Monday, 11 October 2021

Jai hind

 *आताच्या पिढीला ‘उरी’, ‘राजी’, ‘एल.ओ.सी.- कारगिल' हे युध्दाशी संबंधित चित्रपट बऱ्यापैकी आवडले ..!! पण ह्या साऱ्यांवर मात करील असा एक चित्रपट, भारतीयांपर्यत फारसा पोहोचू शकला नव्हता ..!! नव्हे, २००७ साली प्रकाशित झालेला 'हा' चित्रपट, लोक पाहणारच असे कांहीसे घडले किंवा घडवले गेले ..!! पण ह्या लिखाणामुळे तुम्ही नक्कीच तो चित्रपट घरबसल्या पहाल ..!!* 


*९ मार्च २००७ रोजी प्रकाशित झालेल्या ह्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अमृत सागर आणि लेखक आहेत पियुष मिश्रा ..!! प्रत्येक देशप्रेमी भारतीयाने आवर्जून हा चित्रपट पहावाच ..!! ह्या चित्रपटाचे शीर्षक आहे '१९७१' ..!!* 


 *ही एक सत्यकथा आहे ..!!*  


*१९७१ चे  भारत–पाकिस्तान युध्द संपल्यानंतर घडलेला पण जगापासून लपवलेला हा 'काळा इतिहास' आहे ..!! चित्रपटाचे चित्रीकरण दिवसा आणि रात्री कसे केले असेल ..?? ते किती कठीण असू शकते .. हे चित्रपट पाहिल्यावरच तुमच्या लक्षात येईल ..!! चिरंतन दास ह्या छायाचित्रकाराला तुम्ही सलामच ठोकाल ..!!* 


*मनोज बाजपेयी, मानव कौल, भोजपुरी नट रवी किशन ह्यांच्या सोबत स्वतः लेखक पियुष मिश्रा ह्यांच्या थक्क करणाऱ्या अभिनयाला तुम्ही नक्कीच दाद द्याल ..!!* 


*ह्या चित्रपटात तुम्ही एवढे भावनात्मकरित्या गुंतुन जाल की हे चेहरे पुढचे कांही दिवस तरी डोळ्यांसमोरुन जाणारच नाहीत ..!!* 


*विशेष म्हणजे ५५व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ह्या चित्रपटाला 'हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार' मिळून सुध्दा, तुम्हा-आम्हाला हा चित्रपट पाहताच आला नाही ..!!  अनेकांनी तर नांव सुध्दा ऐकलेलं नसेल ..!!* 


*प्रत्यक्ष युद्धाची पार्श्वभूमी किंवा युद्ध ह्या चित्रपटात नाही .. कारण, बांगलादेशच्या निर्मितीसोबत १९७१ मध्ये ते युद्ध संपले आणि हा चित्रपट जिथून सुरु होतो ते वर्ष दाखवलेय १९७७ ..!!* 


*भारत-पाक सीमारेषेपासून फक्त २०० किमी अंतरावर घडत असलेले हे कथानक पाहून, तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहण्याची इतरांना शिफारस कराल ..!! शहरी वातावरणात वाढत श असलेल्या चंगळवादी तरुण-तरुणींनी हा चित्रपट पाहिला, तर त्यांना आपल्या सुखाच्या श्वासासाठी सीमेवरचे सैनिक प्रत्यक्षांत काय काय 'झेलतात' हे कळेल ..!! आजच्या भौतिक सुखाच्या स्पर्धेच्या दुनियेत, एका चित्रपट नटाचे अचानक निधन झाले किंवा, एखादा अभिनेता कोरोना बाधित होऊन रुग्णालयात उपचारासाठी गेला तर दुःखाश्रू ढाळणाऱ्यांनी एकदा तरी (हो, निदान एकदा तरी ..) हा चित्रपट शेवटपर्यंत पहावा अशी कळकळीची शिफारस मी करतो ..!! माझा त्यात कोणताही स्वार्थ किंवा आर्थिक फायदा नाही ..!!*


*इस्रायल हा जिद्दी लोकांचा कडवा आणि स्वाभिमानी देश आहे. त्यांच्याकडे घरातील प्रत्येक मुलाला देशाची सीमा आणि देशाचा इतिहास ठाऊक असतो .. नव्हे तोंडपाठ असतो ..!! (त्या देशाची लांबी-रुंदी फारच लहान असल्यामुळे, त्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या दिवशी सर्व देशप्रेमी ज्यू कुटुंबे, मुला-नातवंडांसह सीमा पाहायला आणि हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी, चक्क युद्धभूमीवर जमतात ..!! हे मी स्वतः दोन वेळा इस्रायलमध्ये, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि अनुभवलंय ..!!)* 


*आमच्याकडे युद्धभूमी फारच  दूर ..!! देशाच्या एका टोकाला ..!! कोण जातेय पाहायला ..?? म्हणूनच, सैनिकांच्या त्यागाची कोणाला काही चिंताच उरलेली नाही ..!! अशा वेळी, हा चित्रपट पाहून एक प्रसिद्ध गीत आठवले ..* 


*'अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांsत ..* 

*स्तंभ तिथे ना कुणी बांधला ..!! पेटली ना वात ..!!* 


*लॉकडाऊनच्या काळात लोक घरी होते. हाताशी भरपूर वेळ होता .. नेमकं तेव्हाच, यु-ट्युबवर हा सत्यघटनेवर आधारित दर्जेदार चित्रपट, विनामूल्य पाहण्याची संधी 'सागर पिक्चर्स' हयांनी दिली ..!!* 


*केवळ गेल्या ३ महिन्यांत, दोन कोटी चाळीस लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे .. म्हणजे तो अनेकांना भावलेला दिसतो आहे ..!!* 


*विशेष म्हणजे, पूर्ण चित्रपटाला 'इंग्लिश सबटायटल्स'  सुध्दा आहेत. (सबटायटल्स ऑन ठेवून तुमच्या घरातील 'इंग्रजाळलेले तरुण-तरुणी / विद्यार्थी' हा चित्रपट पाहू शकतात ..!!)* 


 *हा मास्टरपीस असलेला, '१९७१' अशा शीर्षकाचा  विचारप्रवर्तक, प्रेरणादायी चित्रपट, एक 'राष्ट्रकर्तव्य' म्हणून संपूर्ण पहा ..!! सर्व वयोगटाला आवडेल असा हा दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी, थोsडासा वेळ काढा .. शक्य असेल तर स्मार्ट टीव्ही च्या मोठ्या पडद्यावर पहा ..!!* 

 


*(कृपया ही पोस्ट बदल न करता, लेखकाच्या नांवासह इतरांकडे पाठवा ..!!)* 


*चित्रपट पाहण्यासाठी खालील निळ्या लिंकवर क्लिक करा .. शेवटपर्यंत जरूर पहा आणि अवश्य शेअर करा ..!!* 


👇🏽👇🏽💐🙂🙏🙏👆


https://youtu.be/gp3otKG7o6g


*धन्य ते वीर ..!! धन्य ती भारतमाता  ..!!* 


*आपला नम्र,*

*विवेक मेहेत्रे*

*(संपादक, लेखक, अभियंता, व्यंगचित्रकार)*

Sunday, 10 October 2021

Mount Everest ek satya


 

 पुरुष हा आतंकवादी सारखा असतो 

गळ्यात सात जन्माचा बॉम्ब  अडकलेला असून

 ही

बाहेर एखादी सुतळी बॉम्ब शोधत असतोच 


#नेहमी_जीव_धोक्यात

😂😂😂😂

Korona garaba


 

 कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील

निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

·       मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर तातडीने शासन निर्णय जारी

 

            मुंबई, दि. ८ : शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयतसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्णसेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसमवेत बैठक घेऊन त्यांच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला.

            तातडीने हा शासन निर्णय काढल्याबद्धल सेंट्रल मार्डतर्फे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

 बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती लढ्याची माहिती होईल

                                                                      - राज्यपाल

 राज्यपालांच्या हस्ते बांगलादेश मुक्ती लढ्यातील वीरांचा सन्मान

 

          मुंबई, दि. 09 : बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या 'अपूर्ण आत्मकथाया मराठी भाषांतरीत पुस्तकामुळे राज्यातील लोकांना विशेषतः युवकांना बांगलादेशचा प्रदीर्घ मुक्तीसंग्रामत्यातील भारताचे योगदान तसेच शेख मुजिबूर रहमान यांच्या व्यक्तित्वाबद्दल अधिक माहिती होईलअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

          शेख मुजिबूर रहमान यांची जन्मशताब्दी तसेच बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शेख मुजिबूर रहमान यांच्या 'अनफिनिश्ड मेमॉयर्सया पुस्तकाचे मराठी भाषांतर असलेल्या 'अपूर्ण आत्मकथाया पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेत्यावेळी ते बोलत होते.

          बांगलादेशच्या मुंबईतील उपउच्चायुक्तालयाच्या पुढाकाराने प्रसिद्ध झालेले 'अपूर्ण आत्मकथाअपर्णा वेलणकर यांनी मराठीत भाषांतरीत केले असून इंडिया प्रिंटिंग वर्क्सने ते प्रकाशित केले आहे.

          राज्यपालांच्या हस्ते यावेळी बांगलादेश मुक्ती संग्रामात प्रत्यक्ष व परोक्ष भाग घेतलेल्या निवृत्त नौदल प्रमुख अॅडमिरल विष्णू भागवतलेफ्टनंट जनरल  कुलदीप सिंह ब्रारलेफ्टनंट कमांडर अशोक बत्रा यांसह 20 युद्धवीरांचा सत्कार करण्यात आला. 

          कार्यक्रमाला बांगलादेशचे मुंबईतील उप उच्चायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमानबांगलादेशचे नवी दिल्लीतील उप उच्चायुक्त नुरुल इस्लाममुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व ऑल इंडिया असोसिएशन फॉर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री  उपस्थित होते. यावेळी बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ ए के एम अब्दुल मोमीन यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला. 

          शेख मुजिबुर रहमान सच्चे धर्मनिरपेक्ष नेते होते. आपल्या पक्षाचे नाव त्यांनी 'मुस्लिम अवामी लीगअसे न ठेवता 'अवामी लीगअसे ठेवले असे राज्यपालांनी नमूद केले. अपर्णा वेलणकर यांनी शेख मुजीब यांच्या पुस्तकाचे मराठी भाषेत भाषांतर करून भारत व बांगलादेशातील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्यात मोठे योगदान दिले आहे असे राज्यपाल यावेळी म्हणाले.  शेख मुजीब यांच्या 'प्रिझन डायरीजया पुस्तकाचे देखील मराठीत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

          राज्यपालांच्या हस्ते अपर्णा वेलणकर तसेच इंडिया प्रिंटिंगचे आनंद लिमये यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बांगलादेश व भारताच्या राष्ट्रगीताने झाली.

 सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण

कोकणच्या विकासाने भरारी घेतली,

कोकणची संपन्नता जगासमोर येणार

 

                                                                                                     -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            सिंधुदुर्गनगरी दि. 9 (जि.मा.का.) - आजपासून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि कोकणची संपन्नता जगासमोर येणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

            नागरी विमान वाहतूक मंत्रालयमहाराष्ट्र शासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजनेंतर्गत ग्रीनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तेदिल्ली येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखालीसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेसामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातउद्योग मंत्री सुभाष देसाईकृषी मंत्री दादाजी भुसेपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेपरिवहन मंत्री ॲड. अनिल परबपर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरेखासदार अरविंद सावंतजिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंतआमदार निरंजन डावखरेअनिकेत तटकरेदीपक केसरकरवैभव नाईकनितेश राणे आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री उदय सामंत यांनी विमानतळावर आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर कोनशिला अनावरण करण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेगेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांचे  स्वप्न पूर्ण झालेयाचा आनंद झाला आहे.  या  विमानतळामुळे जगभरच्या पर्यटकांबरोबरच उद्योजकही मोठ्या प्रमाणात येऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल. कोकणचे वैभव मोठे आहे. गोव्यापेक्षाही इथले समुद्र किनारे स्वच्छसुंदर आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. इथल्या स्थानिक उद्योजकांनाआंबाकाजूफणस तसेच मासे निर्यातीला प्रोत्साहन व चालना मिळेल.  या विमानतळाच्या निमित्ताने कोकणचे सौंदर्य जगासमोर जाणार असून येथील निसर्ग सौंदर्य आणि मातीचा सुगंध जगातील पर्यटकाला आकर्षित करेल.

            महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विमानतळांचा विकास करण्याच्या दृष्टीने शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून सिंधुदुर्ग विमानतळ आंतरराष्ट्रीय  होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. येथे विमानबरोबरच हेलिकॉप्टर सेवा ही सुरू झाल्यास पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. शासनाने पर्यटनाला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे उद्योजकांनाही या भूमीत चांगली संधी आहे. लवकरच मुंबई -गोवा महामार्गाचे काम तसेच राज्यातील अन्य महामार्गाची कामे सुरु करण्यात येणार आहेतअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांना  शुभेच्छा दिल्या.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोकणवासियांचे खूप दिवसांचे स्वप्न होते. या विमानतळाच्या उभारणीत अनेकांचे योगदान आहे. कोकणाला निसर्गाचे वरदान  लाभले असून  कोकणचे सौंदर्य पाहता सेथील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून हे विमानतळ महत्वपूर्ण ठरणार आहे. जगातून पर्यटक यावेततरुणांना रोजगार मिळावा, त्यातून आर्थिक सुबत्ता नांदावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

            महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण होत आहोत, पुढच्या उज्ज्वल समृद्ध भविष्यकाळाची सुरुवात होत आहे. पर्यटनाची खूप मोठी संधी असून नव्या युगाची सुरुवात आज होत आहे. या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.

            या विमानतळावरील येथून पुढची उड्डाणे ही फुल्ल असतील. एमआयडीसीने विमानतळासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा केल्या, याचा मला आनंद आहे. कोकणवासियांची स्वप्ने साकार होतील, असे यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले.

            पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणालेजगाला कोकण दाखवू शकतो. कोकण जगप्रसिद्ध आहेच. जगाला आजपासून दरवाजे खुले झालेत, पर्यटक कसे येतीलपर्यटन आणताना पर्यावरण कसे राखले जाईलयाची जबाबदारी आम्ही घेत आहोत.

            केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेया विमानतळामुळे जगभरातील पर्यटक इथे येतील आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल.

            केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे म्हणालेअतिशय आनंदाचा क्षण आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यात  पर्यटनाला उभारी मिळेल, इथल्या लोकांना रोजगार मिळेल.

            अध्यक्षीय भाषणात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणालेसिंधुदुर्गची भूमी ही केसरीया आहे. नव्या इतिहासाला सुरुवात झाली. कोकणआंबाफणसमासे यांचे उद्योग देशात प्रसिद्ध होतील. इथलं सौंदर्यभौगोलिकताइतिहास विश्वात पोहचवता येईल. पुढच्या पाच वर्षात 20-25 फ्लाईट सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी माझा विभाग निश्चित काम करेल.

            कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री. सिंधिया यांना पहिला बोर्डींग पास वितरित केला. सिंधुदुर्ग येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला.

            खासदार विनायक राऊत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वांचे आभार मानले. या सोहळ्यास मुख्य सचिव सीताराम कुंटेपोलीस महासंचालक संजय पांडे,  प्रधान सचिव (विमानचालन) वल्सा नायर- सिंहएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगनमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टेआयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक विरेंद्र म्हैसकर आदी उपस्थित होते.

 

Featured post

Lakshvedhi