यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग
• एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल बँकेतील भागीदारी कार्यक्रम
मुंबई, दि. १८: जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या यूएई आणि भारत देशातील बँकांमध्ये बँकिंग भागीदारी होत आहे. ही बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
कुलाबा येथील हॉटेल ताज पॅलेस येथे यूएई देशातील एमिरेट्स एनबीडी (नॅशनल बँक ऑफ दुबई) आणि मुंबई स्थित असलेली आरबीएल (रत्नाकर बँक लिमिटेड) यांच्यामध्ये बँकिंग भागीदारीचा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
No comments:
Post a Comment