Wednesday, 22 September 2021

Shravan sampala

 


Swaroop sampat

 *अत्यंत स्वरूपसुंदर अभिनेत्री स्वरूप संपत*


ही 'ये जो है जिंदगी' या नितांत सुंदर मालिकेची नायिका आज जगातील पहिल्या दहा सर्वश्रेष्ठ शिक्षकांमध्ये एक आहे. इंग्लंडमध्ये तिने Ph. D आणि तीही संपूर्ण शिष्यवृत्तीवर मिळवली आहे. १७९ देश, दहा हजार स्पर्धेतील सहभागी एकूण शिक्षक यातून तिची निवड झाली आहे. 'जीवनकौशल्ये' यावर तिचे प्रभुत्व असून अनेक शाळांमध्ये तिने कार्यशाळा, शिबिरे व शिक्षकांना प्रशिक्षण देऊन एक अद्भुत कामगिरी केली आहे. 


मिस इंडिया ही स्पर्धा तिने जिंकली व नंतर त्यांचे परेश रावल यांच्याबरोबर लग्न झाले. फार चांगले आणि उच्च विचार व मुलांविषयी प्रचंड प्रेम आणि आस्था असलेली एक आई अशा शब्दात तिनी स्वतःचे वर्णन केले आणि ती तशी वागलीही आहे आणि वागतही आहे, हे अत्यंत विनम्र भावाने पण अभिमानाने ती सांगते. परेश रावल यांनी ती Ph. D. करून आल्यावर तिला विचारले की, आता तु कोणते काम करणार आणि किती पैसे मिळवशील ? हा प्रश्न विचारला असता तिने सांगितले की, इतके इतके पैसे मिळविन. तर परेश त्यांना म्हणाले, की तू शिक्षक म्हणून काम करणार असशील, तर एकही पैसा घेऊ नकोस. आपल्याकडे पैसे भरपूर आहेत. आणि त्यानी  दाखवून दिले कि, खरोखरच ती नुसती स्वरूपसुंदर नसून मनाने देखील तितकीच सुंदर आहे. हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे.


आजतागायत तिने एकही पैसा न आकारता मोफत सर्व काही केले आहे. अत्यंत द्वाड मुले आणि एक वर्गात अजिबात न बोललेली मुलगी व तिच्यात त्यांनी केलेले परिवर्तन पाहून सर्व शिक्षक आश्चर्यचकित कसे झाले, हे मुळातून ऐकण्यासारखे होते. 

Ph. D.साठी प्रवेश मिळाला, पण संपूर्ण शिष्यवृत्ती केवळ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना पत्र लिहून कशी मिळवली व त्यानंतरचा त्यांचा बेस्ट टिचर हा प्रवास त्यांच्याच शब्दातून ऐकण्यासारखा आहे. 

एका मुलाखत घेणाऱ्या निवेदिकेने तिला प्रश्न केला की, लोकांचा असा समज असतो ना की, तुम्ही सिनेमा जगात वावरणाऱ्या, घरी नोकर-चाकर असतील, परेश रावळ यांच्या पत्नी आहात, तर तुम्हाला काय वाटते ? वगैरे..

त्यांनी उत्तर दिले, 'I am typical middle class Indian woman and I am above all Indian mother and I am proud of it'. तिने मुलांच्या शिक्षणासाठी जे बदल करायचे आहेत, त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिले आहेत आणि त्यावर सरकार विचार करेल असा विचार देखील बोलून दाखवला. ही सर्व मुलाखत तिने मराठी भाषेत बोलून दिली हे विशेष. 


एक अभिनेत्री, मिस इंडिया, ते डॉक्टरेट, एक जागतिक दर्जाची शिक्षिका आणि मुलांच्यात रमणारी एक आई अशी सर्वांगसुंदर स्त्री असा फार फार सुंदर प्रवास करत स्वतःबरोबर इतरांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या या स्वरूपसुंदर  शिक्षिकेस शतशः प्रणाम🙏🏻

Art


 

 कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

 

          मुंबई 22 : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील तथा कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.  राज्यातील खेडोपाडीसर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे काम त्यांनी केले.  स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र देत बहुजनकष्टकरी समाजाच्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. समृद्धसुसंस्कृत महाराष्ट्राच्या जडणघडणीतील कर्मवीर अण्णांचे योगदान मोलाचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षितसंस्कारी नवी पिढी घडविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर अण्णांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

          उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतातकर्मवीर अण्णांनी जातीधर्मपंथवर्गाच्या भिंती तोडून शिक्षणाची दारे सर्वांना खुली करुन दिली. अज्ञानअंधश्रद्धागरीबीसारख्या समस्यांवर 'शिक्षणहाच एकमेव आणि प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी राज्यात शाळामहाविद्यालयेवसतीगृहे सुरु केली. गरीबांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणले. त्यांचे शिक्षण अखंड सुरु रहावे यासाठी 'कमवा आणि शिकासारखी योजना सुरु केली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी सुशिक्षितसुसंस्कृतनीतीवानप्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचे खुप मोठे काम केले आहे. कर्मवीर अण्णांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर अण्णांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

0000

 महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन 'सुधारित घटना मसुदा-2021एकमताने मंजूर

कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठीयुवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 21 : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठीकबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहनउपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन 'सुधारित घटना मसुदा-2021एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकरआमदार भाई जगतापउपाध्यक्ष दिनकर पाटीलउपाध्यक्ष शकुंतला खटावकरसरकार्यवाह ॲड आस्वाद पाटीलसहकार्यवाह रविंद्र देसाईकोषाध्यक्ष मंगल पांडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत. कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.

            गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोना संकटाचा सामना करत आहोत. या संकटकाळात महाराष्ट्रातील सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहेत्यामुळे सर्वांनी अधिक सतर्कतेने कार्यरत रहावेअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

            विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन 'सुधारित घटना मसुदा-2021बाबत चर्चा करून हा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

*****


Vaccine

 


 

नवमतदारांच्या जनजागृतीसाठी राज्यभर स्वीप कार्यक्रम राबविणार

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

        मुंबई दि. 21 : राज्य निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचविण्यासाठी 'मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग' (स्वीप) हा जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वसमावेशक सहभाग हे लोकशाहीचे मूलतत्व असल्याने शासकीय- निमशासकीय विभागअशासकीय संस्थास्वायत्त संस्थायुवा-स्त्रियादिव्यांगतृतीय पंथीग्रामीण-शहरी नागरिकआदिवासीस्थलांतरीत अशा विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी एकत्रितरित्या कार्य करणे आवश्यक आहे. सर्व विभागांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

         दृकश्राव्य माध्यमातून मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग (systematic voter education and electoral participation) ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे स्वीप सल्लागार श्री.दिलीप शिंदेमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टेसंचालक गणेश रामदासीएकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्त रूबल अग्रवालसामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुखआदिवासी विकास  विभागाचे आयुक्त हिरालाल सोनावणेकामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खटाळकृषी विभागाच्या सरिता देशमुखग्रामविकास विभागमहसुल विभागएड्स नियंत्रण संस्था आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

           मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणालेसहभाग हा लोकशाहीमध्ये महत्वाचा घटक असूनप्रत्येक विभागाच्या सहभागानेच हे शक्य आहे. नवमतदारांची नोंदणीनाव वगळणेनावात बदल अथवा इतर काही बदल करावयाचे असल्यास ते कशापद्धतीने करावयाचे यासंदर्भात मतदार जागरूकता मंचांतर्गत (VAF) जागरूकता करणे गरजेचे आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरमहिला व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थासंघटीत-असंघटीत कामगारयुवाप्राध्यापकवंचित घटकांसाठी काम करणारे कार्यकर्तेअशा अनेक घटकांनी एकत्रितरित्या काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

             प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय विभागाने एका अधिकाऱ्याची  स्वीप या कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून निवड करावी. ग्रामविकास विभागाने संविधान दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये मतदारांच्या याद्या वाचाव्यात जेणेकरून ज्या मतदारांचे नाव नसेल त्यांना माहिती देता येईल. प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने जागृतीपर कार्यक्रम राबवावे व प्रसिद्धी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विविध विभागांच्या सूचनांचाही विचार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

                माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणालेमतदार जनजागृती संदर्भात विविध उपक्रमांना महासंचालनालयामार्फत प्रसिद्धी दिली जाईल. विविध समाज माध्यमांमार्फत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविता येईल. ‘लोकराज्य’ या मासिकामध्ये स्वीप कार्यक्रमासंदर्भात विशेष प्रसिद्धी दिली जाईलअसेही त्यांनी सांगितले.

           स्वीप कार्यक्रमाच्या आयकॉन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेमबाज राही सरनोबत यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये बॅनरच्या माध्यमातून क्रीडापटूंना व नवमतदारांना स्वीप कार्यक्रमाची माहिती देता येईल. भारत निवडणूक आयोगाच्या विविध मोबाइल ॲप्सचाही त्यांना वापर करता येईल. तसेच एखादी चित्रफीत किंवा संदेशाचा डिजीटल माध्यमांतून प्रसार करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर किंवा खेळाडूंच्या समाज माध्यमातील अकांउंटचा वापर करता येईल, असेही सांगितले.

         विविध शासकीय-निमशासकीय विभागसामाजिक संस्था यांनीही यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

            स्वीप सल्लागार दिलीप शिंदे यांनी लोकशाही सक्षमीकरणासाठी मतदार जागृती कार्यक्रम एकत्रितरित्या करणे गरजेचे असल्याचे सांगितले. विविध विभागांनी विविध उपक्रम राबवावे, यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता येईल, असेही त्यांनी सांगितले.

०००


राज्यपालांच्या हस्ते नॅकच्या

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण अहवालाचे प्रकाशन

 

          मुंबई, दि. 21 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. २१) बंगळूरु येथे राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेने {नॅक}  तयार केलेल्या  महाराष्ट्र राज्याच्या अहवालाचे प्रकाशन केले.

            'महाराष्ट्र राज्यातील मूल्यांकन झालेल्या उच्च शिक्षण संस्थांचे राज्यस्तरीय विश्लेषणया अहवालाच्या प्रकाशन कार्यक्रमाला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे संचालक प्रो.एस. सी. शर्मा उपस्थित होते.

            नॅकने आतापर्यंत १६ राज्यांचे अहवाल तयार केले असून महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण संस्थांचे विश्लेषण असलेला नॅकचा हा १७ वा अहवाल आहे.  तज्ज्ञ समितीने तयार केलेल्या या अहवालामध्ये महाराष्ट्र राज्याचा परिचयराज्यातील उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनाचा आढावागुणवत्ता विश्लेषणसंख्यात्मक विश्लेषणअहवालातील निष्कर्ष व निरीक्षणे तसेच भावी दृष्टिक्षेप व शिफारसींचा समावेश आहे.

००००

 

Governor Koshyari releases NAAC Maharashtra report in Bangalore

 

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the Maharashtra Report of the National Assessment and Accreditation Council at the NAAC office in Bangalore on Tuesday (21st Sept).

      The ‘State Level Analysis of Accredited Higher Educational Institutions of Maharashtra’ report prepared by NAAC was released in the presence of Prof S C Sharma, Director, NAAC.

      This is 17th State Report prepared by NAAC. It has already prepared reports for 16 other States including Andhra Pradesh, Delhi, Gujarat, Karnataka, Kerala, MP and others.

      The Report contains Introduction to Maharashtra, Introduction to Quality Assurance, Assessment and Accreditation, An Overview of NAAC Assessment and Accreditation Process, Findings and Observations and Future Perspectives and Recommendations.

0000

Featured post

Lakshvedhi