Sunday, 17 October 2021

 [10/16, 11:20 PM] Mahendra Gharat: रायगड विभाग अलिबाग आगार मार्फत दि.३०/१०/२०२१ पासून  *अलिबाग-शेगाव* ही रातराणी सेवा सुरू होत आहे.सदर गाडी दुपारी ३:३०ला अलिबाग मधून निघेल आणि सकाळी ६ पर्यंत शेगाव ला पोहोचेल तसेच संध्याकाळी ७:३०ला शेगाव हुन निघेल आणि सकाळी ९:३० ला अलिबागला पोहोचेल.सदर बस पेण खोपोली लोणावळा पुणे नगर औरंगाबाद जालना खामगाव मार्गे जाईल. सर्व प्रवाशांना विनंती आहे की आपण या सेवेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन ही सेवा नियमित करण्यास मदत करावी  विनंती....

आपले विनित

*अलिबाग आगार आणि आम्ही रायगडकर एसटी प्रेमी.*

[10/17, 7:15 PM] Mahendra Gharat: परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा : बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला...

   एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ (उत्तर) खालील-प्रमाणे आहे... लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात... पण सरस्वतीला नाही... म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..."फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो"... "माणसाची पारख ही रूपावरून करू नका... खरा महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव"...!जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते... खरं तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो... जीवन मोजकेच असते. ते हसत हसत जगायचे असते... सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते... कुठे काही हरवते, तर कुठे काही सापडते... त्यातूनच सापडलेले जपायचे असते... 

*जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामाची पद्धत बदला... तुमचे तत्त्व नाही... कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही ....*


 *वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा* 

*माणसाला जास्त थकवतात*...

*सुख आपल्या हातात नाही*, 

*पण सुखाने जगणे* 

*हे नक्की आपल्या हातात आहे*..🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi