Tuesday, 16 June 2026

प्रशासन प्रशिक्षण संकुल उभारणीला गती द्या

 प्रशासन प्रशिक्षण संकुल उभारणीला गती द्या

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. १० : महिला व बालविकास विभागाच्या हडपसर येथील जागेवर महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेसाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यशदापुणेच्या धर्तीवर आधुनिक प्रशिक्षण संकुल उभारण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश दिले.

 

महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेस जागा उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, संस्थेसाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. या संस्थेमार्फत महिला व बालविकास विभागासह इतर विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत, प्रशासकीय तसेच तांत्रिक प्रशिक्षण देणे शक्य होणार आहे. तसेच मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पायाभूत, प्रेरक व उजळणी प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे देता येईल

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi