Sunday, 26 September 2021

 000

भाषांतर आणि पाठांतरापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपणे आवश्यक-मुख्यमंत्री

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

 

            रत्नागिरी  दि.25: संस्कृत विषयाकडे हमखास गुण मिळवण्याचा विषय म्हणून पाहिले जाते परंतू त्यापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपली  आणि मनामनात जागवली गेली तर आपल्याला आपली संस्कृती कळेल व आपल्यावर चांगले संस्कार होतील.त्यामुळे  केवळ भाषांतर किंवा पाठांतरापूरता या भाषेचा विचार करून चालणार नाही तर या भाषेतील ज्ञान आणि संस्कार मनामनात बिंबवले गेले पाहिजेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

            रामटेक येथील कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या  रत्नागिरी येथील उपकेंद्राचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. प्रत्यक्ष व दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परबउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहरामटेकच्या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्तीकुलगुरु प्रो. श्रीनिवास वरखेडीरत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवीजिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटीलअध्यापक विद्यालयाच्या  प्राचार्य जोत्स्ना ठाकूरवित्त व लेखा अधिकारी रामचंद्र जोशी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीआपले  वेद वाड:मय संस्कृतमध्ये आहे. ते समजून घेण्यासाठी या भाषेवर प्रभुत्व नाही मिळवता आले तरी  किमान या भाषेचे किमान ज्ञान आपल्याला असायला हवे. त्यांनी संस्कृत ही अनेक भाषांची जननी असल्याचे सांगत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील रत्नागिरी मध्ये या भाषेच्या जपणुकीसाठी एक महत्वाचे पाऊल कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राच्या माध्यमातून पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे संस्कृत आपल्याला सांगते असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे स्थापन करण्यात आलेल्या संतपीठाचा तसेच चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या वन अकादमीचे वन विद्यापीठात रुपांतर करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांचा येथे आवर्जुन उल्लेख केला. त्यांनी संस्कृत विद्यापीठ व उपकेंद्राच्या भविष्यातील कामासाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत  संस्कृत आणि संस्कृती जपण्यासाठी सर्व मिळून पुढाकार घेऊया असे आवाहनही केले.

            मंत्री उदय सामंत यांनी पैठण येथे संतपीठाची सुरुवात व आज संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राची रत्नागिरी येथे होत असलेली सुरुवात हे दोन सुवर्ण क्षण असल्याचे सांगून पुढे म्हटले कीरत्नागिरी मध्ये लवकरच अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु होत आहे,  आज संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु झाले आहे भविष्यात पीपीई मॉडेलवर रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावास मंजूरी द्यावी.

            कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले  त्यांनी देशात १८ संस्कृत विद्यापीठे असून त्यापैकी एक महाराष्ट्रात रामटेक येथे असल्याची माहिती दिली.  ज्ञानदानविकास आणि रोजगार संधींची उपलब्धता करून देणारे हे संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र समाजउपयोगी संसाधनांच्या निर्मितीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. संस्कृत विद्यापीठाची पुणेपरभणीजळगाव व ठाणे येथे भविष्यात उपकेंद्रे स्थापन करण्याचे नियोजित असून त्यास शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त 

 😎

अंडरवर्ल्ड के बाद


व्हाट्सएप ऐसी दुनिया है . .


*जिसमें इंसान एक बार कदम रख दे तो . .*


चाहकर भी कदम


पीछे नहीं कर सकता .


😉😉😉😂😂😂

Saturday, 25 September 2021


 

 राज्यातील चित्रपटगृहेनाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार

आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबई,दि.25 : राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.

            यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्यखासदार संजय राऊतमुख्य सचिव सीताराम कुंटेअतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टीकुणाल कपूरमकरंद देशपांडेसुबोध भावेआदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.

000

भाषांतर आणि पाठांतरापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपणे आवश्यक-मुख्यमंत्री

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

 

            रत्नागिरी  दि.25: संस्कृत विषयाकडे हमखास गुण मिळवण्याचा विषय म्हणून पाहिले जाते परंतू त्यापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपली  आणि मनामनात जागवली गेली तर आपल्याला आपली संस्कृती कळेल व आपल्यावर चांगले संस्कार होतील.त्यामुळे  केवळ भाषांतर किंवा पाठांतरापूरता या भाषेचा विचार करून चालणार नाही तर या भाषेतील ज्ञान आणि संस्कार मनामनात बिंबवले गेले पाहिजेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

            रामटेक येथील कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या  रत्नागिरी येथील उपकेंद्राचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. प्रत्यक्ष व दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परबउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहरामटेकच्या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्तीकुलगुरु प्रो. श्रीनिवास वरखेडीरत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवीजिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटीलअध्यापक विद्यालयाच्या  प्राचार्य जोत्स्ना ठाकूरवित्त व लेखा अधिकारी रामचंद्र जोशी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीआपले  वेद वाड:मय संस्कृतमध्ये आहे. ते समजून घेण्यासाठी या भाषेवर प्रभुत्व नाही मिळवता आले तरी  किमान या भाषेचे किमान ज्ञान आपल्याला असायला हवे. त्यांनी संस्कृत ही अनेक भाषांची जननी असल्याचे सांगत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील रत्नागिरी मध्ये या भाषेच्या जपणुकीसाठी एक महत्वाचे पाऊल कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राच्या माध्यमातून पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे संस्कृत आपल्याला सांगते असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे स्थापन करण्यात आलेल्या संतपीठाचा तसेच चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या वन अकादमीचे वन विद्यापीठात रुपांतर करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांचा येथे आवर्जुन उल्लेख केला. त्यांनी संस्कृत विद्यापीठ व उपकेंद्राच्या भविष्यातील कामासाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत  संस्कृत आणि संस्कृती जपण्यासाठी सर्व मिळून पुढाकार घेऊया असे आवाहनही केले.

            मंत्री उदय सामंत यांनी पैठण येथे संतपीठाची सुरुवात व आज संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राची रत्नागिरी येथे होत असलेली सुरुवात हे दोन सुवर्ण क्षण असल्याचे सांगून पुढे म्हटले कीरत्नागिरी मध्ये लवकरच अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु होत आहे,  आज संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु झाले आहे भविष्यात पीपीई मॉडेलवर रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावास मंजूरी द्यावी.

            कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले  त्यांनी देशात १८ संस्कृत विद्यापीठे असून त्यापैकी एक महाराष्ट्रात रामटेक येथे असल्याची माहिती दिली.  ज्ञानदानविकास आणि रोजगार संधींची उपलब्धता करून देणारे हे संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र समाजउपयोगी संसाधनांच्या निर्मितीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. संस्कृत विद्यापीठाची पुणेपरभणीजळगाव व ठाणे येथे भविष्यात उपकेंद्रे स्थापन करण्याचे नियोजित असून त्यास शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

0000


 

राज्य के थिएटर, नाट्यगृह २२ अक्टूबर से शुरू किए जाएंगे

स्वास्थ्य के नियमों का पालन करने की शर्त पर होगी अनुमति - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबई,दि.२५ : राज्य के थिएटर और नाट्यगृह २२ अक्टूबर से स्वास्थ्य के नियमों का पालन करते हुये खुला करने में अनुमति दी जाएगी, यह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने घोषित किया है।  

            इस संदर्भ में विस्तार से कार्य पद्धति  एसओपी तैयार करने का काम जारी है और यह जल्द ही घोषित की जाएगी। आज टास्क फोर्स सदस्य, सांसद संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव (स्वास्थ्य) डॉ. प्रदीप व्यास और निर्देशक रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर एवं नाट्य क्षेत्र के मान्यवरों से मुख्यमंत्री ने  बैठक में चर्चा की

 राज्यपालांच्या हस्ते मार्केटिंग, डव्हर्टायझिंग, डिया क्षेत्रातील नेतृत्व पुरस्कार प्रदान

नेतृत्व प्रदान करणाऱ्या धुरीणांनी उच्च नीतिमूल्ये अंगिकारावी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

            मुंबई, दि. 25 : पूर्वीच्या पिढ्यांमध्ये बव्हंशी राजकीय नेत्यांनाच समाजात आदर्श मानले जायचे.  आज मात्र समाजात उद्योग, व्यवसाय, सेवा यांसह सर्व क्षेत्रातील धुरीणांना आदर्श मानले जाते. विविध क्षेत्रातील शीर्ष नेत्यांमुळे राष्ट्रनिर्माणाचे कार्य साध्य होत असते, असे सांगून उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील धुरीणांनी उच्च नीतिमूल्ये अंगीकारली तर संपूर्ण समाज त्यांचे अनुकरण करेल व त्यातून समाजाची प्रगती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            इंटरनॅशनल डव्हर्टायजिंग असोसिएशनच्या भारतीय शाखेच्या वतीने देण्यात येणारे मार्केटिंग, डव्हर्टायझिंग व मिडिया क्षेत्रातील १८ वे आयएए नेतृत्व पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते शनिवारी (दि. २४) हॉटेल ताज लँड्स एन्ड, मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.          

            कार्यक्रमाला डिस्कव्हरी चॅनेलच्या मुख्याधिकारी मेघा टाटा, लोडस्टार युएम कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी डायस, इंटरनॅशनल ऍडव्हर्टायजिंग असोसिएशनचे सहअध्यक्ष भास्कर घोष, एक्सप्रेस समूहाचे अनंत गोयंका प्रामुख्याने उपस्थित होते.

       राज्यपालांच्या हस्ते यावेळी आयएए बिझनेस लिडर ऑफ द इयर पुरस्कार अमूल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोढी, मीडिया एजन्सी ऑफ द इअर पुरस्कार नंदिनी डायस यांना, आयएए एडिटर ऑफ द इयर पुरस्कार इंडियान एक्स्प्रेसचे समूह संपादक राजकमल झा यांना तर मीडिया पर्सन ऑफ द इयर पुरस्कार सोनी पिक्चर्सचे मुख्याधिकारी एन पी सिंह यांना प्रदान करण्यात आला.  

 

Leaders in Marketing, Advertising & Media honoured

Governor Koshyari presents IAA Leadership Awards

 Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the International Advertising Association’s 18th IAA Leadership Awards in Mumbai on Friday (24th Sept)

Managing Director of Amul India R S Sodhi was presented the IAA Business Leader of the Year award, Nandini Dias who heads the Lodestar UM Media was presented the IAA Media Agency Leader of the Year Award, Raj Kamal Jha of Indian Express was presented the IAA Editor of the Year Award while CMD of Sony Pictures N P Singh was given the IAA Media Person of the Year award.

Megha Tata, Chairperson, India Chapter of IAA, Bhaskar Das, Co-Chairperson, Avinash Pandey CEO of ABP Network, Anant Goenka, Executive Director of Indian Express Group were present.

0000

 राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाचे राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

ह्दयविकाराचा झटका आणि वेळीच उपचाराच्या

जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल

                                                                         राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

            मुंबईदि. 25 : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा समजत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इतपासून ते हृदयविकाराचे प्रकार आणि तातडीचे प्राथमिक उपचार याची माहिती असणे गरजेचे आहे. आणि अशा माहितीसह प्रशिक्षणाचा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आय केअर संस्थेच्या सहकार्याने अधिकारी-कर्मचारी तसेच राज्यातील सर्व माध्यमकर्मींसाठी आयोजित केला तो अत्यंत स्तुत्य व अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी काढले.

              आय केअर संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाच्या दूरदृश्यपणालीद्वारे प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टेसंचालक(प्रशासन) गणेश रामदासीसंचालक(वृत्त) दयानंद कांबळेआय केअरचे डॉ.यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ)डॉ.ब्रायन पिंटो (कार्डियोलॉजिस्ट)डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ)माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत राज्यातील अधिकारी-कर्मचारी व पत्रकार ऑनलाईन सहभागी झाले होते.

            अल्प व मध्यमवयीन नागरिक सुध्दा या अकस्मात हृदयरोगाला बळी पडत आहेत. हृदयाचा झटका आणि कार्डियाक अरेस्टची घटना आपल्या आजूबाजूला घडत असते तेव्हा अशा प्रकारचे कार्डिओ पल्मोनरी रिसिटेशन (सीपीआर)चे माहिती व प्रशिक्षण असेल तर काही मिनिटाच्या सुवर्णकाळात आपण त्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो यासाठी प्राथमिक उपचाराची माहिती असणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट जनजागृतीमुळे नागरिकांचा जीव वाचविण्यास मदत होईल असेही  राज्यमंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

बदलत्या जीवनशैलीत आरोग्यविषयक जागृत राहणे आवश्यक

                                                            - डॉ.दिलीप पांढरपट्टे

            बदलत्या जीवनशैलीमध्ये तणाव वाढल्याने अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य विषयक जागृत राहून तणामुक्त आणि आरोग्यदायी जीवन कसे जगले पाहीजे याचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी या प्रशिक्षण सत्रांचे प्रास्ताविक करताना सांगितले.

            डॉ. पांढरपट्टे म्हणाले कीबदलत्या माध्यमांनुसार आणि माध्यमातील स्पर्धेमुळे पत्रकारांचे आयुष्य धकाधकीचे आणि धावपळीचे झालेले आहे. महासंचालनालयाचे कामही तसे शासकीय परंतु पत्रकारीतेचे आहे असे म्हटले जाते. माध्यमातील लोकांना सतत कार्यरत राहून सतर्क रहावे लागते. यामुळे ताण वाढतो त्याने अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात.त्यासाठी आरोग्यविषयक जागृत राहणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्टच्या प्राथमिक उपचारासाठी कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) हे माहितीपूर्ण प्रशिक्षण आपल्या जवळच्या मित्राचेनातेवाईकांचे प्राण वाचविण्यास उपयुक्त ठरेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला व अशा प्रकारचा जनजागृती व जनसंपर्काच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.

            हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्टची घटना आपल्या अवतीभोवती घडल्यास कशाप्रकारे तातडीने तीन मिनिटांमध्ये चार टप्प्यातील तातडीची वैद्यकीय मदत  केल्यास मृत्यु टाळता येऊ शकतो. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने उद्घाटनाचा प्रशिक्षण कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत आय केअरने शनिवारी आयोजला होता.

            या प्रशिक्षणामध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येणाऱ्या पिडीतांना वैद्यकियदृष्ट्या मेंदू मृत होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्यवेळी सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) म्हणजेच हाताने हृदयावर दाब देणे शक्य तितक्या लवकर सुरू करणे गरजेचे आहेसीपीआर आणि शॉक मशीन (एईडी मशीन)चा वापर करण्याचेही प्रशिक्षण दूरदृश्य माध्यमाव्दारे दिले. जेणेकरून आपल्या जवळची व्यक्ती किंवा नातेवाईकाचे प्राण वाचविण्यास सहकार्य करता येईल.

            सुमय्या राघवन आणि आनंद श्रीवास्तव यांनी दूरदृश्यमाध्यमाव्दारे हृदयविकाराचा झटका व कार्डियाक अरेस्ट यातील फरक कसा ओळखावा आणि तीन मिनिटांमध्ये रुग्णाचा उपचार सुरु करणे आवश्यक आहे. याचे चार टप्प्यांमध्ये सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणानंतर आय केअरचे डॉ.यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ)डॉ.ब्रायन पिंटो (कार्डियोलॉजिस्ट),डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ) यांनी यावेळी अकस्मात हृदयरोग या विषयावर मार्गदर्शन केले व वेबिनार मध्ये सहभागी झालेल्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.

          दरम्यान सुरुवातील हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्ट या संदर्भातील सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) प्रशिक्षणाची उपयुक्तता संदर्भात क्रिकेटर सुनील गावस्कर, सिनेअभिनेता अमीर खान, कार्तिक आर्यन, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांचा जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आला.

000000

 बार्टी कडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

बार्टीचे विद्यार्थी यावर्षी यूपीएससी. परीक्षेत  यशस्वी

               मुंबई, दि. 25 : लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या  संस्थेच्या वतीने  प्रशिक्षण प्राप्त केलेल्याअनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी अभिनंदन केले आहे. 

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीचे प्रशिक्षण देण्यात येते. दिल्ली येथील नामांकित संस्था, यशदा भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना पूर्व तथा मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते तसेच नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या तयारीकरीता व व्यक्तिमत्व परीक्षेच्या तयारीकरिता आर्थिक सहाय्य देण्यात येते. कोरोना महामारीच्या संकटात सुद्धा महासंचालक श्री. गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टीने व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकारी व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच महासंचालक श्री. गजभिये यांनीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले होते. बार्टी संस्था युट्यूबद्वारे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देत आहे. तसेच यूपीएससी मुलाखतीचे ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देणारी बार्टी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. 

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 मधील यशस्वी विद्यार्थी

            यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

            बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत बार्टीच्यावतीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे  मंत्री श्री. मुंडेमहासंचालक श्री. गजभिये यांनी अभिनंदन केले आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत कार्य उत्तीर्ण अधिकाऱ्याने करावे. तसेच सर्वसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवण्यासाठी आपण कार्य करावे आपण यशस्वी झालात बार्टी संस्थेला आपला अभिमान वाटत आहे, अशा शुभेच्छा महासंचालक श्री. गजभिये यांनी यावेळी दिल्या. बार्टी संस्थेच्यावतीने येरवडा संकुल येथे अद्ययावत यूपीएससी स्पर्धा परीक्षेचे निवासी केंद्र लवकरच सुरु करणार असल्याची माहिती महासंचालक श्री. गजभिये यांनी यावेळी दिली. 

      यशस्वी विद्यार्थ्यांनी बार्टीने केलेल्या सहकार्यामुळे आज आम्ही यशस्वी झालो असल्याचे सांगून बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. गजभिये यांचे आभार व्यक्त केले आहे. रुपेश शेवाळे व मुकुल कुलकर्णी (आयआरएसयांनी आपला अमूल्य वेळ काढून बार्टीतील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रिया पवार यांनी ऑनलाइन मुलाखतीचे आयोजन व नियोजन  यशस्वीरीत्या केले त्यांचेही श्री. गजभिये यांनी अभिनंदन केले.

Featured post

Lakshvedhi