Tuesday, 19 October 2021

Kojagiri

 *|| कोजागरी पौर्णिमा - एक असाधारण पौर्णिमा ||*


“पिंडी ते ब्रह्माण्डी” ह्या तत्वावर आधारभूत, आपणा सर्वांना ज्ञात आहे कि सौर मंडलातील सूर्य म्हणिजे पिंडिय आत्मा आणि चन्द्र म्हणिजे मन - केवळ मनुष्याचेच नव्हे तर सर्व जीवांचे.


योगी पुरुष, जे अपरोक्ष ज्ञानाचे साक्षी आहेत, ते म्हणतात की ईश्वरी योजनेनुसार परिपूर्ण मन हे १६ कलांनी युक्त असते. चंद्रास देखील एकंदर १६ कला आहेत. ह्यातील प्रतिपदा पासून पौर्णिमेपर्यंतच्या १५ कलांचे सर्वांना नित्य तिथी रूपी साधारण दर्शन होते. पिंडामध्ये मनाच्या १५ कलांची नांवे अशी आहेत -   १) अमृता, २) मनदा, ३) पूषा, ४) पुष्टि, ५) तुष्टि, ६) रति, ७) धृति, ८) शासिनी, ९) चंद्रिका, १०) कांता,  ११) ज्योत्सना, १२) श्री, १३) प्रीति, १४) अंगदा,  १५) पूर्णा.


मात्र चंद्राची पूर्णामृता नांवाची १६ वी कला साधारण दर्शनास प्रकट होत नसल्याने गूढ अशी आहे. भारतात ज्याला कोजागरी पौर्णिमा म्हणातात, त्या काळात चंद्र हा सर्व १६ च्या १६ कलांनी युक्त असतो. ह्या कारणाने ह्या पौर्णिमेस विशेष महत्व आहे.  

       

भूतलावरील जीव, हा किती कालांनी युक्त आहे, त्या प्रमाणे तो पशु, मनुष्य, अवतार, वा पूर्णावतार म्हणाला जातो. भगवान श्रीकृष्ण हे १६ कला युक्त आहेत. पूर्णामृत ही १६ वी कला मन सदा आत्मसंस्थित असल्याचे द्योतक आहे असे म्हणने योग्य ठरेल.


सर्व तिथितील निशी कालामध्ये चंद्र हा सोमरस ग्रहण करीत असतो आणि दिवसा ह्या सोमरसाचा विसर्ग होतो. म्हणून, सर्व साधारण प्रथेनुसार, रात्र भर चंद्रप्रकाशात दूध वा खीर ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करतात.  


ज्या भाग्यशाली व्यक्तींना गुरुकृपेने शक्तिपात दीक्षा प्राप्त आहे, त्या साधकांनी कोजागरी पौर्णिमेस साधनेस बसून, ह्या १६ व्या कलेचा थेट प्रसाद थोडा तरी ग्रहण करावा. कारण षोडशी देवी विचारत आहे, “को जागर्ति - कोण जागे आहे बरे?”  


- आनंद मुरलीधर कुलकर्णी, द्वारा श्रीवासुदेव निवास, सिद्धयोग शक्तिपीठ पुणे.

 सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना

प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार

अर्ज केलेल्या मंडळातील जिल्ह्यातच परीक्षा केंद्र

 

-आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील

 

मुंबईदि. 17 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट '' संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारांने अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिका-यांचे अंतर्गत येते त्याच विभागातील जिल्ह्यात उमेदवारांस परीक्षा केंद्र दिले गेले आहेअसे स्पष्टीकरण आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज केले आहे. 

 

 याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे कीगट क संवर्गातील पदभरतीसाठी २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी एक संवर्ग राज्यमुंबई स्तरावरील आहे. २३ संवर्ग राज्यपुणे स्तरावरील आहेत. तर आठ मंडळ स्तरावर २८ संवर्ग आहेत. राज्य स्तरावरील नियुक्ती अधिकारी संबंधित सहसंचालक तर मंडळ स्तरावर संबंधित उपसंचालक नियुक्ती अधिकारी आहेत. न्यासा कम्युनिकेशन कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे.

गट क मधील ५२ संवर्गातील २७३९ पदांसाठी ४०५१६३ अर्ज आले आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही कालपासून सुरू झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत २०७१३७ प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहेत.

पुर्वीच्या परीक्षांवरुन अंदाज व्यक्त

यापुर्वी आरोग्य विभागाच्यावतीने परिक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यातील अनुभवावरून काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे 

१) उमेदवार एका पदांसाठी अनेक विभागांत अर्ज करतात.

 २) उमेदवार अनेक ठिकाणी किंवा एका ठिकाणी अनेक पदांसाठी अर्ज करतात.

 ३) उमेदवार अर्ज करताना पदांसाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करीत नाहीत. 

४) अनेक ठिकाणी अर्ज करणारे उमेदवार नक्की कोणत्या ठिकाणी परिक्षा द्यायची आहे हे निश्चित करीत नाहीत. त्यांना सर्वच परिक्षा केंद्र जवळ हवे असतात. 

 

जास्त उमेदवारांना संधी मिळण्यासाठी प्रयत्न

जास्त उमेदवारांना परिक्षा देण्याची संधी मिळावी यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत. 

१) उमेदवारांने अनेक पदांसाठी अर्ज केला तरीही ज्या पदाच्या परिक्षेसाठी बसतील त्याच पदाच्या नियुक्ती साठी त्यांचा विचार केला जाईल. 

२) ५२ संवर्गातील पदासाठी परीक्षा दोन शिफ्ट मध्ये घेण्यात येतील. एका शिफ्टमध्ये दहावी ते बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणा-या पदांसाठी तर दुस-या शिफ्टमध्ये पदवी आणि त्यावरील शैक्षणिक पात्रता आवश्यक असणा-या पदांचा समावेश केला आहे. 

३) परिक्षा केंद्र देताना उमेदवारांच्या प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला आहे. 

४) उमेदवारांनी एका मंडळात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यासाठी एकाच शहरात दोन शिफ्ट मध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. 

५) पुणेनाशिकअकोला मंडळात जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे त्या मंडळातील उमेदवारांना नजिकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे दिली आहेत. 

 

दिव्यांग उमेदवारांना जवळचे केंद्र

उमेदवारांना शक्यतो जवळचे केंद्र दिले आहे. मात्र वेगवेगळ्या नेमणूक अधिका-यांचे अंतर्गत अर्ज केला असल्यास त्या अधिकारी कार्यक्षेत्रात केंद्र देण्यात आले आहे. प्रवेशपत्रावर छायाचित्र आणि सही अस्पष्ट असल्यास उमेदवारांनी न्यासा कम्युनिकेशन कंपनीशी संपर्क साधावा.

 

माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नाही

 

 माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नसल्याने नऊ हजार माजी सैनिकांना प्रवेश पत्र देण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात नागपूर नावाचे गाव आहे. ते परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे प्रवेशपत्रावर अहमदनगर जिल्हा नमूद केला आहे. काही प्रवेश पत्रात पिनकोड चुकला आहे. मात्र पत्ता बरोबर आहे. पिनकोड सुधारणा केली जाईलअसे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.

०००

 

 


 राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा

तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत;

एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढणार

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबई दि 18: राज्यातील चित्रपटगृह चालकांनी अग्नीस्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेतत्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स ॲन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

            आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असेही ते म्हणाले.  यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारउपमुख्यमंत्री अजित पवारपरिवहन मंत्री ॲङ अनिल परबगृह मंत्री दिलीप वळसे-पाटीलपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेपोलीस महासंचालक संजय पांडे आदींची उपस्थिती होती .

            विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने सवलत द्यावी तसेच सिनेमागृह परवान्यांचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावेजीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकीटामागे 25 रुपये सर्व्हिस चार्जेस आकारण्यास परवानगी द्यावी विद्युत वापर नसल्याने देयके मिनिमम वापरावर आधारित असू नये,  मिळकत कर आकारू नये,  अशा मागण्या असोसिएशनच्यावतीने करण्यात आल्या.

            असोसिएशनच्या वतीने नितीन दातारनिमेश सोमय्यापूना एक्झिबिटर असोसिएशनचे  सदानंद मोहोळअशोक मोहोळप्रकाश चाफळकर यांनी मागण्या सादर केल्या.

 इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी

            मुंबईदि. 19- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारदि. 20 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील.

            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूरऔरंगाबादमुंबईकोल्हापूर, अमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा दिनांक 22 सप्टेंबर2021 ते 8 ऑक्टोबर, 2021 व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा दिनांक 16 सप्टेंबर, 2021 ते 12 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून त्याची कार्यपद्धती व कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

            ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून इ. दहावी व इ. बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतपुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इ. दहावीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/ शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी गुरुवार दिनांक 21 ऑक्टोबर, 2021 ते शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर, 2021 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरूवारदिनांक 21 ऑक्टोबर, 2021 ते मंगळवार 9 नोव्हेंबर, 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.

            सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छाया प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहीत नमुन्यात विहीत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. सन 2022 मधील इ. दहावी व इ. बारावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थीनाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्याची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. सन 2021 मध्ये प्रथम नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुनःश्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 च्या इ. दहावी व इ. बारावी परीक्षेस सर्व विषय घेऊन प्रथमच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतील. सन 2022 मधील परीक्षेसाठी नोव्हेंबर-डिसेंबर 2020 सन 2021 अथवा सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणी सुधार योजनेंतर्गत आवेदन पत्र भरून परीक्षेस प्रविष्ट होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाहीअसे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000

 कृषी व संलग्न महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता 

कृषीमंत्री दादाजी भुसे

कोविड-१९ प्रतिबंधासाठी शासनाच्या  मार्गदर्शक सूचना आणि निर्देशांचे पालन करण्याचे केले आवाहन

स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम राबविण्याची सूचना

 

      मुंबई, दि. १९ :  राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खागी विनाअनुदानत विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.२० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. 

      राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग दि. ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यात आलेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे १८ वर्षावरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याचबरोबर राज्यातील कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. १३ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यास अनुसरुन कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न विद्यालये आणि महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

             विद्यालये अथवा महाविद्यालय, विद्यापीठात येताना सर्व १८ वर्षावरील विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांचेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुर करण्याविषयी स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करून कृषी विद्यापीठांनी निर्णय घ्यावा, त्यानुसार महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना मानक कार्यप्रणाली (एसओपीद्यावी, सतीगृहे टप्याटण्याने सुरु करावेत, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, अशा सूचना कृषीमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.

             कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणाबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली सर्व कृषी विद्यापीठ, विद्यालये व महाविद्यालयांना लागू असल्यामुळे कृषी विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने सर्व शासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही कृषीमंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

                                                                    

 राज्यपालांच्या हस्ते 'विज्ञान विश्व'चे प्रकाशन

 

        मुंबई, दि. 18 : मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराच्या हेतूने सुरु केलेल्या विज्ञान विश्व’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले.

            विज्ञानाचे शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यास विद्यार्थ्यांना त्याची गोडी निर्माण होईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            यावेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंत सहस्रबुद्धे,  मराठी विज्ञान परिषदेचे डॉ जयंत जोशी,  कोकण विभागाचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास सामंतविज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पराशर,  विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडेडॉ. माधव राजवाडेअभिजित मुळ्ये आदी उपस्थित होते.

0000



Governor releases maiden issue of 'Vigyan Vishwa'

      Mumbai, 18 : Governor Bhagat Singh Koshyari launched the inaugural issue of Marathi monthly ‘Vigyan Vishwa’ at Raj Bhavan,Recently in Mumbai. The publication has been brought out with the objective of popularizing science among children and youth.

      Jayant Sahasrabudhdhe, National Organizing Secretary, Vigyan Bharati, Dr Jayant Joshi, Dr Shrinivas Samant, President, Konkan Vibhag, Dr Nakul Parashar, Director Vigyan Prasar, Dr Arvind Ranade, Abhijit Mulye, Dr Prabhakar Ingle, Dr Mansi Malgaonkar, Dr. Madhav Rajwade, and others were present.

0000

 राज्यातील उपाहारगृहेदुकाने यांच्या वेळा वाढविणार;

अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

                           ·         मुलांचे लसीकरणकोविड नियमांचे पालन याबाबत जनजागृती करा

 

            मुंबई दि 18: कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहेदुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील.

            कोविडव्यतिरिक्त डेंग्यूचिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

            यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले कीआपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्णसंख्या कमी होतांना दिसते आहे. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहेनाट्यगृहेही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

            मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या.

            दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणेसुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.

            कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकताकिंमतउपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटेआरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यासमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेमदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तावैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजयसंचालक डॉ दिलीप म्हैसेकरमुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर,  पालिका उपायुक्त सुरेश काकाणीटास्क फोर्सचे डॉ संजय ओकशशांक जोशीडॉ राहुल पंडितडॉ खुसराव्हडॉ अजित देसाईडॉ सुहास प्रभू आदी उपस्थित होते.

0000

Featured post

Lakshvedhi