Friday, 15 October 2021

 राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

·        दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी/विद्यार्थींनी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार

·        स्थानिक पातळीवर विशेष लसीकरण मोहिम राबवून विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे निर्देश

·        18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही

 

            मुंबईदि. 13 : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठेअभिमत विद्यापीठेस्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहेअशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले कीज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेतते विद्यार्थी/विद्यार्थीनी विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील आणि ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनींने कोविड-१९ ची लस घेतलेली नाहीत्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख/ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावे. तसेच विद्यापीठ/महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे.

            विद्यापीठ / महाविद्यालयांचे वर्ग पूर्णपणे की 50 टक्के क्षमतेने सुरु करावेयाबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.प्रतिबंधित क्षेत्रात येणारी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये ही ज्या आयुक्तमहानगरपालिका/ नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येतातत्यांच्याशी कोविड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थितीप्रतिबंधित क्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊनविद्यापीठे व महाविद्यालये सुरु करण्याबाबत विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा आणि महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना/ मानक कार्य प्रणाली (एसओपी) देण्यात यावीअसेही त्यांनी यावेळी सांगीतले.

            सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांना कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देशकामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देशराज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना मानक कार्य प्रणाली (एसओपी) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनींना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाहीत्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.

            वसतीगृहे टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत संचालक उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहतुकीचे मुख्य साधन लोकल ट्रेन असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी मिळणे आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात येईल.

            विद्यार्थी आणि पालक यांनी सुद्धा काविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जाहीर केलल्या नियमांचे पालन करुन लसीकरण करावेअसे आवाहनही मंत्री श्री. सामंत यांनी केले.

 अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम -मंत्री नवाब मलिक

मासिक 3 ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार

 

            मुंबईदि. 15 : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राहणाऱ्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरिता रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेअशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. अब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम 3 हजार 500 रुपये तर जिल्हा व तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम 3 हजार रुपये देण्यात येणार आहेअसे त्यांनी सांगितले.

            यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.

            मंत्री श्री. नवाब मलिक म्हणाले कीराज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक मुस्लिमजैनबौद्धख्रिश्चनशीखज्यू व पारशी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्रे असलेल्या शहरांमध्ये राहण्याची सुविधा झाली आहेपण अनेक विद्यार्थ्यांना कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना भोजन व इतर खर्च करणे शक्य होत नाहीत्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे याकरीता आता त्यांच्या आहाराकरीता रोख रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

            या योजनेच्या लाभाकरीता विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असून त्या बँक खात्याशी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याची शैक्षणिक संस्थामहाविद्यालयातील उपस्थिती समाधानकारक असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाच्या कालावधीपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आहार भत्त्याची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट वितरित करण्यात येईल व त्याची यादी संबंधीत प्राचार्यास पाठविण्यात येईल. अल्पसंख्याक समाजातील मुला-मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे. 

            वसतिगृहविषयक योजना तसेच आपल्या परिसरातील वसतिगृहांच्या माहितीसाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्या https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावीअसे आवाहन करण्यात आले आहे.

००००

 


 आपटे चिडलेत !

प्रचंड चिडलेत ! 😡


त्यांचे म्हणणे आहे की दरवर्षी आमचीच पानं का ? 😠


पुढच्या वर्षी

कुलकर्ण्यांची किंवा

जोश्यांची ओरबडा ! 😵


😋😋😋😋😋😋😋

Durga shakti



 

Durga shakti


 

Suvichar

 अयोध्या से वापस आने पर मां कौशल्या ने श्रीराम से पूछा...

"रावण" को मार दिया ?

भगवन श्रीराम ने सुन्दर जवाब दिया...

महाज्ञानी, महाप्रतापी,

महाबलशाली, प्रखंड पंडित, महा

शिवभक्त, चारो वेदो के ज्ञाता, शिव ताण्डवस्त्रोत के रचयिता लंकेश को मैंने नहीं मारा,

उसे "मैं" ने मारा है।

*आओ हम सब अंहकार छोड़ दे*


*🙏🏻दशहरा की हार्दिक शुभकामनाएं🙏🏻*

Featured post

Lakshvedhi