स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम' ही डिजिटल सुविधा नसून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात आमूलाग्र बदल घडवणारी एकात्मिक व्यवस्था आहे. यापूर्वी गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन अर्ज, स्थलांतर प्रमाणपत्र किंवा इतर शैक्षणिक सेवांसाठी विद्यार्थ्यांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागत होते. आता परीक्षा अर्जापासून निकाल, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे तसेच तक्रार निवारणापर्यंतच्या सर्व सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध होतील.
विद्यापीठाच्या सेवा विद्यार्थ्यांपर्यंत सहज, वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणे गरजेचे आहे.तसेच विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि नवोपक्रम या त्रिसूत्रीवर आगामी काळात विशेष भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून निकाल प्रक्रियेतील उल्लेखनीय यशाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment