Monday, 6 September 2021

 #ब्राह्मण व्यवसाय संघ 

#रत्नागिरी 

#तेजस खरे 8275442741

दिनांक २४/०८/२०२१ 


पणती मॉडेल नंबर १.


आता गणपती /दिवाळी सजावटीसाठी पटापट विद्युत उर्जे शिवाय उत्कृष्ट रोषणाई करा.


रिटेल किंमत : ५०/-रुपये प्रति नग (उद्पादन भारता मध्ये बनविलेले )


होलसेल किंमत :४०/प्रति नग( ५० नगा साठी)


होलसेल किंमत :३५/प्रति नग( १०० नगा साठी)


कुरिअर चार्जेस वेगळे लागू होतील. 


पाण्यावर पणती पेटविणे हा  साक्षात साई बाबा यांनी चमत्कार साऱ्या विश्वाला दाखविला होता.


पण त्याच आधारे एक विशिष्ट कौशल्य वापरून आम्ही तयार करून आपल्यासाठी आणत आहोत पाण्यावर पेटणारी पणती.


ज्या पणती मध्ये फक्त आपणास  पुरेसे पाणी ओतायचे आहे,  आणि आपली पणती ज्योती सकट प्रखर  पेटती होणार.


आमच्या पणतीचे फायदे :- 


१) कापूस वातीची गरज नाही.

२) तेलाची गरज नाही.

३) हवेवर सुद्धा पणती बंद होणार नाही.

४) पुरेसे पाणी  पणती मध्ये ओतल्यावर पणती पेटणार.

५) पाणी ओतून दिल्यावर पणती बंद होईल.

६) उपयोग नसताना पणती मधील पाणी ओतून पूर्णपणे पाण्याचा ओलावा साफ करून बॉक्स मध्ये पॅक करून ठेवणे.

७) सजावट आणि  डेकोरेशन साठी उत्तम पर्याय.

८) पूर्णपणे टिकावू आणि हाताळण्यासाठी सोप्पे.

९) कसलाही धोका नाही.

१०)विद्युत प्रवाह ची गरज नाही.

११) महत्वाचे म्हणजे हे संपूर्णपणे भारता मध्ये बनलेले उत्पादन आहे.


लगेच ऑर्डर देण्यासाठी गुगल पे

तेजस खरे 8275442741

 🙏 परेल, मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा रुग्ण 24 तासाच्या आत घेऊन जाणे ) या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, रुग्णाच्या मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये  ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

जगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे (न्युरोसर्जन) हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर  मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

 💐🙏🏻💐🙏🏻💐👍👌

माहीती सर्वाना कळवा फायदा होईल .

 राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा

असे नाव देण्यात येणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

 

            मुंबईदि. 2 : संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्याचे काम केले आणि त्यामुळेच राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसले राज्य नाट्य स्पर्धा असे नाव देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष वर्षा धाबेप्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपूरेप्रदेश उपाध्यक्ष प्रकाश लेणेकर,महासचिव प्रमिलाताई भिसेकोषाध्यक्ष शाम वानखेडेआयोजन समिती प्रमुख शिवराज शिंदेप्रसिध्दी प्रमुख जयप्रकाश पाटीललोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगेसांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले कीकेशवराव भोसले यांच्या नावाने नाटक आणि संगीत क्षेत्रातील कर्तृत्ववान कलाकरांसाठी राज्य पुरस्कार सुरु करण्याबाबत शासन विचार करेल. मात्र तत्पूर्वी संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्रने याबाबतचा परिपूर्ण प्रस्तावमार्गदर्शक तत्वे याबाबतची सांस्कृतिक कार्य विभागाला सादर करावी. संगीत नाटक क्षेत्रातील होतकरु विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याबाबतही विचार करण्यात येईल.

            संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे जयंतीपुण्यतिथी कार्यक्रम शासकीय पातळीवर करण्यात यावेत याबाबत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सामान्य प्रशासन विभागाला कळविण्यात येईल. संगीतसूर्य केशवराव भोसले कलासाहित्य आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याबाबतही विभागामार्फत विचार करण्यात येईल. येत्या 4 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे होणाऱ्या सांगता कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

 टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा

नायर रुग्णालयाला 100 कोटी रुपयांचा निधी

                              - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

 

            मुंबईदि. 4-  टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्यावतीने 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेखमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरेमहापौर श्रीमती किशोरी पेडणेकरआमदार यामिनी जाधवउपमहापौर सुहास वाडकरमहापालिका आयुक्त इकबालसिंह चहलनायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेजनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था आज शतायुषी होते आहेहे समाधान काही वेगळे असून या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. संस्था निर्माण केल्यावर जीव ओतून इतरांना जीवदान देण्याचे काम या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केले आहे. आज मंदिरेप्रार्थनास्थळे बंद आहेतदेव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रूपात रुग्णांचा जीव वाचवत आहे. कोविडचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होतेसुरुवातीला या संकटाची दहशत होतीमात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे राज्य सरकारप्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्रया कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.

            कोविडच्या अगोदर शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली होतीआता त्याची काही माहिती उपलब्ध असेल असे वाटत नाहीमात्र यापुढे कोणताही विषाणू येईल त्यावेळी कोरोनाकाळात आपण काय केलेकाय करायला हवेयाची  अधिकृत नोंद करण्याची आवश्यकता असून ही माहिती 50-100 वर्षानंतरदेखील उपलब्ध होईल या दृष्टिने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवतानाच या संस्थेला जेव्हा दोनशे वर्षे पूर्ण होतील त्यावेळी इतिहासात या रुग्णालयाच्या कार्याची निश्चितच नोंद होईल, असेही   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

            शंभर वर्षांपूर्वी अनेक दानशूरांनी दान दिले, मदत केली म्हणून आज आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून जीवनदान मिळाले आहे. टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय या संस्थेला 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतानाच शंभर वर्षांनंतरही लोकांसाठी हितकारक ठरेल असे काम करून दाखवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

            2005 च्या मुंबईतील पूरानंतर लॅप्टोडेंग्यूचा धोका वाढला होता त्यावेळी चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात पहिली लॅब सुरु झालीनंतर कोरोनाच्या काळात चाचण्यांसाठी सुरुवातीला कस्तुरबा आणि पुण्याची एनआयव्ही अशा दोनच प्रयोगशाळा होत्या आज या प्रयोगशाळांची संख्या सहाशेच्या वर गेल्या असून पूर्वी सात-आठ हजार खाटांची क्षमता असलेल्या या राज्यात आता साडेचार लाख खाटा वाढल्या आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तपासणीसाठी नायर रुग्णालयातच एकमेव जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

            शतकपूर्तीवर्षे असलेल्या या संस्थेचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान असून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेऊन संस्थेने केलेल्या कार्याचा पालकमंत्री अस्लम शेख यांनी यावेळी गौरव केला. फ्रंटलाईन वर्कर्ससाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या भरीव उपाययोजनांची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

            नायरसारखी मुंबईतील सर्व रुग्णालये ही मुंबईकरांची हृदयस्थाने असून कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या काळात नायर रुग्णालयाने केलेल्या सेवेचा महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी गौरव केला. भविष्यातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीदेखील महापौरांनी यावेळी दिली.

            याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इम्युनॉलॉजीशल्यक्रिया कौशल्य आणि संगणकाधारित शिक्षण या तीन प्रयोग शाळांचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागनिर्मित  पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या गणेशोत्सव 2021’ या माहितीपुस्तिकेचे तसेच नायर रुग्णालयातील डॉक्टर्सकर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना कोविड काळात आलेल्या अनुभवांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते  प्रकाशन करण्यात आले.  भारतीय टपाल विभागाने नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त जारी केलेल्या विशेष टपाल कव्हरचे प्रकाशन आणि संस्थेच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या भित्तीचित्राचेदेखील यावेळी अनावरण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरातील विविध रुग्णालयांमध्ये कोविड काळात केलेल्या व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही यावेळी मान्यवरांनी प्रकाशन केले. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

0000

 भानुशाली समाज भाग्यशाली

कच्छी भानुशाली समाजाचे करोना काळातील सेवाकार्य कौतुकास्पदराज्यपाल

 

            मुंबई, दि. 4: व्यापार उदीमाद्वारे धनसंग्रह करून वाडी-इमल्या बांधणे कठीण काम नाही. परंतु ईश्वर कृपेने मिळालेली धनसंपदा आपल्याच उपेक्षित समाज बांधवांमध्ये निःस्वार्थपणे वाटणे हे श्रेयस्कर काम आहे, असे सांगून कच्छी भानुशाली समाजाने कष्टार्जित संपत्तीतून करोनाकाळात समाजासाठी केलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहेअसे प्रशंसोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

            स्त्रियांसाठी कार्य करणारे जेडल फाउंडेशन व कच्छी भानुशाली सेवा समाजाच्या माध्यमातून करोनाकाळात उल्लेखनीय सेवाकार्य करणाऱ्या 37 करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचा यावेळी कच्छी टोपी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाला जेडल फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया चांद्राकच्छी भानुशाली सेवा समाज न्यासाचे अध्यक्ष नरेश सेठीयावल्लभदास भद्राडोंबिवली कच्छी भानुशाली मित्र मंडळाचे विश्वस्त - छायाचित्रकार नवीन भानुशालीअनिल भद्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

            भारताला संतांची मोठी परंपरा लाभली असून त्यांनी सांगितलेली जीवनमूल्ये भारतीय समाजाचा स्थायीभाव झाला असल्याचे सांगताना समाजाचे ऋण मान्य करणारा कच्छी भानुशाली समाज वास्तविक भाग्यशाली समाज आहेअसे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी नरेश धनजी शेठियावल्लभदास लीलाधर भद्रादिनेश लक्ष्मीदास चंद्रानवीन भानुशालीअरविंद चंदुलाल चंद्रराजेश पुरुषोत्तम जोईसर, धरमशीभाईनारायण लक्ष्मीदास मिठीयाजितेंद्र परशोत्तम गजरामंजी प्रेमजी गजरासतीश हरीश भद्राभरत रमेश माववीरेन हरिराम गजराअनिल शेठियाअमित मंगलदास मांगेअनिल भद्रामेहुल नारायण भानुशालीजगदीश जोईसरजितेंद्र शंकरलाल शेठियाराधा परिण जोईशरपरिन नवीनचंद्र जोइशरजितेश वालजी भानुशालीउमेश पुरुषोत्तम भानुशालीरावाजी नानजी दामाविशाल दयाराम गोरीजेठालाल नानजी भानुशालीमंथन खिमजी गजराराजेश बाबूभाई भानुशालीदर्शन चंदुलाल हेमानीखुशालभाई गडाअमर वल्लभदास गजरादर्शना दामलेमकरंद प्रभाकर प्रधानधर्मेंद्र नवनीतलाल शाहनिवा सेजल विशाल गडा यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

00000


 

 

Governor hails the contribution of Kutchi Bhanushali community during COVID-19 pandemic; Felicitates 37 Corona Warriors

 

Mumbai, 4th Sept: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated 37 Corona Warriors from the Kutchi Bhanushali community at a felicitation organized by Jedal Foundation at Raj Bhavan, Mumbai on Saturday (4th Sept)

 

Speaking on the occasion, the Governor hailed the contribution of the Kutchi Bhanushali community during the COVID-19 pandemic.

 

President of the Jedal Foundation Vijaya Chandra, Secretary Darshan Hemani, photojournalist Navin Bhanushali and President of Kutchi Bhanushali Seva Samaj Trust Naresh Sethia were prominent among those present.

 

The Governor felicitated Naresh Dhanji Sethia, Vallabhdas Liladhar Bhadra, Dinesh Laxmidas Chandra, Navin Bhanushali,  Arvind Chandulal Chandra, Rajesh Purushottam Joyser,  Dharamshibhai, Narayan Lakshmidas, Jitendra Parshottam Gajra and other Corona Warriors on the occasion.

Sunday, 5 September 2021

 [9/4, 6:26 AM] Gym Bhosalee: *सकारात्मकता* 😀


स्वच्छ पांढरा शर्ट घालून ऑफिसला  जाताना कावळ्याने घाण केली तर निराश होऊ नका.


आकाशाकडे बघा, आणि ईश्वराने गाई-म्हशींना पंख दिले नाहीत म्हणून आभार माना.

😊😁

[9/5, 10:26 AM] Gym Bhosalee: आज एक नवीन शब्द शिकलो.


*'Ultracrepidarian'*

(अल्ट्राक्रेपिडारिअन)


 त्याचा डिक्शनरी अर्थ असा आहे

की

 The person having

 habit of giving opinions

 and advice on matters

 outside of his knowledge or

 competence.


आमच्याकडे त्याला *'पुणेकर'* असं म्हणतात.


इंग्रजीमध्ये ना, उगीचच Complicate करतात, 

इतका सोप्पा आणि 

सरळ शब्द असताना!


😀🤪🌹

[9/5, 6:28 PM] Gym Bhosalee: *आज शिक्षक दिन आहे..*

*त्या निमित्ताने गदिमांची एक सुंदर रचना..*


अरे कुंभारासारखा गुरु, 

नाही रे जगात,

वरी घालतो धपाटा,

आत आधाराचा हात॥ध्रु॥


आधी तुडवी, तुडवी, मग हाते कुरवाळी

ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी,

घट थोराघरी जाती,

घट जाती राऊळात ॥१॥


कुणी चढून बसतो, गावगंगेच्या मस्तकी

कुणी मद्यपात्र होतो,

राव राजांच्या हस्तकी

आव्यातली आग नाही,

कुणी पुन्हा आठवत ॥२॥


कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ

देता आकार गुरुने,

ज्याची त्याला लाभे वाट

घट पावती प्रतिष्ठा,

गुरु राहतो अज्ञात ॥३॥


*॥ शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभकामना ॥*

🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻

Saturday, 4 September 2021

 *सकारात्मकता* 😀


स्वच्छ पांढरा शर्ट घालून ऑफिसला  जाताना कावळ्याने घाण केली तर निराश होऊ नका.


आकाशाकडे बघा, आणि ईश्वराने गाई-म्हशींना पंख दिले नाहीत म्हणून आभार माना.

😊😁

Featured post

Lakshvedhi