बालकांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी ‘मानस’ प्रकल्प महत्त्वपूर्ण
नाशिकमधील बालस्नेही कुंभमेळाही बालसुरक्षेसाठी उपयुक्त ठरणार
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. ९ : मानसिक आरोग्य हा सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक जबाबदारीचा महत्त्वपूर्ण भाग बनला असून, राज्य बाल हक्क आयोगामार्फत राज्यातील दहा जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारा ‘मानस’ प्रकल्प बालकांना भावनिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच राज्यातील बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक येथे आयोजित करण्यात येणारा बालस्नेही कुंभमेळा देखील महत्त्वाची भूमिका बजावेल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
राज्यातील बालकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव पंकज देवरे, आयोगाचे अध्यक्ष ॲड संजय पुराणिक, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी, वंदना जैन तसेच आयोगाचे सदस्य गीतांजली बुटी, शुभांगी तांबट, संजय लाखेपाटील, अतुल देसाई, प्रवीण भुजाडे आणि मिलन जंगम उपस्थित होते.
No comments:
Post a Comment