३०० कोटी वृक्षलागवड अभियानातून
महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या सक्षम होईल
– वनमंत्री गणेश नाईक
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध उपक्रमांचे उद्घाटन
मुंबई, ता. ५ : पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड मां के नाम’ या अभियानातून देशभरात वृक्षारोपणाची लोकचळवळ उभी राहिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी ३०० कोटी वृक्षलागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचे भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष प्रचार वाहनाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
No comments:
Post a Comment