आज संपूर्ण जग आपल्या देशाची प्रगती पाहून आश्चर्यचकित झाले आहे. भारताने संरक्षण क्षेत्रात अत्यंत कमी वेळात प्रगती केली असून संरक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा उत्पादक देश झाला आहे. विशेषतः ऑपरेशन सिंदूरमध्ये साऱ्या जगाने देशाची सामरिक क्षमता पाहिली आहे. हा नवा भारत असून पूर्ण क्षमतेने व आत्मनिर्भरतेने उभा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले
यंत्र इंडिया लिमिटेडचे सीएमडी विजय कुमार अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे आभार अंबाझरी आयुध निर्माणीचे कार्यकारी संचालक अजयकुमार येरपुडे यांनी मानले.
0000
No comments:
Post a Comment