सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार
पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार
–मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 17 : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर वाढीव खाटांनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यामुळे रुग्णसेवा अधिक सक्षम होण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ताही उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढीव खाटांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुश्रीफ बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, संचालक पल्लवी सापळे, उपसचिव संदीप ढाकणे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment