Thursday, 23 September 2021

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2031 अंतर्गत

2000 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

 

            मुंबईदि. 23 : महाराष्ट्र शासनाने 10 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे 6.78 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2031 चे रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

          रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या क्रमांक एलएनएफ/ 10.19/ प्र.क्र. 10/अर्थोपाय दिनांक 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                          

            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 28 सप्टेंबर2021 रोजी त्यांच्या फोर्टमुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 28 सप्टेंबर2021 रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकमुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 29  सप्टेंबर 2021 रोजी करण्यात येईल.

            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा  कालावधी 10 वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी  दि. 25 मे 2021 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 25 मे 2031 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 25 नोव्हेंबर व 25 मे रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या 23 सप्टेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली

Negetivity convert in positivity


 

Tip's

 🩸 *तब्येती का बिघडतात ?*


मनांत खूप साचलं की

कुणाजवळ तरी बोला,

ऐकणाऱ्याचा खांदा

होऊ द्या की ओला.


धरण पूर्ण भरल्यावर

जसे दरवाजे उघडतात,

माणसं तसं वागत नाहीत

म्हणून तब्येती बिघडतात.


त्यामुळेच आग्रह आहे

मन मोकळं करा,

एखाद्या तरी मित्राचा

हात हातात धरा.


जे वाटतं ते बोलून टेन्शन

करा कमी,

व्यक्त होण्यातच

आरोग्याची हमी.


जर कुढत बसाल तर

विपरीत परिणाम होणारच,

बीपी, शुगर, ECG

कमी जास्त होणारच.


दुःख सांगायला कोणी नसणे

जागतिक समस्या आहे,

अनेक रोगाचं कारण हे

कुढत बसणं आहे.


रडायला जर जागा नसेल

लावा प्रॉपर्टीला काडी,

काय करायचं सोनं चांदी

बंगला फ्लॅट गाडी.


हजार वेळेस सांगितलं

माणसं जोडायला शिक,

तुला वाटतं पैसा करील 

सगळं काही ठीक.


जे होईल ते होईल म्हणून

झुगारून टाका भीती,

प्रत्येक क्षण जगून घ्या

नका म्हणू 

*'आत्ता उरले किती ' ?*🙏

      ********arogy

Health care tips

 *तांदळाच्या पेजेचे आरोग्यदायी फायदे*


१) तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढते.


२)  तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्यायल्याने एनर्जि मिळते. थकवा दूर होतो.


३) तांदळाची पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताची कमतरता दूर होते.


४) तांदळाच्या पेजेत लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.


५)  तांदळाच्या पेजेत दही टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.


६) केळे व तांदळाची पेज एकत्र करून प्यायल्याने  जुलाब बंद  होतात, 


७) तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढते.


८) तांदळाच्या पेजेत मीठ व जीरे मिसळून प्यायल्यास

 डायजेशन सुधारते.


९) भाताच्या पेजेत कार्बोहायड्रेटस् चे प्रमाण अधिक असते,  त्यामुळे उर्जा मिळते, बाहेर जातांना पिऊन जावे, दिवसभर ताजेतवाने वाटते.


१०) वायरल संसर्गाने उलट्या, मळमळ होत असेल तर जेवणाऐवजी पेज घ्यावी, आजारपणात  आलेली कमजोरी दूर होते.


११)  उच्च रक्तदाब कमी होतो. तांदळाचे पाणी  घेतल्यास हाय ब्लडप्रेशर कमी होते. कारण यात पोटँशिअम मुबलक प्रमाणात असते.


१२)  तांदळच्या पाण्याने चेहरा धुतल्यास तजेलदार, मुलायम होतो, काळे डाग निघून जातात.


१३)  केसांकरता उत्तम  टाँनिक आहे. याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो, केस रेशमी, चमकदार, व मजबूत होतात. रूक्षता निघून जाते

 दुतोंडी केसांची समस्या दूर होते, कारण यात  मुबलक विटामिन, मिनरल असतात.


१४)  तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कँसरच्या पेशी आटोक्यात राहतात.


१५) तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते.  त्यामुळे आरोग्य चांगले राहते.


२६) डायेरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळी तांदळाची  पातळ पेज प्यायला द्यावी. ताकद येते.


१७) सर्दी, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये

 तांदळाचे पाणी प्यायल्यास    प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.


 

Corona vaccine camp Alibag by shivsena sreebag


 

Vaccine

Featured post

Lakshvedhi