स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार प्रदान

            स्पेशल मेन्शन या श्रेणीत सत्य घटनावर आधारित लता भगवान करे’ या मराठी सिनेमात अभिनय करणाऱ्या लता करे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्रीमती करे यांचे पती आजारी होते त्यांच्या आजारपणासाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी बारामतीतील मॅरॉथॉनमध्ये धावुन त्यांनी प्रथम पुरस्कार मिळविला. त्यांच्या या विलक्षण कृतीवरच हा सिनेमा बनविलेला आहे.

याच श्रेणीत पिकासो’ या मराठी सिनेमाला सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत.

             त्रिज्या’ या सिनेमाला उत्कृष्ट ऑडीयोग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

            चित्रपटांवरील उत्कृष्ट समिक्षात्मक पुस्तक या श्रेणीत सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला स्पेशल मेन्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हे पुस्तक अशोक राणे यांनी लिहिले आहे.

००

 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या

महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

- परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा

 

            मुंबईदि. 25 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली.

            परिवहन मंत्री श्री. परब म्हणालेया निर्णयाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.अजित पवार यांचे श्री.परब यांनी आभार मानले.

            महागाई भत्त्यात वाढ करावीअशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहेत्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे श्री. परब यांनी यावेळी सांगितले.

000



 


 


 

Monday, 25 October 2021

Dipavali festival rangoli competition

 मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

 

        मुंबईदि. 25 : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

            मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पुनरीक्षण कार्यक्रम राबविणार आहेदिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहेया कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक वय असलेले नागरिक आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहेविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

            महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात घरोघरी आकाशदिवा लावला जातो आणि रांगोळी काढली जातेयाच आकाशदिवा आणि रांगोळीच्या माध्यमातून यंदाची दिवाळी लोकशाहीमय साजरी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. ‘सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी’ हे लक्षात ठेवून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करावेआकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावाजसे डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन  इ. वापरावा. शिवाय, मतदार नोंदणी; नाव वगळणी; तसेच, मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावेचुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात, याकरिता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करावा.

            बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो. पण तसे नसून मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदारयादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासून घ्यावेत, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावा18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात यावे.

            स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धकांनी स्पर्धेचे साहित्य 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत  https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या दुव्यावर पाठवावे. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये  (प्रथम क्रमांक), सात हजार रुपये (द्वितीय क्रमांक), पाच हजार रुपये (तृतीय क्रमांक) आणि दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. स्पर्धेची आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यंदाची दिवाळी लोकशाहीमय करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले आहे.

स्पर्धेची नियमावली :

१.      स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत.

२.     स्पर्धकाला आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गुगल अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे.

३.     आकाशदिवा (आकाशकंदील) स्पर्धा :-

अ.   आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले असावे.

आ. लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत.

इ.      प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावतीनही फोटोंची एकत्रित साइज १५ MB पेक्षा जास्त असू नये.

ई.       फोटोवर कोणाचेही नावलोगोचित्रफ्रेमडिजा, असे अधिकचे काही जोडू नये. 

उ.     आकाशदिवा स्पर्धेसाठी टांगलेल्या आकाशदिव्याची चित्रफीत पाठवावी, जेणेकरून आकाशदिव्याची सजावट चहुबाजूंनी दिसू शकेल. ही चित्रफीत कमीत-कमी ३० सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची असावी.

ऊ.   आकाशदिव्याच्या चित्रफितीची (व्हिडिओची) साज जास्तीत-जास्त ०० MB असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असाव.

ऋ.   आकाशदिव्याची चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, चित्रफितीत कोणाचेही नावलोगोचित्रफ्रेमडिजा, असे अधिकचे काही जोडू नये. चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल

 भाईंदर कोविड उपचार केंद्रात

महिलेचे चित्रीकरण व ब्लॅकमेल प्रकरणी कडक कारवाई करा

 उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांचे निर्देश

 

          मुंबई, दि 25 : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिला  परिचारिकेचे चित्रीकरण व ब्लॅकमेलप्रकरणी तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यावर दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे दिले आहेत.

Featured post

Lakshvedhi