चिनी लाइटची माळ एक दिवाळी पण नीट टिकत नाही ......😢😢😢
.....
.....
....
....
...
.
व्हायरस मेल्यांनी तीन चार दिवाळ्या टिकेल असा आणलाय ...
😡 😡 😡
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
वांद्रे, विलेपार्ले, सांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून
नऊ हजार नागरिकांचे लसीकरण
--
· कोविड विषयक नियमांचे पालन करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन
मुंबई, दि. 18 : वांद्रे, विलेपार्ले आणि सांताक्रुझ येथे आयोजित मोफत लसीकरण शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या शिबिरांना भेट देऊन पाहणी केली.
एच एन रिलायन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर, विलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉल आणि सांताक्रुझ येथील साने गुरूजी शाळेत प्रत्येकी तीन हजार लसींचे डोस देण्यात येत आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लसीकरण शिबिरांचे आयोजन करताना कोविडविषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या. यावेळी परिवहन मंत्री ॲङ अनिल परब, आमदार सुभाष सावंत, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक सदा परब, शेखर वायंगणकर, श्रीमती रोहिणी कांबळे, संदीप नाईक, वरूण सरदेसाई आदी उपस्थित होते.
यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ
स्थापन करण्यास तत्वत: मान्यता
- कामगार मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 18: महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. तर यंत्रमागाशी निगडीत साडेचार लाख कामगार असुन ते असंघटीत कामगार म्हणुन गणले जात असल्याने आजपर्यंत त्यांना कोणतेही लाभ मिळत नाही. अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे, अशी मागणी प्रलंबित होती. त्यानुसार यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्रालयात राज्यातल्या यंत्रमाग मालक संघटना व कामगार संघटना तसेच वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीसाठी कृषी मंत्री दादाजी भुसे , आमदार प्रणिती शिंदे , आमदार अनिल बाबर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार मुनीफ इस्माईल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, विकास आयुक्त (असंघटीत कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह मदन कारंडे,माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार नरसिंह आडम, अमित गाताडे, सतीश कोष्टी, विनयजी महाजन , महादेव गौड, बंडुपंत मुसळे, राजीव पारीख, सुनील शिंदे, उदयसिंग पाटील, कामगार नेते दत्ता माने, भरमा कांबळे, तसेच मालेगाव, भिंवंडी, सोलापूर, सांगली, व इचलकरंजी येथील मालक संघटना व कामगार संघटनेचे प्रतिनिधी हजर होते.
0000
वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार
-- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई दि, 18: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग 3 पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर वर्ग 4 ची पदभरती अधिष्ठाता स्तरावरुन करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक दिलीप म्हैसेकर, जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह सार्वजनिक बांधकाम आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी सन 2017 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार तीन वर्षासाठी सर्व कर्मचारी तसेच आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली होती. आता हा करार जरी संपला असला तरी नवीन करारासंदर्भातील प्रस्ताव त्वरित पाठविण्यात यावा आणि प्रस्तावाला परवानगी मिळावी यासाठी अधिष्ठाता यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा करावा असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बांधकाम कामाला गती देण्यात यावी
-- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
दीड वर्षापासून राज्यात कोविडचे संकट सुरु असून अजूनही धोका टळलेला नाही. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्यात आले होते तसेच येथील डॉक्टर आणि इतर कर्मचारी कोविडच्या कामात होते. मात्र आता हळूहळू या महाविद्यालयात करण्यात येणाऱ्या इतर बांधकाम कामाला गती देण्यात यावी अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्या.
श्री. पाटील म्हणाले की, या महाविद्यालयात बांधकाम करण्यात येणाऱ्या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकामासाठी आवश्यक त्या तांत्रिक परवानग्या, प्रशासकीय मान्यता घेण्याचे काम वेळेत पूर्ण करावे तसेच या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत परवानग्या घेऊन बांधकामाला गती द्यावी. हे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी जळगाव येथे लवकरच साईट ऑफीस सुरु करण्यात यावे, असे निर्देशही श्री. पाटील यांनी दिले.