Monday, 18 October 2021

Swast ghar mastch location

 


General knowledge

 🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

*जायकवाडी नाथ सागर पैठण-औरंगाबाद धरणाची माहिती.*


*● आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण.*


*●  जगातील सर्वात मोठी नं. सहावी व आशिया खंडातील सर्वात मोठी नं. तीनची गोदावरी नदीवर हे धरण बांधलेले आहे.*


*● जायकवाडी या धरणातील संकलित जल साठ्याला नाथ सागर म्हणतात.*


*●  हे धरण ए.ए. सिद्दीकी या मास्टर माइंड मुस्लिम आभियंत्याने बांधलेले आहे.*


*● काम सुरू व समाप्त- सन.1965 - 1976.*


*● धरणाच्या भिंतीची लांबी- 9998 मीटर्स म्हणजे 10 कि.मी.*


*● धरणाची ऊंची- 41.30 मिटर (135 फुट)*


*● धरण क्षमता- 1.027×10×10000000000 क्युसेक फिट.*


*● जलमय क्षेत्र- 8398 स्क्वेअर मैल.*


*● धरणाची सर्वोच्च स्ट्राँग कैपेसिटी- 2909 मिलियन क्यूबिक मिटर्स.*


*● धरणांतील पाण्याची लांबी- 55 km.*


*● धरणातील पाण्याची रुंदी- 27 km.*


*औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्हय़ातील एकुण 237452 हेक्टर जमीन ओलिताखाली.*


*● डावा कालवा- 208 km.*


*● उजवा कालवा- 132 km.*


*● धरणाचा शेतीसाठी उपयोग- 80%*


*● शहर व गावे पिण्यासाठी- 05.7%. MIDC total use of water- 0.05 मिलियन क्यूबिक मिटर.*


*● धरणाला त्याकाळी आलेला एकुण खर्च- Rs.4750 कोटी रूपये.*


*●● (हे धरण सुरवातीला माजलगाव व परतूर तालुक्याच्या सीमेवर गोदावरी तीरावरील जायकवाडी या दीडशे लोकसंख्या असणाऱ्या गावी होणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे धरण या जायकवाडी गावापासून नदीच्या अंतराने 111 km वर पश्चिमेला पैठण येथे झाले. व त्यावरून या धरणाचे नावं जायकवाडी पडले.*

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

Sunday, 17 October 2021

 [10/16, 11:20 PM] Mahendra Gharat: रायगड विभाग अलिबाग आगार मार्फत दि.३०/१०/२०२१ पासून  *अलिबाग-शेगाव* ही रातराणी सेवा सुरू होत आहे.सदर गाडी दुपारी ३:३०ला अलिबाग मधून निघेल आणि सकाळी ६ पर्यंत शेगाव ला पोहोचेल तसेच संध्याकाळी ७:३०ला शेगाव हुन निघेल आणि सकाळी ९:३० ला अलिबागला पोहोचेल.सदर बस पेण खोपोली लोणावळा पुणे नगर औरंगाबाद जालना खामगाव मार्गे जाईल. सर्व प्रवाशांना विनंती आहे की आपण या सेवेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन ही सेवा नियमित करण्यास मदत करावी  विनंती....

आपले विनित

*अलिबाग आगार आणि आम्ही रायगडकर एसटी प्रेमी.*

[10/17, 7:15 PM] Mahendra Gharat: परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा : बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला...

   एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ (उत्तर) खालील-प्रमाणे आहे... लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात... पण सरस्वतीला नाही... म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..."फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो"... "माणसाची पारख ही रूपावरून करू नका... खरा महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव"...!जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते... खरं तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो... जीवन मोजकेच असते. ते हसत हसत जगायचे असते... सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते... कुठे काही हरवते, तर कुठे काही सापडते... त्यातूनच सापडलेले जपायचे असते... 

*जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामाची पद्धत बदला... तुमचे तत्त्व नाही... कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही ....*


 *वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा* 

*माणसाला जास्त थकवतात*...

*सुख आपल्या हातात नाही*, 

*पण सुखाने जगणे* 

*हे नक्की आपल्या हातात आहे*..🙏

 [10/16, 11:31 AM] Mahendra Gharat: **🙏रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा ऊल्लेख आजपर्यंत फार कमी झाला आहे पण महत्वाचा आणि वाचण्यासारखा आहे👏.*


सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसह वर्तमान *दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती*. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त *सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते*; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. *कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले*.


झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली *पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला.* रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री *रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.*


रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. *पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही,रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते.* पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. *ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले*. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते.


 *पण रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले* आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, *हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते*. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि *त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही.*


 श्रीराम ह्यावर अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, *पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.*


ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. *लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता.* रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे *कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे,* पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस.


 *रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला*. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला *विजयी भव* असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने *स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही* रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच *स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते*. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान.


*रामाने रावणालाच विचारले,* गुरूजी, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी. *आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता*. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्विकारण्याचा प्रश्नच नव्हता पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता.दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. *यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो* हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला, *हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे*. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एवढीच मागणी करतो की *माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य काहीही नको.*


आणि म्हणूनच *रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला* तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. *भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही*. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!


 *ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही,* हल्ली परत वाचनात आली...म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला.(  रसाळ वाणी .)

बऱ्याच जणांना माहित नसलेली रामायणातील ही कथा खास आपल्या ग्रुप साठी !*

[10/16, 11:20 PM] Mahendra Gharat: रायगड विभाग अलिबाग आगार मार्फत दि.३०/१०/२०२१ पासून  *अलिबाग-शेगाव* ही रातराणी सेवा सुरू होत आहे.सदर गाडी दुपारी ३:३०ला अलिबाग मधून निघेल आणि सकाळी ६ पर्यंत शेगाव ला पोहोचेल तसेच संध्याकाळी ७:३०ला शेगाव हुन निघेल आणि सकाळी ९:३० ला अलिबागला पोहोचेल.सदर बस पेण खोपोली लोणावळा पुणे नगर औरंगाबाद जालना खामगाव मार्गे जाईल. सर्व प्रवाशांना विनंती आहे की आपण या सेवेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन ही सेवा नियमित करण्यास मदत करावी  विनंती....

आपले विनित

*अलिबाग आगार आणि आम्ही रायगडकर एसटी प्रेमी.*

[10/17, 7:15 PM] Mahendra Gharat: परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा : बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला...

   एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ (उत्तर) खालील-प्रमाणे आहे... लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात... पण सरस्वतीला नाही... म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..."फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो"... "माणसाची पारख ही रूपावरून करू नका... खरा महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव"...!जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते... खरं तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो... जीवन मोजकेच असते. ते हसत हसत जगायचे असते... सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते... कुठे काही हरवते, तर कुठे काही सापडते... त्यातूनच सापडलेले जपायचे असते... 

*जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामाची पद्धत बदला... तुमचे तत्त्व नाही... कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही ....*


 *वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा* 

*माणसाला जास्त थकवतात*...

*सुख आपल्या हातात नाही*, 

*पण सुखाने जगणे* 

*हे नक्की आपल्या हातात आहे*..🙏

 कल ही तो आयाथा खत उनका

बिस्तरसे उठ् नहीं सकते,

आज दुनियाँसे उठ्चले

क्या इतनी ताकत आगई..?

Recruitment in health deptt

 सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना

प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार

अर्ज केलेल्या मंडळातील जिल्ह्यातच परीक्षा केंद्र

 

-आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील

 

मुंबईदि. 17 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट '' संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारांने अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिका-यांचे अंतर्गत येते त्याच विभागातील जिल्ह्यात उमेदवारांस परीक्षा केंद्र दिले गेले आहेअसे स्पष्टीकरण आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज केले आहे. 

 

 याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे कीगट क संवर्गातील पदभरतीसाठी २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी एक संवर्ग राज्यमुंबई स्तरावरील आहे. २३ संवर्ग राज्यपुणे स्तरावरील आहेत. तर आठ मंडळ स्तरावर २८ संवर्ग आहेत. राज्य स्तरावरील नियुक्ती अधिकारी संबंधित सहसंचालक तर मंडळ स्तरावर संबंधित उपसंचालक नियुक्ती अधिकारी आहेत. न्यासा कम्युनिकेशन कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे.

गट क मधील ५२ संवर्गातील २७३९ पदांसाठी ४०५१६३ अर्ज आले आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही कालपासून सुरू झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत २०७१३७ प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहेत.

पुर्वीच्या परीक्षांवरुन अंदाज व्यक्त

यापुर्वी आरोग्य विभागाच्यावतीने परिक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यातील अनुभवावरून काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे 

१) उमेदवार एका पदांसाठी अनेक विभागांत अर्ज करतात.

 २) उमेदवार अनेक ठिकाणी किंवा एका ठिकाणी अनेक पदांसाठी अर्ज करतात.

 ३) उमेदवार अर्ज करताना पदांसाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करीत नाहीत. 

४) अनेक ठिकाणी अर्ज करणारे उमेदवार नक्की कोणत्या ठिकाणी परिक्षा द्यायची आहे हे निश्चित करीत नाहीत. त्यांना सर्वच परिक्षा केंद्र जवळ हवे असतात. 

 

जास्त उमेदवारांना संधी मिळण्यासाठी प्रयत्न

जास्त उमेदवारांना परिक्षा देण्याची संधी मिळावी यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत. 

१) उमेदवारांने अनेक पदांसाठी अर्ज केला तरीही ज्या पदाच्या परिक्षेसाठी बसतील त्याच पदाच्या नियुक्ती साठी त्यांचा विचार केला जाईल. 

२) ५२ संवर्गातील पदासाठी परीक्षा दोन शिफ्ट मध्ये घेण्यात येतील. एका शिफ्टमध्ये दहावी ते बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणा-या पदांसाठी तर दुस-या शिफ्टमध्ये पदवी आणि त्यावरील शैक्षणिक पात्रता आवश्यक असणा-या पदांचा समावेश केला आहे. 

३) परिक्षा केंद्र देताना उमेदवारांच्या प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला आहे. 

४) उमेदवारांनी एका मंडळात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यासाठी एकाच शहरात दोन शिफ्ट मध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. 

५) पुणेनाशिकअकोला मंडळात जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे त्या मंडळातील उमेदवारांना नजिकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे दिली आहेत. 

 

दिव्यांग उमेदवारांना जवळचे केंद्र

उमेदवारांना शक्यतो जवळचे केंद्र दिले आहे. मात्र वेगवेगळ्या नेमणूक अधिका-यांचे अंतर्गत अर्ज केला असल्यास त्या अधिकारी कार्यक्षेत्रात केंद्र देण्यात आले आहे. प्रवेशपत्रावर छायाचित्र आणि सही अस्पष्ट असल्यास उमेदवारांनी न्यासा कम्युनिकेशन कंपनीशी संपर्क साधावा.

 

माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नाही

 

 माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नसल्याने नऊ हजार माजी सैनिकांना प्रवेश पत्र देण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात नागपूर नावाचे गाव आहे. ते परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे प्रवेशपत्रावर अहमदनगर जिल्हा नमूद केला आहे. काही प्रवेश पत्रात पिनकोड चुकला आहे. मात्र पत्ता बरोबर आहे. पिनकोड सुधारणा केली जाईलअसे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.

०००

 

 


Saturday, 16 October 2021

 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

           मुंबई, दि. 15 : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयात आज दि. 15 रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.          मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलींद गवादे यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

          पुढच्या पिढ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून सशक्त समाज उदयास यावा, अशी अपेक्षा श्री. गवादे यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होण्यास मदत होईल, यासाठी नव्या पिढीने वाचनाची आवड आवर्जून जोपासणे गरजेचे आहे. वाचन प्रेरणा दिनातून आणि डॉ. कलाम यांच्या व्यक्तीमत्त्वातून सर्वांना निश्चितच प्रेरणा मिळेल, असेही श्री. गवादे म्हणाले. श्री. गवादे यांनी समर्थ रामदासस्वामी रचित करुणाष्टकांचे अभिवाचन केले.

            मराठी भाषा विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध पुस्तकांतील उताऱ्यांचे अभिवाचन केले. सर्वांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

००००

Featured post

Lakshvedhi