मंत्री ॲड. शेलार म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधा उभारताना वृक्ष कापावे. लागल्यास, संबंधित विकासकास अन्यत्र वृक्षलागवड करणे अनिवार्य असते. अशा प्रकारच्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातूनही पालखी मार्गांचे हरितीकरण प्राधान्याने पूर्ण केले जावे. शासन, आध्यात्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि वारकरी यांचा सक्रिय सहभाग घेऊन हा प्रकल्प जनहिताची लोकचळवळ म्हणून यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या कल्याणकारी उपक्रमासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊन योग्य ते सहकार्य करावे अशा सूचना मंत्री शेलार यांनी यावेळी केल्या.
पालखी मार्गांवर सावली देणाऱ्या देशी वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच त्यांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी मंत्री शेलार यांनी दिले. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना पायी वारी करताना अधिक दिलासा मिळणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे. वारकरी परंपरा, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment