सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 25 October 2021
विद्यादानासाठी मदत करण्याचा मटा हेल्पलाईनचा उपक्रम प्रशंसनीय’
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
‘उद्यमी व्हा, परिश्रम करा आणि इतरांना जीवनदान द्या’: राजभवन येथील भावपूर्ण सोहोळ्यात राज्यपालांचे विद्यार्थ्यांना आवाहन
मुंबई, दि. 24 : अतिशय कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. आपले स्वतःचे लहानपण देखील अतिशय खडतर परिस्थितीत गेले आहे. मात्र जो स्वतःला मदत करतो, देव त्यालाच मदत करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खंबीर व्हावे, कठोर परिश्रम करावे, नोकरी – उद्योग करावे व यशस्वी झाल्यावर आपण देखील समाजातील गरजूंना शिक्षणाच्या माध्यमातून जीवनदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
विपरीत परिस्थितीत उत्तम गुणांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टाइम्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने उच्च शिक्षणासाठी मटा वाचकांच्या माध्यमातून मदत करण्यात आली. या विद्यार्थ्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे प्रातिनिधिक स्वरुपात 'मटा हेल्पलाईन विद्यार्थी धनादेश' देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
विद्यादान हा एक यज्ञ आहे. महाराष्ट्र टाइम्सने चौदा वर्षांपासून हेल्पलाईनच्या माध्यमातून केलेल्या विद्यादानाच्या या यज्ञामुळे जवळजवळ 500 होतकरू विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत तेवत आहे. हेल्पलाईनचे हे कार्य अद्भुत, प्रशंसनीय आहे. मटाने या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवे जीवन देऊन समाजापुढे एक चांगले उदाहरण प्रस्तुत केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
निस्वार्थ भावनेने वाचकांनी केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश पडला आहे. परमेश्वराला आपण पाहू शकत नाही तसेच ज्या वाचक – दात्यांनी आपले नाव प्रकाशात येऊ न देता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली ते देवरुपच आहेत असे सांगत राज्यपालांनी सर्व वाचक-दात्यांचे कौतुक केले.
आपली आई लोकांकडे घरकाम करून आपल्याला शिकवत आहे. वाचकांच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतीतून आपण शिक्षण घेऊन स्वावलंबी होऊ आणि आईला घरकाम करू देणार नाही, असे सांगताना मुस्कान शेख या मुलीच्या भावनेचा बांध फुटला. मुस्कानच्या हुंदक्यामुळे राज्यपालांसह सर्व उपस्थितांना गहिवरून आले.
|
कोरोना काळात गरीब गरजू विद्यार्थ्यांसह ज्यांचे मातृछत्र, पितृछत्र हरवले आहे अशा विद्यार्थ्यांना निवडले गेले. यावर्षी राज्यातून 45 विद्यार्थी निवडले व त्यांना 2.75 कोटी रुपये इतकी मदत झाली. गेल्या 14 वर्षांत मटा हेल्पलाईनच्या माध्यमातून 483 विद्यार्थ्यांना 25 कोटी रुपयांची मदत झाली. हे विद्यार्थी नागरी सेवेसह अनेक क्षेत्रात योगदान देत आहेत, असे मटाचे संपादक पराग करंदीकर यांनी सांगितले. आज मदत घेणारे हात उद्या मदत देणारे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विनायक राणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर निवासी संपादक श्रीकांत बोजेवार यांनी आभारप्रदर्शन केले.
000
Governor presents cheque of 'MaTa Helpline' to
२५ deserving students
Mumbai, २४ : Governor Bhagat Singh Koshyari presented a representative cheque of Maharashtra Times Helpline to २५ meritorious students at a function held at Raj Bhavan Mumbai on Sunday.
The students who passed SSC examination with good marks despite severe financial constraints were extended financial support for higher education by the readers and donors through the medium of MaTa helpline.
Editor of Maharashtra Times Parag Karandikar, Resident Editor Shrikant Bojewar, Vinayak Rane, student beneficiaries of MaTa Helpline and their parents were present.
0000
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गौरवामुळे प्रोत्साहन मिळाल्याची विद्यार्थ्यांनी व्यक्त केली भावना
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गुणवंतांचा
बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीतर्फे कौतूक सोहळा
राज्यात, देशात कुठेही काम करताना भ्रष्टाचार दूर करण्याचे आव्हान
शासन-प्रशासनात सुसंवाद ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावा
मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मुंबई दि 24: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातले, पण या सर्वांनी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात करिअर करायचे ठरविले आहे. आपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वर्षा येथील प्रांगणात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2020 मधील परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीतर्फे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव झाल्याबद्धल गुणवंतांनी आपण भारावून गेलो असून पुढील जबाबदारीची प्रेरणा मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आदींची उपस्थिती होती. बाळासाहेब ठाकरे अकॅडमीचे विजय कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
देशाचे नावही मोठे करा
अकादमीला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्धल अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी या अकादमीच्या माध्यमातून पुढच्या काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन मिळेल व ते अशा स्पर्धात्मक परीक्षेत कसे उत्तीर्ण होतील ते पाहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, राज्यात किंवा देशात कुठेही गेलात तरी सर्वोत्तम काम करून आपापल्या राज्याचेच नव्हे तर देशाचे नावही मोठे करा. आपल्या यशात मोठा वाटा असलेल्या आई, वडील आणि गुरूंना कधीही विसरू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शासन आणि प्रशासनात सुसंवाद नसेल तर प्रश्न उभे राहतात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मला देखील प्रशासनाचा कोणताही अनुभव नव्हता, पण मुख्यमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडल्यावर मीही प्रशासनातल्या अनेक गोष्टी शिकलो.
राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकावे
आम्ही रस्त्यावर उतरणारे राजकारणी आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हो म्हणायला आणि राजकारण्यांनी नाही म्हणायला शिकणे आवश्यक आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर कोणतीही चुकीची फाईल माझ्यासमोर आली नाही पाहिजे, असे ठामपणे सांगितले होते.
आमची तर नेहमीच परीक्षा
आपण नशीबवान आहात कारण एका कुठल्यातरी परीक्षेला सामोरे जात असता, आपल्या मुलाखती घेणारे निवडक तज्ञ असतात. आम्हा राजकारण्यांना वारंवार वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावे लागते. आम्हाला हजारो, लाखो लोक गुण देत असतात, आमच्या मुलाखती घेत असतात असेही मुख्यमंत्री म्हणाले.
*अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका*....
*एक घडलेली गोष्ट*...
१९७९ सालची सत्यघटना .
सकाळची वेळ होती.त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता.फारशी गर्दी नव्हती.काही लोकांचीच ये-जा होती.
*एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते*.तेवढ्यात एक उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली.गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती.
तो तरुण म्हणाला,एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता.
त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती,व पुढे काय करणार आहेस ? इ.
त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की,तो कलकत्याहून आला आहे.सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे..
*पुढे मोठ्या तुसडेपणाने म्हणाला - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत,तुम्हाला देशाची काळजी नाही,वगैरे वगैरे त्याने बरीच मुक्ताफळे उधळली.तरीही ती व्यक्ती शांतच होती*.
थोड्या वेळाने - त्या गीता वाचणाऱ्या व्यक्तीने उठून आसन गुंडाळले.तसे एकदम ४ दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले व एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला व आदबीने सलाम करून दार उघडून उभा राहिला.
हे सगळं पाहिल्यावर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला व त्या व्यक्तीची क्षमा याचना करू लागला.
त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली,तेव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की,"ज्या संस्थेत तू संशोधन करण्यास आला आहेस ना,त्या भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे... डॉ. विक्रम साराभाई ."
मग मात्र तो नास्तिक,देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला,माफी मागू लागला...
तरीही डॉ.साराभाई शांतच.
*ते म्हणाले,जर या जगात एखादी गोष्ट आहे,तर नक्कीच त्याचा कोणीतरी निर्माता आहे,मग ती आजची असो की महाभारत कालीन असो.आणि हे त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते*. तेंव्हा -टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा,सर्व सायन्स देखील यातच आहे.
ही गोष्ट घडली तेव्हा भारतीय पातळीवरच्या विविध १३ संशोधन संस्था या डॉ. साराभाईंच्या नांवावर होत्या.
तर तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अणू संशोधन मंडळाचेही अध्यक्ष म्हणून डॉ. साराभाई यांची नियुक्ती केली होती.
*चालू वर्ष हे डॉ.विक्रम साराभाई यांचे 100 वे जयंती वर्ष आहे*...
म्हणून एक आठवण ...
*त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन* !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐
प्रचार व प्रसार
*कृषिसेवा. ऑनलाइन*
शेतकरी वाचवा ग्राहक जगवा
9422385538
Sunday, 24 October 2021
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
श्रीगुरु सारीखा असता पाठीराखा
🚩🌻🌼🌺🌹🌸🍁🌷🌼🌻🚩
*सेवा आणि अहंकार*
🚩🌻🌼🌷🍁🌸🌹🌺🌼🌻🚩
*रावणाशी युद्धाच्या दरम्यान प्रभु श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामग्रीतले पीठ एकदा संपले होते. श्री राम हनुमंताला* म्हणाले *चित्रकूट पर्वतावर* जा तिथे तुला *अन्नपुर्णामाता दळण दळत* असल्याचा आवाज येईल. तीच्या कडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये. *हनुमंतांनी श्री रामाना* विचारले, "पण *अन्नपुर्णामाता* मला कशी काय ओळखणार ?"
*श्री राम म्हणाले,* "ओळख म्हणून ही माझी *अंगठी* तीला दे" आणि त्यांनी स्वतःची *अंगठी हनुमंतांना* दिली.
*हनुमंत* पर्वतावर पोहोचले, त्यांच्या मनात विचार आला मी जर पीठ नेले नाही तर *श्री रामांच्या सैन्याची* काय अवस्था होईल, शेवटी माझ्या शिवाय *प्रभु श्री रामचंद्रांचे* कोणतेही काम होणे अशक्यच. *हनुमंताना अहंकाराने* ग्रासले.
एका मोठ्या गुहेतून *जात्यावर दळण्याचा* आवाज येत होता. त्या गुहेवर एक भली मोठी *दगडाची शिळा* होती. त्या गुहेसमोर जाऊन *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला* हाक मारली, म्हणाले *"माते मी प्रभु श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत, मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ* आणण्यासाठी पाठविले आहे. गुहेतून *अन्नपुर्णामातेचा* आवाज आला, *"हे हनु ! गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये".*
*हनुमंत* आपल्या शेपटीने *शिळा* बाजूला करू लागले, *शिळा* काही जागची हलेना. मग दोन्ही हातांनी *शिळा* बाजुला करायला लागले तरी शिळा काही तसूभरही हलली नाही. मग शरीरातील सर्व शक्तीनीशी जोर लावून *शिळा* बाजुला करायचा प्रयत्न करू लागले, घामाघूम झाले, काही केल्या *शिळा* बाजुला काही सरकत नव्हती. *हनुमंतांच्या* मनात विचार आला मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा यत्किंचित दगड मला बाजूला करता आला नाही. शेवटी *हार* मानून *हनुमंत* म्हणाले, "माते, ही *गुहेवरची शिळा* काही मला बाजूला करता येत नाही."
*अन्नपुर्णामातेने* विचारले, *"हनु , तू अहंकार केलास का?"* तर *हनुमंत* म्हणाले, "होय माते !
"मला आता त्याचा *पश्र्चाताप* होतो आहे."
*अन्नपुर्णामाता* म्हणाली,
*"तुला पश्र्चाताप होतो आहे ना?* मग आता पुन्हा एकदा *शिळा* बाजुला करायचा प्रयत्न कर."
*अन्नपुर्णामातेने* सांगितल्याप्रमाणे *हनुमंतांनी* शिळा बाजुला करायचा प्रयत्न केला, तर काय शिळा अलगद बाजूला सरकली. गुहेमध्ये आत गेल्यावर *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला प्रभु श्री रामचंद्रांनी* दिलेली अंगठी दाखवली, *अन्नपुर्णामाता* म्हणाली, "त्या पलीकडे तो कोपरा आहे ना तीथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा".
*हनुमंत* अंगठी ठेवायला गेले, पहातात तर काय तिथे अगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता. हे पाहून *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला* विचारले "माते, हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय ?"
*अन्नपुर्णामाता* म्हणाली, "अरे हनु , प्रभुंनी तुझ्यासारखे कित्येक *हनुमंत* कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठविले तेव्हापासूनच्या आहेत त्या मुद्रा अंगठ्या"
हे ऐकल्यावर मात्र *हनुमंतांचा गर्व* पुर्णपणे नाहीसा झाला.
*सतगुरूंची सेवा करत असताना कशाचाही अहंकार होणार नाही याची काळजी शिष्याने घ्यायला हवी. किंबहुना शिष्याच्या अंगी नम्रता यावी यासाठीच सतगुरू सेवा करण्याची संधी देतात कारण परमेश्वराला नम्रता असलेले भक्त अतिशय प्रिय आहेत.*
🚩🌻🌼🌷🍁🌸🌹🌺🌼🌻🚩
**महेश पाचंगे (गुरुजी) **
🚩🌻🌼🌺🌹🌸🍁🌷🌼🌻🚩
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...