ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तासांत तारण कर्ज;
महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
- मंत्री जयकुमार रावल
· राज्याची साठवणूक क्षमताही वाढवणार
· शेतकऱ्यांनी साठवलेला शेतमाल "डिजिटल" विक्री सुविधाही उपलब्ध होणार
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून राज्यात साठवणूक क्षमता वाढवण्यात येत आहे. समृद्धी महामार्गालगत तसेच इतर ठिकाणी अॅग्रो लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येत असून शेतकरी-केंद्रित डिजिटल साठवणूक व्यवस्था निर्माण करण्याला वेग देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांनी गोदामात साठवणूक केलेल्या शेतमालावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून गोदाम पावती नुसार ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. असे जलद गतीने तारण कर्ज उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून त्याचा शेतकऱ्यांनी अधिक लाभ घ्यावा, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या आढावा बैठकीत पणनमंत्री रावल बोलत होते. यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अभय महाजन, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, पणन संचालक शरद जरे उपस्थित होते.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि पणन महासंघ यांची एकूण साठवणूक क्षमता २१ लाख १८ हजार मेट्रिक टन आहे. त्या साठवणूक क्षमतेत आणखी वाढ करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्यातील करारानुसार ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित तारण कर्ज योजना ९ टक्के व्याजदराने राबविण्यात येत
No comments:
Post a Comment