Saturday, 13 June 2026

 राज्यभर एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्यांच्या बैठका सुरू

लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून आरोग्य सेवांना नवी गती

 

मुंबई, दि. 13  : राज्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, प्रभावी आणि समन्वयपूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या "एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती" च्या बैठका राज्यभर सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होत असून स्थानिक स्तरावरील आरोग्यविषयक प्रश्नांच्या प्रभावी निराकरणाला चालना मिळत आहे.

13 जून 2026 पर्यंत राज्यातील 25 जिल्ह्यांमधील विधानसभा स्तरावरील समित्यांपैकी 4 समित्यांच्या बैठका पार पडल्या असून 21 समित्यांच्या बैठका नियोजित आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे बैठका यशस्वीपणे पार पडल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे समितीची बैठक 13 जून रोजी आयोजित करण्यात आली.

 

याशिवाय पेन, विक्रमगड, नांदगाव, मालेगाव (आऊटर), बागलाण, कळवण, दिंडोरी, राधानगरी, कागल, शाहुवाडी, इचलकरंजी, दापोली, बसमत, अकोट, बाळापूर आणि आरमोरी या मतदारसंघांमध्ये बैठकींच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू असल्याने तेथील बैठका पुढे आयोजित करण्यात येणार आहेत.

 

नियमित आढावा आणि प्रभावी समन्वय

 

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालकमंत्री तसेच विधानसभा सदस्यांना समिती स्थापनेसंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरू असून बैठकींच्या आयोजनासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राज्यस्तरावर गुगल शीट, दूरध्वनी संपर्क आणि जिल्हास्तरीय समन्वय यंत्रणेच्या माध्यमातून समित्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi