छत्रपती संभाजीनगर, जालनामधील बनावट कागदपत्राद्वारे
दस्त नोंदणी प्रकरणी तातडीने कार्यपूर्ती अहवाल द्या
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. १० – छत्रपती संभाजी नगर, जालना व मालेगाव येथे बनावट कागदपत्रे बनवून दस्त नोंदणी करणे, खोटे खरेदीखत करून मालमत्ता विकण्याचे प्रकार हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असून अशा प्रकरणातील सूत्रधारांवर कारवाईसाठी पोलीस व मुद्रांक विभागाने टास्क फोर्स तयार करावे व केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्ती अहवाल पुढील मंगळवारपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीपुढे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
बनावट कागदपत्रे बनवून दस्त नोंदणी केल्या प्रकरणी आज मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, उपस्थित होते. तसेच मुद्रांक महानिरीक्षक रविंद्र बिनवडे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, जालनाचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्यासह पोलीस अधिकारी, सहकार विभागाचे सहनिबंधक आदी ऑनलाईन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment