Wednesday, 18 August 2021

 चिनी लाइटची माळ एक दिवाळी पण नीट टिकत नाही ......😢😢😢

.....

.....

....

....

...


.


व्हायरस मेल्यांनी तीन चार दिवाळ्या टिकेल असा आणलाय ... 

😡 😡 😡

 वांद्रेविलेपार्लेसांताक्रुझ येथील लसीकरण शिबिरांतून

नऊ हजार नागरिकांचे लसीकरण

--

·       कोविड विषयक नियमांचे पालन करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

 

            मुंबईदि. 18 : वांद्रेविलेपार्ले आणि सांताक्रुझ येथे आयोजित मोफत लसीकरण  शिबिरांतून नऊ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या शिबिरांना भेट देऊन पाहणी केली.

            एच एन रिलायन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध भागांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वांद्रे पूर्व येथील समाज मंदिरविलेपार्ले येथील पार्ले इंटरनॅशनल हॉल आणि सांताक्रुझ येथील साने गुरूजी शाळेत प्रत्येकी तीन हजार लसींचे डोस देण्यात येत आहेत.

            मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लसीकरण शिबिरांचे आयोजन करताना कोविडविषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या. यावेळी परिवहन मंत्री ॲङ अनिल परबआमदार सुभाष सावंतमाजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरनगरसेवक सदा परबशेखर वायंगणकरश्रीमती रोहिणी कांबळेसंदीप नाईकवरूण सरदेसाई आदी उपस्थित होते.

 यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ

स्थापन करण्यास तत्वत: मान्यता

- कामगार मंत्री हसन मुश्रीफ

 

          मुंबईदि. 18: महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. तर यंत्रमागाशी निगडीत साडेचार लाख कामगार असुन ते असंघटीत कामगार म्हणुन गणले जात असल्याने आजपर्यंत त्यांना कोणतेही लाभ मिळत नाही. अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे, अशी मागणी प्रलंबित होती. त्यानुसार यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात येत असल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

          मंत्रालयात राज्यातल्या यंत्रमाग  मालक संघटना व कामगार संघटना तसेच वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत बैठक झाली.

          या बैठकीसाठी  कृषी मंत्री दादाजी   भुसे आमदार प्रणिती शिंदे ,  आमदार अनिल बाबर,  आमदार प्रकाश आवाडेआमदार सुभाष देशमुखआमदार मुनीफ इस्माईलकामगार विभागाच्या प्रधान सचिव  विनिता वेद सिंगलविकास आयुक्त  (असंघटीत कामगार)  डॉ.अश्विनी जोशी,  कामगार आयुक्त सुरेश  जाधव यांच्यासह मदन कारंडे,माजी आमदार सुरेश हाळवणकरमाजी आमदार नरसिंह आडमअमित गाताडेसतीश कोष्टीविनयजी  महाजन महादेव गौडबंडुपंत मुसळेराजीव पारीख,  सुनील  शिंदेउदयसिंग पाटीलकामगार नेते दत्ता माने,  भरमा कांबळेतसेच  मालेगाव,  भिंवंडीसोलापूरसांगलीव इचलकरंजी  येथील मालक संघटना व कामगार संघटनेचे प्रतिनिधी  हजर होते.

0000  


 वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार

-- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 

            मुंबई दि18: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग 3 पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर वर्ग 4 ची पदभरती अधिष्ठाता स्तरावरुन करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलवैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण संचालक दिलीप म्हैसेकरजळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह सार्वजनिक बांधकाम आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी सन 2017 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार तीन वर्षासाठी सर्व कर्मचारी तसेच आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली होती. आता हा करार जरी संपला असला तरी नवीन करारासंदर्भातील प्रस्ताव त्वरित पाठविण्यात यावा आणि प्रस्तावाला परवानगी मिळावी यासाठी अधिष्ठाता यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा करावा असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बांधकाम कामाला गती देण्यात यावी

-- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

            दीड वर्षापासून राज्यात कोविडचे संकट सुरु असून अजूनही धोका टळलेला नाही. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्यात आले होते तसेच येथील डॉक्टर आणि इतर कर्मचारी कोविडच्या कामात होते. मात्र आता हळूहळू या महाविद्यालयात करण्यात येणाऱ्या इतर बांधकाम कामाला गती देण्यात यावी अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्या.

            श्री. पाटील म्हणाले कीया महाविद्यालयात बांधकाम करण्यात येणाऱ्या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकामासाठी आवश्यक त्या तांत्रिक परवानग्याप्रशासकीय मान्यता घेण्याचे काम वेळेत पूर्ण करावे तसेच या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत परवानग्या घेऊन बांधकामाला गती द्यावी. हे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी जळगाव येथे लवकरच साईट ऑफीस सुरु करण्यात यावे, असे निर्देशही श्री. पाटील यांनी दिले.

राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा; सामाजिक बांधिलकी राखत जिल्हा सहकारी बँका घेणार पुढाकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई, दि. 18 : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला असून ना-नफा तत्वावर अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा राज्यातील अतिवृष्टी व पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना होणार असून त्यांना केवळ 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते. राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरामुळे अनेक दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाधितांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. मात्र या आपत्तीतून त्यांना सावरण्यासाठी तसेच त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ना-नफा तत्वावर भांडवल उभारणी खर्चापेक्षा (कॉस्ट ऑफ फंड) थोड्या अधिक व्याज दराने बाधित दुकानदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि पंचनामा झालेल्या पात्र दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना साधारपणे अवघ्या 5 ते 6 टक्के व्याजाच्या दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातल्या हजारो बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना होणार आहे. 0000
*ईश्वर कितनी सुन्दरता से* *हमारे जीवन में एक और* *दिन की वृद्धि करते रहते हैं,* *केवल इसलिए नहीं कि* *आपको इसकी जरूरत है* *बल्कि किसी अन्य को भी* *प्रतिदिन आपकी जरूरत है!!* *🙏🏻सुप्रभातम🙏🏻* *वेळेची मोठी गंमत असते काही गोष्टी* *वेळेवर समजतात आणि काही गोष्टी* *वेळ निघून गेल्यावर समजतात.* *🙏🏻🌹 शुभ दिवस🌹🙏🏻* *💐 आनंदी रहा सुरक्षित रहा💐* : *हे माझं , ते माझं आणि सगळच्* *माझं .* *लोक " माझं - तुझं " करत* *सदैव मारामारी , कोर्ट* *कचेरी करतात.* *आज निसर्गानेच दाखवून* *दिले आहे की इथे* *आपलं काहीच नाही , त्याला* *वाटेल तेव्हा तो क्षणात या जगाचा* *ताबा घेऊ शकतो .* *म्हणूनच* *एकमेकांशी गोड , प्रेमाने* *आणि मिळूनमिसळून* *वागा .* *हे जीवन क्षणभंगुर आहे .* 🙏🏻🌹🌹🙏🏻
हिंदु धर्माची निंदा करणारे लोक, हिंदु धर्मात 33 कोटि देव म्हणुन मजा उडवतात। त्या बद्दल स्पष्टीकरण👇 प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ? उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो पण , येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे. मुळात संस्कृतमधील "कोटि" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांच्यात , ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र १ प्रजापती असे पाच स्तर आहेत . प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे. अष्टवसूंची नावे - आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास . अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज. बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू १ इंद्र आणि १ प्रजापती असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३... ही माहीती सगळ्याच ग्रूपवर शेअर करा.. जेणेकरून '३३ कोटि' चा चुकीचा अर्थ लावणे बंद होईल... Let Our New Generation Understand Our Religion Well...🙏🏼☺️

Featured post

Lakshvedhi