Monday, 1 June 2026

राज्यातील वाढत्या कृषी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित साठवणूक सुविधांच्या उभारणीवर विशेष भर

 राज्यातील वाढत्या कृषी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित साठवणूक सुविधांच्या उभारणीवर विशेष भर देण्यात येत आहे. गोदाम क्षमता विस्ताराचे नियोजन बैठकीत मांडण्यात आले. समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या अ‍ॅग्रो लॉजिस्टिक पार्कमुळे शेतमालाची वाहतूक, साठवणूक आणि थेट बाजारपेठेशी जोडणी अधिक सुलभ होणार असल्याचे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

राज्य पणन महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ताब्यातील गोदामे तसेच रिक्त जागांचा शेतकऱ्यांचे हितासाठी अधिक प्रभावी वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या जागांचा नियोजनबद्ध वापर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीत अमरावती, वाशिम, बुलढाणा, अहिल्यानगर आणि मेहकर परिसरातील गोदाम सुविधांच्या विस्ताराचाही आढावा घेण्यात आला. अमरावतीतील धामणगाव परिसर, वाशिम आणि अकोला भाग तसेच बुलढाणा व मेहकर येथे साठवणूक आणि वितरण क्षमता मजबूत करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये आधुनिक लॉजिस्टिक साखळी विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi